फोल्डेबल फोन्सच्या मार्केटमध्ये हलचल निर्मण करण्यासाठी हँडसेट निर्माता कंपनी Xiaomi ने आपला पहिला Foldable Smartphone Mi Mix Fold लॉन्च केला आहे. या फोनची टक्कर बाजारात असलेल्या Samsung Fold आणि Huawei Mate X सारख्या फोन्सशी होईल. मी मिक्स फोल्डबद्दल बोलायचे झाले तर यात दोन डिस्प्ले देण्यात आले आहेत, ज्यांच्या मदतीने फोन टॅबलेट म्हणून पण वापरता येईल. इतकेच नव्हे तर फोनमध्ये एक इनोवेटिव कॅमेरा हर्डवेयर देण्यात आला आहे, ज्याला कंपनीने ‘Liquid Lens’ असे नाव दिले आहे. तसेच या फोनमध्ये फ्लॅगशिप चिपसटे सोबतच आणि पण शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. (xiaomi mi mix fold foldable smartphone launched with 108mp camera and upto 16gb ram price)
फोल्डेबल डिस्प्ले
Mi MIX Fold मध्ये 8.01-इंच OLED डिस्प्ले देण्यात आला आहे ज्यात QHD+ रिजोल्यूशन आणि 4:3 आस्पेक्ट रेश्यो आहे. Xiaomi नुसार फोल्डेबल फोन्समध्ये हा आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्प्ले आहे. तसेच फोनचा डिस्प्ले HDR10+, Dolby Vision, 600 नीटस ब्राइटनेस आणि 900 nits पीक ब्राइटनेस सपोर्टसह येतो. यात फक्त 60Hz रिफ्रेश रेट आहे.
हे देखील वाचा : Xiaomi ने केली कमाल, लॉन्च केला सर्वात पातळ 5G फोन Xiaomi Mi 11 Lite, किंमत पण आहे कमी
फोनमध्ये मिळणारी मोठी स्क्रीन तुम्हाला टॅबलेटसारखा अनुभव पण देईल. यात व्हिडीओ बघण्याचा आणि वेब ब्राउज करण्याचा अनुभव खूप शानदार असेल. तसेच शाओमी फोनमध्ये एक डेस्कटॉप मोड पण देण्यात आला आहे, ज्यात रिजॉल्विंग विंडो आहे. हा मोड तीन-बोटे स्वाइप केल्यावर सक्रिय केला जाऊ शकतो.
फोनच्या बाहेरच्या बाजूला 6.5 इंच एमोलेड डिस्प्ले आहे ज्याचा रिजॉल्यूशन 2520 x 840 पिक्सल आहे, याचा रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज आणि स्क्रीन रेशियो 27:9 आहे. तसेच तुम्हाला या स्क्रीनवर 180Hz टच-सॅम्पलिंग रेट, 650 निट्स ब्राइटनेस, HDR10+ आणि Dolby Vision सपोर्ट पण मिळेल. शाओमीनुसार Mi MIX Fold मध्ये U-शेप हिंजचा वापर केला गेला आहे जो दुसऱ्या फोल्डेबल फोनच्या तुलनेत 27 टक्के हलका हिंज आहे. तसेच, फोनवर 200,000 बेंड टेस्ट आणि 1 मिलियन फोल्ड टेस्ट केल्या गेल्या आहेत.
जगातील पहिला Liquid Lens कॅमेरा सिस्टम
डिस्प्लेव्यतिरिक्त Mi MIX Fold मध्ये एक इनोवेटिव कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 8MP टेलिफोटो कॅमेरा आहे, ज्याला शाओमीने ‘Liquid Lens’ असे नाव दिले आहे. हि एक लवचिक फिल्म आहे आणि हि मानवी डोळ्याप्रमाणे आपला आकार बदलू शकते. लिक्विड लेंस कॅमेरा आपले ऑप्टिकल मॅग्निफिकेशनला 3x पासून 30x पर्यंत समायोजित करण्यास मदत करतो. हि टेक्नॉलॉजी कॅमेरा फक्त 3 सेमीचे किमान फोकस अंतर मिळवून देण्यास मदत करते जी दूरच्या वस्तू पकडण्यास किंवा मॅक्रोज घेण्यास मदत करते. कंपनी म्हणते कि लिक्विड लेंस Surge C1 ISP द्वारे पावर्ड आहे जो वेगाने फोकस करण्यासोबत व्हाइट बॅलेंस आणि हाई डायनामिक रेंज देण्यास पूर्णपणे मदत करतो.
हे देखील वाचा : लो बजेटमध्ये आला वीवोचा अजून एक आणि स्वस्त स्मार्टफोन Vivo Y30G, बघा स्पेसिफिकेशन्स आणि किंमत
फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा सेंसर, 123 डिग्री फील्ड-ऑफ-व्यू सह 13 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटला 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर मिळेल.
फ्लॅगशिप प्रोसेसर आणि स्पेसिफिकेशन
Mi MIX Fold कंपनीने Qualcomm Snapdragon 888 SoC सह सादर केला आहे जो एक फ्लॅगशिप प्रोसेसर आहे. तसेच, स्मार्टफोन Android 11 OS वर चालतो. इतकेच नव्हे तर फोनमध्ये 12GB+256GB, 12GB+512GB, आणि 16GB+512GB की रॅम व स्टोरेजची पावर देण्यात आली आहे. फोनमध्ये रॅम LPDDR5 यूनिट आणि स्टोरेज मध्ये UFS 3.1 टेक्नोलॉजीचा वापर केला गेला आहे.
फोनमध्ये पावरबॅकअपसाठी 5020mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी दोन 2,460mAh सेल्ससह येते. फोनची बॅटरी 67W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने फोन फक्त 37 मिनिटांत 100 टक्के चार्ज केली जाऊ शकते.
फोनमध्ये ऑडियोसाठी क्वाड स्पीकर सेटअप देण्यात आला आहे, Xiaomi चा दावा आहे कि हा जगातील पहिला फीचर आहे. कंपनीने फोनमध्ये Harman Kardon स्पीकर्स देण्यात आले आहेत.
हे देखील वाचा : Realme घेऊन येत आहे 6,000mAh बॅटरी असलेला नवीन स्मार्टफोन, किंमत असेल 10,000 रुपयांपेक्षा पण कमी
किंमत
मी मिक्स फोल्ड स्मार्टफोनच्या 12 जीबी रॅम/256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 9,999 (जवळपास 1,11,700 रुपये), 12 जीबी रॅम/512 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 10,999 (जवळपास 1,22,800 रुपये) आणि टॉप वेरिएंटमध्ये 16 जीबी रॅमसह 512 जीबी स्टोरेज आहे आणि या मॉडेलची किंमत CNY 12,999 (जवळपास 1,45,200 रुपये) आहे.
फोन दोन मैटेरियल ऑप्शन वर सादर केला गेला आहे. एकात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास बॅक आहे ज्यात सिरॅमिकचा वापर करण्यात आला आहे आणि दुसरा सिरॅमिक स्पेशल एडिशन आहे जो काळ्या रंगाच्या सिरॅमिक बॅक पॅनलसह येतो. त्यामुळे स्पष्ट झाले नाही कि दोन्ही मॉडेलच्या किंमतीत फरक असेल. चीनमध्ये Mi MIX Fold ची प्री-ऑर्डर सुरु झाली आहे आणि 16 एप्रिलपासून फोन सेलवर जाईल. ब्रँडने चीनच्या बाहेर Mi MIX Fold ची उपलब्धता आणि लॉन्चबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.


















