Xiaomi Poco F1 ची किंमत झाली थेट 5,000 रुपयांनी कमी, जाणून घ्या नवीन किंमत

Xiaomi ने गेल्यावर्षी POCOPHONE च्या रूपाने आपला सब-ब्रँड भारतीय बाजारात आणला होता. या ब्रँडची सुरवात Poco F1 स्मार्टफोन सह झाली होती. ज्याने लॉन्च सोबतच यशाचे नवीन रेकॉर्ड केले होते. Poco F1 फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये लॉन्च केला गेला होता जो त्यावेळी क्वालकॉमच्या सर्वात ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 845 ने सुसज्ज होता. ताकदवान स्पेसिफिकेशन्स असलेला Poco F1 देशात ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध आहे. आता आपल्या फॅन्सना भेट देत पोको इंडिया ने Poco F1 ची किंमत थेट 5,000 रुपयांनी कमी केली आहे.

Poco F1 पोको इंडियाने ऑफलाइन प्लॅटफॉर्म वर स्वस्त केला आहे. म्हणजे रिटेल स्टोर्स व दुकानांमध्ये आज 2 ऑगस्ट पासूनच Poco F1 कमी किंमतीत विकत घेता येईल. कंपनीने फोनचा 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट तसेच 8जीबी रॅम व 256जीबी मेमरी वेरिएंटच्या किंमतीत कपात केली आहे. फोनचा 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंट पाहता हा 23,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. या वेरिएंट मध्ये आधीपण दोनदा प्राइज कट झाला आहे ज्यानंतर फोनची किंमत 20,999 रुपये झाली होती. तर आता पुन्हा 2,000रुपयांची कपात झाल्यानंतर Poco F1 च्या या वेरिएंटची किंमत 18,999 रुपये झाली आहे.

अशाच प्रकारे Poco F1 चा 8जीबी रॅम + 256जीबी मेमरी वेरिएंट कंपनीने 27,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. या वेरिएंटची किंमत आता थेट 5,000 रुपयांनी कमी केली आहे. या मोठ्या कपातीनंतर Poco F1 च्या 8जीबी रॅम वेरिएंटची किंमत आता 22,999 रुपये झाली आहे. विशेष म्हणजे Poco F1 चा सर्वात छोटा 6जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

हे देखील वाचा: Exclusive: Samsung घेऊन येत आहे स्वस्त डुअल कॅमेरा आणि फिंगरप्रिंट स्कॅनर असलेला फोन, Galaxy A10s ची माहिती झाली लीक

Poco F1 स्पेसिफिकेशन्स

Poco F1 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 416पीपीआई सपोर्ट व 1080 x 2246 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.99-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 9.6 वर बनलेला आहे तसेच 10एनएम 2.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट वर चालेल. कपंनी ने Poco F1 लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे जो हाई ग्राफिक्स गेम व हेवी प्रोसेसिंगच्या वेळी फोन गरम होऊ देत नाही. तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये एड्रेनो 630 जीपीयू मिळेल.

हे देखील वाचा: 8 ऑगस्टला समोर येईल जगातील पहिला 64-मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला फोन, भारतापासून होईल सुरवात

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. बॅक पॅनेल वर डुअल एलईडी फ्लॅश सोबत 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आहे. तर सेल्फी साठी या फोन मध्ये एलईडी फ्लॅश सोबत 20-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Poco F1 मध्ये डुअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो . फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी फोन मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट सोबत क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी वाली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

शाआोमी पोको एफ1 वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here