12 जूनला लॉन्च होईल शाओमी रेडमी 6, दमदार प्रोसेसर सह असेल नॉच स्क्रीन

असे वाटते आहे की शाओमी पण सॅमसंग च्या पावलांवर पाऊल टाकत आहे. काही वर्षांपूर्वीचा शाओमी मोबाइल चा पोर्टफोलियो पाहिल्यास त्यात फक्त निवडक मॉडेल होते. परंतू आता अनेक मॉडेल आहेत. या वर्षी रडमी 5ए, रेडमी 5, रेडीमी नोट 5 सीरीज आणि मी मिक्स 2 सारखे डिवाइस भारतात लॉन्च केल्या नंतर चीन मध्ये मी मिक्स 2एस, मी8 सरीज, मी 6एक्स आणि मी 2एस सारखे मॉडेल सादर केले आहेत. तसेच आता कंपनी रेडमी 6 लॉन्च करण्याची तयारी करत आहे.

12 जूनला शाओमी रेडमी 6 फोन लॉन्च करणार आहे आणि कंपनी ने यासाठी इनवाइट पण पाठवले आहेत. मीडिया इनवाइट मध्ये स्पष्ट दिसत आहे की कंपनी ने एक मोठा 6 लिहिला आहे. तसेच खाली चीनी भाषेत रेड मॅटर्स लिहिले आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की हा शाओमी रेडमी 6 आहे. पण आशा प्रकारचे या फोन बद्दल आता पर्यंत अनेक लीक आले आहेत ते पाहून अंदाज लावला जात आहे की कंपनी एक साथ दोन-तीन मॉडेल सादर करणार आहे ज्यात एक मॉडेल नॉच स्क्रीन सह असू शकतो.

काही दिवसांपूर्वी शाओमी रेडमी सीरीज चा एक नॉच स्क्रीन वाला फोन अनेक सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट झाला आहे आणि आशा आहे कि हा फोन रेडमी 6 किंवा 6 प्लस असेल. त्याचबरोबर फोन च्या स्पेसिफिकेशन ची पण माहिती मिळाली आहे.

आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार शाओमी रेडमी 6 प्लस मॉडेल जुन्या रेडमी 5 आणि 5 प्लस मॉडेल पेक्षा थोडा मोठा आहे. तसेच मागच्या पॅनल वर तुम्हाला डुअल रियर कॅमेरा मिळेल. तर फ्रंट पॅनल वर नॉच स्क्रीन सह काही सेंसर देण्यात आले आहेत. या फोन मध्ये 5.84-इंचाची स्क्रीन मिळेल.

प्राप्त सुचने नुसार कंपनी याला 19:9 आसपेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस नॉच स्क्रीन सह सादर करू शकते. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट सह येऊ शकतो आणि यात 2.0गीगाहट्र्जचा आॅक्टाकोर प्रोसेसर असू शकतो. पण बातमी ही पण आहे की याचा एक वेरियंट मीडियाटेक हेलियो चिपसेट सह लॉन्च होऊ शकतो.

शाओमी रेडमी 6 प्लस 2जीबी/3जीबी/4जीबी रॅम वेरियंट मध्ये सादर होऊ शकतो. तसेच फोन मध्ये तुम्हाला 12-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा आणि 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळेल. टेना वर लिस्ट केलेल्या फोन मध्ये स्पष्ट पणे दिसत होते की हा एंडरॉयड ओरियो 8.1 वर आधारित आहे. जरी प्राइस बद्दल आता पर्यंत माहिती नाही आहे पण आशा आहे की हा फोन 10,000 रुपयांच्या बजेट मध्ये येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here