एक्सक्लूसिव : या महिन्यात भारतात लॉन्च होईल अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर वाला वीवो एक्स21

स्मार्टफोन टेक्निक मध्ये एक पाऊल पुढे टाकत वीवो ने जेव्हा टेक जागा समोर अदृश्य फिंगरप्रिंट सेंसर सादर केला होता तेव्हा सर्व मोबाईल कंपन्या आणि स्मार्टफोन यूजर्स पण हैराण झाले होते. हीच टेक्निक प्रत्यक्षात आणत वीवो ने मार्च महिन्यात आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन एक्स21 चीनी बाजारात लॉन्च केला होता. या फोन च्या स्क्रीन च्या खाली फिंगरप्रिंट सेंसर आहे जो बाहेरून दिसत नाही आणि स्क्रीन वर ​फिंगर टच करताच हा अनलॉक होतो. शानदार टेक्निक व दमदार स्पेसिफिकेशन्स असलेला हा स्मार्टफोन लवकरच भारतीय यूजर्स साठी उपलब्ध होईल.

91मोबाईल्स ला मिळालेल्या एक्सक्लूसिव माहितीनुसार वीवो कंपनी मे महिन्याच्या अखेरीस हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वीवो भारतात सध्या भारत एक्स21 स्मार्टफोन अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर वाला वेरिएंट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हा फोन मे च्या शेवटच्या आठवड्यात देशात लॉन्च केला जाईल आणि जून पासून हा सेल साठी उपलब्ध होईल. मिळालेल्या सूचने नुसार या फोनची किंमत 32,000 रुपयांच्या आसपास असेल.

वीवो एक्स21 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिसप्ले वर सादर केला जाईल ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.3 टक्के असेल. या फोन मध्ये 6.28-इंचाचा फुल एचडी+ डिसप्ले देण्यात आला आहे ज्यात वरच्या बाजूस आयफोन 10 सारखी नॉच मिळेल. वीवो एक्स21 मध्ये वीवो चा वर्चुअल असिस्टेंट ‘जोवी’ पण आहे.

हा फोन फनटच ओएस 4.0 आधारित एंडरॉयड नुगट वर सादर करण्यात आला आहे तसेच हा 2.2गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. कंपनी ने एक्स21 मध्ये 6जीबी ची रॅम मेमरी दिली आहे जिच्या सोबत 64जीबी मेमरी आणि 128जीबी स्टोरेज वाले दोन स्टोरेज वेरिएंट्स लॉन्च करण्यात आले आहेत. दोन्ही वेरिएंट मधील स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते.

वनप्लस 6 झाला एचडीएफसी बँकेच्या वेबसाइट वर लिस्ट, लॉन्च च्या आधी स्पेसिफिकेशन्स आले समोर

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर वीवो एक्स21 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 12-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन च्या कॅमेरा मध्ये एआई टेक्निक आहे. जी उत्तम फोटोग्राफ कॅप्चर करण्यास मदत करेल.

का विकत घेऊ नये शाओमी रेडमी नोट 5 प्रो, जाणून घ्या तीन कारणे

वीवो एक्स21 मध्ये फेशियल रेक्ग्नेशन टेक्निक आहे तसेच 4जी वोएलटीई व बे​सिक कनेक्टिविटी फीचर्स सह यात 3,200एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. वीवो एक्स21 चा अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर वेरिएंट चीनी बाजार मध्ये ब्लॅक, रूबी रेड आणि आॅरोरा वाईट कलर आॅप्शन्स मध्ये 3598 युआन (जवळपास 37,000 रुपये) च्या किमतींवर सेल साठी उपलब्ध आहे. 5 मे ला हा फोन सिंगापुर मध्ये लॉन्च होत आहे आणि त्यानंतर वीवो जगभरात हा फोन घेऊन येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here