15,999 रुपयांमध्ये 60MP Selfie कॅमेरा; Infinix Zero 20 मध्ये 8GB रॅम आणि 108MP चा बॅक कॅमेरा

इनफिनिक्सनं भारतीय बाजारात प्रोडक्ट रेंज वाढवत दोन पावरफुल स्मार्टफोन सादर केले आहेत. आज Infinix Zero 20 आणि Infinix Zero Ultra भारतात लाँच झाले आहेत. झिरो अल्ट्रा स्मार्टफोमध्ये 200 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे, जो कंपनीचा प्रीमियम फ्लॅगशिप आहे. तर दुसरीकडे कंपनीचा झिरो 20 स्मार्टफोन 60MP Selfie, 108MP Rear Camera, MediaTek Helio G99 चिपसेट आणि 45W 5,000mAh Battery सह बाजारात आला आहे.

Infinix Zero 20 ची किंमत

Infinix Zero 20 स्मार्टफोनचा एकच मॉडेल भारतीय बाजारात आला आहे. या फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. Infinix Zero 20 स्मार्टफोनची किंमत भारतात 15,999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीनं हा फोन Green Fantasy, Glitter Gold आणि Space Grey अशा तीन रंगात सादर केला आहे. या स्मार्टफोनची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाईल, पहिला सेल 25 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजता सुरु होईल.

Infinix Zero 20 Specifications

इनफिनिक्स जीरो 20 स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. वॉटरड्रॉप नॉच स्टाईल असलेली ही फोन स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला चिन पार्ट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: 200MP कॅमेरा असलेला Infinix Zero Ultra लाँच, फक्त 12 मिनिटांत होणार फुल चार्ज

Infinix Zero 20 अँड्रॉइड 12 आधारित एक्सओएस 12 वर चालतो. ऑक्टाकोर प्रोसेसरसह या स्मार्टफोनमध्ये 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट देण्यात आला आहे. भारतीय बाजारात हा इनफिनिक्स मोबाइल 8 जीबी रॅमसह आला आहे जो 5जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट करतो. या टेक्नॉलॉजीच्या मदतीनं हा स्मार्टफोन 13जीबी रॅमची परफॉर्मन्स देऊ शकतो.

सेल्फी प्रेमींसाठी इनफिनिक्स जीरो 20 एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. फोनच्या फ्रंट पॅनलवर 60MP OIS + Dual LED Flash देण्यात आली आहे जो व्हिडीओ लॉग बनवण्यासाठी बेस्ट आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर क्वॉड एलईडी फ्लॅशसह 108MP Ultra Vision Camera + 13MP ultra-wide angle lens + 2MP Macro देण्यात आला आहे.

Infinix Zero 20 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला देखील सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी स्मार्टफोनमध्ये 45वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असेलली 4,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हे देखील वाचा: या दिवशी येतोय आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली वनप्लस; OnePlus 11 5G च्या भारतीय लाँचची तारीख आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here