Electric Vehicle Fire: पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटीला अचानक लागली आग! बॉडी वितळली, पाहा व्हिडीओ

Electric Vehicle Fire च्या घटना वारंवार घडत आहेत. देशात कुठल्या न कुठल्या कोपऱ्यातून इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आग लागल्याच्या बातम्या समोर येत असतात. यात सर्वात जास्त प्रकरणं Electric Scooter, जिला E Scooty किंवा Battery Scooty देखील म्हणतात, यांच्या असतात. अशीच एक घटना आता ओडिशा (Odisha) मध्ये झाली आहे जिथे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या electric two-wheeler मध्ये आग लागली आणि ती इलेक्ट्रिक स्कूटर जळून राख झाली.

मीडिया रिपोर्टनुसार ही दुर्घटना ओडिशाच्या सोनपुर जिल्ह्यातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक इलेक्ट्रिक टू-व्हीलर पार्किंगमध्ये उभी होती आणि अचानक त्यात धमाका झाला आहे. ब्लास्ट सोबतच इलेक्ट्रिक स्कूटीनं पेट घेतला आणि काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केलं. इतक्यात लोकांनी अग्निशमन विभागाला सूचित केलं परंतु जेव्हा फायरब्रिग्रेडनं तिथे पोहचून आग विझविण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत ती स्कूटर पूर्णपणे जळून खाक झाली होती. हे देखील वाचा: फक्त 90 हजार देऊन घरी आणा सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; Tata Tiago EV देते सिंगल चार्जवर 315km ची रेंज

इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग

E Scooty Fire ची ही घटना Odisha Bytes नावाच्या युट्युब चॅनेलवर अपलोड देखील करण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर रबी नारायण सेनापती नावाच्या व्यक्तीची होती, अशी माहिती देण्यात आली आहे. नारायण या स्कूटरवरून घराजवळच्या एका दुकानात गेला होता. दुकानावर जाताना त्याने स्कूटर रस्त्यावर उभी केली दिया आणि तो दुकानात गेला. थोड्यावेळाने अचानक त्या स्कूटरनं पेट घेतला आणि धूर येऊ लागला.

रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की आग लागण्यापूर्वी त्या स्कूटरमध्ये धमाका झाला होता. परंतु या स्फोटाचे कारण मात्र अजूनपर्यंत समोर आलं नाही. ब्लास्टच्या वेळी ही स्कूटर चार्जिंगवर नव्हती किंवा ती रिपेयर केली जात होती किंवा चालवली देखील जात नव्हती. उभ्या असलेल्या स्कूटरमध्ये स्फोट होऊन आग लागल्यामुळे पुन्हा एकदा इलेक्ट्रिक वाहनांमुळे लोकांच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे. हे देखील वाचा: स्वस्त 5G फोनच्या यादीत OPPO A58 5G ची एंट्री; वॉटरप्रूफ बॉडीसह 50MP Camera आणि 13GB RAM

वरील व्हिडीओ मध्ये तुम्ही बघू शकता की आग इतकी भयानक होती की त्या स्कूटरची बॉडी पूर्णपणे वितळली आहे ते वाहनाची पूर्णपणे राख झाली. ही E Scooty म्हणजे Electric Scooter कोणत्या कंपनीची होती, ही माहिती अजूनतरी समोर आली नाही.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here