बजाज ऑटो (Bajaj Auto) आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअप युलु (Yulu) नं एकत्र येऊन दोन बॅटरी असेलल्या स्कूटर सादर केल्या आहेत. कंपनीनं सादर केलेली इलेक्ट्रिक दुचाकी वाहने मिरॅकल जीआर (Miracle GR) आणि डीएक्स जीआर (DeX GR) या नावानं बाजारात येतील.
Yulu च्या AI-नेतृत्वाखालील तंत्रज्ञान स्टॅकद्वारे सपोर्टेड आणि Bajaj Auto द्वारे निर्मित, Miracle GR आणि DeX GR या इलेक्ट्रिक स्कूटर्स जगासाठी भारतात बनवण्यात आल्या आहेत आणि चेतक टेक्नॉलॉजी (बजाज ऑटोच्या मालकीची उपकंपनी) द्वारे बाजारात आणल्या जात आहेत.
Yulu Bajaj Electric Scooter
असं सांगण्यात आलं आहे की सादर करण्यात आलेल्या नवीन ई-स्कूटरची मॅन्युफॅक्चरिंग खासकरून बजाज ऑटो करेल. युलुनं म्हटलं आहे की बजाज ऑटोच्या मालकीच्या उपकंपनी बजाज चेतक टेक्नॉलॉजी लिमिटेडद्वारे सादर केल्या गेलेल्या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर युलुच्या टेक्नॉलॉजीवर चालतील.
विशेष म्हणजे बजाजची आधीपासून युलूमध्ये भागीदारी आहे, तसेच कंपनी स्वतःच्या चेतक इलेक्ट्रिक स्कूटर देखील बाजारात विकते. आता बजाज ऑटोने युलूच्या दुसऱ्या पिढीतील ई-स्कूटर्स आणि काही घटकांचे लोकलायजेशन आणि अपग्रेड करण्यात मदत केली. हे देखील वाचा: 2GB डेली डेटा देणारे BSNL चे दोन नवीन प्लॅन लाँच; Airtel-Jio पेक्षा शानदार बेनिफिट्स
कंपनीच्या म्हणण्यानुसार, या नवीन थर्ड-जनरेशन ई-बाईक फुल प्रूफ, फॉल प्रूफ आहेत आणि OTA सपोर्ट देतील. युलू कंपनीचा दावा आहे की, या नवीन ई-बाईक ट्रॅक करता येतात आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही वापरासाठी उत्तम आहेत.
Miracle GR आणि DeX GR च्या किंमत आणि सेलची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तुमच्या माहितीसाठी, युलु रेंटल सर्व्हिस ई-स्कूटर सादर करते. युलुचा ताफा स्वॅपेबल बॅटरीवर चालतो आणि युमा एनर्जीद्वारे संचालित आहे, ज्याचे बेंगळूर, मुंबई आणि दिल्लीमध्ये जवळपास 100 स्टेशन आहेत. कंपनीची योजना 2024 पर्यंत या स्टेशन्सची संख्या 500 करण्याची आहे. हे देखील वाचा: डीएसएलआर सारखा कॅमेरा असलेल्या Xiaomi 13 Pro च्या भारतीय किंमतीचा खुलासा; आयफोनला टाकणार मागे?
लवकरच येतील 1 लाख टू-व्हीलर
मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनी देशातील प्रमुख शहरांमध्ये 1,00,000 टू-व्हीलर सादर करण्यासाठी तयार आहे. कंपनीचं लक्ष्य वर्षअखेर महसुलात 10 पट वाढ करणं आहे. स्थानिक पार्ट्स आणि असेंबली व्यतिरिक्त चांगल्या प्रोडक्शन क्वॉलिटीच्या माध्यमातून कंपनी हे लक्ष पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.