10 iPhone चोरून बॉक्समध्ये ठेवले खेळण्यातले मोबाइल, डिलिव्हरी बॉयनं केला लाखोंचा घोटाळा

Highlights

  • आयफोन्सच्या बदल्यात डमी फोन पार्सलमध्ये ठेवले.
  • पार्सलमध्ये आयफोन्ससह एयरपॉड देखील होते.
  • सर्व आयफोन शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉनवरून आले होते.

ऑनलाइन शॉपिंग फ्रॉड संबंधित अशा घटना सतत कानावर पडत असतात की Amazon किंवा Flipkart वरून काही सामान मागवलं जातं आणि त्याबदल्यात साबण, दगड किंवा दुसरंच चुकीचं सामान डिलिव्हर केलं जातं. असंच काहीसं गुरूग्राममध्ये देखील घडलं आहे जिथे डिलिव्हरी बॉयनं 1 किंवा 2 नव्हे तर संपूर्ण 10 iPhone चोरून त्यांच्या ऐवजी दुसऱ्याच वस्तू पार्सलमध्ये ठेवल्या आणि लाखोंचा घोटाळा केला.

डिलिव्हरी बॉयनं चोरले 10 आयफोन

समोर आलेल्या रिपोर्टनुसार गुरूग्राममध्ये एका ई-कॉमर्स कंपनीच्या डिलिव्हरी बॉयनं 10 आयफोन्स चोरून त्यांच्या जागी डमी फोन म्हणजे नकली मोबाइल पार्सलमध्ये ठेवले. हे सर्व आयफोन शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉनचे असल्याचं सांगण्यात आलं आहे जे कस्टमरला डिलिव्हर होणार होते. रिपोर्टनुसार आरोपी तरुण अ‍ॅमेझॉनचे पार्सल डिलिव्हर करणाऱ्या कंपनी Matrix Finance Solution साठी काम करता होता. हे देखील वाचा: स्वस्त स्मार्टफोन Infinix Smart 7 HD भारतात लाँच, फक्त 5399 रुपयांमध्ये होणार विक्री!

आरोपी तरुणाचे नाव ललित असल्याचं सांगण्यात आलं आहे. बातमीनुसार, ललितला एक पार्सल डिलिव्हर करण्याचं काम मिळालं होतं ज्यात 10 अ‍ॅप्पल आयफोन आणि एयरपॉड होता. जेव्हा हा तरुण पार्सल डिलिव्हर करण्यासाठी निघाला तेव्हा रस्त्यातच त्याने डब्ब्यांमधील iPhone आणि AirPods काढले होते आणि त्याऐवजी डमी मोबाइल ठेवले.

वस्तू रिप्लेस केल्यानंतर ललितनं ते पार्सल आपल्या भावाला दिले होते आणि ते पुन्हा ऑफिसमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. ललितनं खोटं सांगितलं की ज्या ग्राहकाला पार्सल द्यायचं होतं त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही, म्हणून डिलिव्हरी उद्या करेल. जेव्हा पार्सल पुन्हा कंपनीत आलं तेव्हा पॅकेजिंगशी छेडछाड केल्याचा संशय आला. पॅकिंग काढल्यावर त्यातून नकली आयफोन निघाले. हे देखील वाचा: Google Pixel 7a चा नवा कलर आला समोर; लाँचसाठी फक्त काही दिवस शिल्लक

ग्राहकाला त्रास आणि कंपनीला फटका

साधारणतः आयटम डिलिव्हर करण्याच्या बाबतीत लोक ई-कॉमर्स वेबसाइट्सना दोष देतात. परंतु अनेकदा सामान डिलिव्हर करणाऱ्यांची चूक असते तसेच त्यांनी केलेला फ्रॉड कंपनी पर्यंत पोहचत देखील नाही. यामुळे तुम्ही ग्राहकांना त्रास होतो तर दुसरीकडे शॉपिंग साइट्स व डिलिव्हरी पार्टनर्सचे देखील नुकसान होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here