Google Pixel 7a चा नवा कलर आला समोर; लाँचसाठी फक्त काही दिवस शिल्लक

Highlights

  • Pixel 7a नव्या ऑरेंज कलरमध्ये दिसला आहे.
  • हा हँडसेट गुगल आय/ओ कॉन्फरन्समध्ये सादर केला जाऊ शकतो.
  • Pixel 7a मध्ये Tensor G2 चिपसेट, 90Hz AMOLED डिस्प्ले आणि वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.

Google Pixel 7a स्मार्टफोन 10 मेला होणाऱ्या गुगल आय/ओ कॉन्फरन्समध्ये सादर केला जाईल, हे जवळपास निश्चित झालं आहे. या इव्हेंटमधून बहुचर्चित Pixel Fold आणि Pixel tablet देखील बाजारात येऊ शकतात. 91मोबाइल्सनं अलीकडेच Pixel 7a चे स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत, तसेच फोनचे रेंडरही ऑनलाइन उपलब्ध आहेत.

आता नव्या लीकमध्ये आगामी Pixel 7a स्मार्टफोन नव्या ऑरेंज/कोरल दिसला आहे, ही माहिती टिपस्टर इव्हन ब्लासनं दिली आहे. हा नवीन कलर जरा फ्लॅशी म्हणजे चमकदार आहे. याआधी स्मार्टफोनच्या व्हाइट, ब्लॅक/ग्रे आणि ब्लू कलरची माहिती आली होती.

पिक्सल 7ए चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

डिस्प्ले : Google Pixel 7a स्मार्टफोनमध्ये 6.1-इंचाचा फुलएचडी+ ओएलईड डिस्प्ले मिळू शकतो, जो 90हर्ट्झ रिफ्रेश रेट, पंच होल कटआऊट आणि सिमिट्रिकल बेझलसह येऊ शकतो. हे देखील वाचा: PUBG आणि BGMI वाल्या कंपनीनं भारतात लाँच केला नवा गेम; जाणून घ्या गेम प्ले आणि नाव

प्रोसेसर : Pixel 7a मध्ये गुगलचा स्वतःचा Tensor G2 चिपसेट दिला जाऊ शकतो, जो Pixel 7 आणि Pixel 7 Pro मध्येही देण्यात आला आहे.

रॅम आणि स्टोरेज या स्मार्टफोनमध्ये 8जीबी LPDDR5 रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ जाऊ शकते जी UFS 3.1 टेक्नॉलॉजीसह येऊ शकते.

ओएस : आगामी Pixel 7a मध्ये अँड्रॉइड 13 ऑपरेटिंग सिस्टम मिळण्याची शक्यता आहे.

कॅमेरा : कॅमेरा सेगमेंट पाहता या स्मार्टफोनमध्ये 64एमपीचा रियर कॅमेरा OIS सह दिला जाऊ शकतो आणि 12एमपीचा अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळू शकतो. सेल्फीसाठी फोनमध्ये 10.8एमपीचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

बॅटरी : स्मार्टफोनमध्ये 4,400एमएएचची बॅटरी मिळू शकते जी 20वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते. यावेळी पिक्सल ए सीरिजच्या स्मार्टफोन्समध्ये देखील वायरलेस चार्जिंग दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: स्वस्त स्मार्टफोन Infinix Smart 7 HD भारतात लाँच, फक्त 5399 रुपयांमध्ये होणार विक्री!

कनेक्टिव्हिटी : Pixel 7a मध्ये 5जी, 4जी एलटीई, ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्ट मिळू शकतो.

गुगल पिक्सल 7ए ची किंमत संभाव्य

रिपोर्ट्सनुसार Pixel 7a ची किंमत 499 डॉलर्स (सुमारे 41,000 रुपये) असू शकते. भारतात देखील हा फोन याच किंमतीच्या आसपास सादर केला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here