भारतीय सर्टिफिकेशन साइटवर दिसला Realme 11 Pro+ 5G; बॅटरी आणि फास्ट चार्जिंगचा खुलासा

Highlights

  • Realme 11 सीरिज लवकरच चीन आणि जागतिक बाजारात येऊ शकते.
  • यातील टॉप मॉडेल Realme 11 Pro+ 5G काही दिवसांपूर्वी NBTC आणि आता BIS वर लिस्ट झाला आहे.
  • फोनच्या बॅटरी आणि फास्ट चार्जिंगचा खुलासा खुद्द कंपनीनं केला आहे.

Realme 11 सीरिज 10 मेला चीनमध्ये सादर होणं आहे. तसेच कंपनीनं सांगितलं आहे की ही सीरिज जागतिक बाजारात देखील लवकरच येईल. लिक्सनुसार ही सीरिज भारतीय बाजारात याच महिन्यात सादर केली जाऊ शकते. सीरिजमधील टॉप मॉडेल Realme 11 Pro+ 5G बद्दल बरीच माहिती लाँचपूर्वीच समोर आली आहे. या डिवाइसला अलीकडेच भारतीय BIS सर्टिफिकेशन आणि थायलंडमधील NBTC सर्टिफिकेशन मिळालं आहे. तसेच कंपनीनं बॅटरी आणि फास्ट चार्जिंगची माहिती दिली आहे, चला पाहूया.

रियलमी 11 प्रो+ 5जी चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

Realme 11 Pro+ 5G च्या NBTC वरील सर्टिफिकेशनमधून स्मार्टफोनच्या जागतिक बाजारातील नावाचा खुलासा झाला आहे. फोनचे नाव आणि 5जी सपोर्ट यापेक्षा जास्त माहिती या लिस्टिंगमधून मिळत नाही. परंतु फोनचा मॉडेल नंबर Realme RMX3741 भारतीय सर्टिफिकेशन साइट BIS वर देखील दिसला आहे, त्यामुळे हा फोन लवकरच भारतात येईल हे स्पष्ट झालं आहे. हे देखील वाचा: 16GB RAM आणि 32MP Selfie कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो OPPO A98 5G फोन; माहिती लीक

त्याचबरोबर कंपनीनं सांगितलं आहे की Realme 11 Pro+ 5G मध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली जाईल, आणि फोनमध्ये 100W SUPERVOOC S फास्ट चार्जिंग दिली जाईल, ज्यासाठी यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्टचा वापर केला जाईल. या डिवाइसमध्ये स्वतंत्र पावर मॅनेजमेंट चिप दिली जाईल, त्यामुळे अधिक प्रभावीरीत्या बॅटरी लाइफचे व्यवस्थापन केलं जाईल.

रियलमी 11 प्रो+ 5जी चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

डिस्प्ले : Realme 11 Pro+ 5G मध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी + कर्व डिस्प्ले दिला जाऊ शकतो, हा अ‍ॅमोलेड पॅनल असू शकतो जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.

प्रोसेसर : या डिवाइसमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 प्रोसेसरचा वापर केला जाऊ शकतो.

स्टोरेज आणि रॅम : या फोनमध्ये 12जीबी पर्यंत रॅम आणि 256जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

ओएस : Realme 11 Pro+ 5G अँड्रॉइड 13 आधारित रियलमी युआय 4.0 वर चालू शकतो. हे देखील वाचा: भारतीय लाँचपूर्वीच लीक झाली OPPO F23 5G ची माहिती; किंमत आणि रेंडर्सही लीक

कॅमेरा : या डिवाइसमध्ये 200 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा ओआयएस सपोर्टसह दिला जाईल याची पुष्टी झाली आहे. तर फ्रंटला कंपनी 16 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याचा वापर करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here