एकच नंबर! मोटोरोलाचा स्वस्त स्मार्टफोन लाँच; 5000mAh च्या मोठ्या बॅटरीसह Moto E22s ची एंट्री

5000mah battery smartphone moto e22s launched budget Motorola mobile phone check price specifications

Motorola नं जागतिक बाजारात आपल्या ‘ई’ सीरीज अंतगर्त नवीन स्मार्टफोन Moto E22s लाँच केला आहे. हा एक स्वस्त लो बजेट मोबाइल फोन आहे जो सध्या युरोपियन बाजारात सादर करण्यात आला आहे. या सीरीजमधील Moto E32s स्मार्टफोन आधीच भारतात 9,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. त्यामुळे लवकरच Moto E22s देखील भारतीयांच्या सेवेत दाखल होऊ शकतो. पुढे आम्ही मोटोरोला मोटो ई22एसच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व प्राइसची माहिती दिली आहे.

Moto E22s चे स्पेसिफिकेशन्स

मोटोरोला मोटो ई22एस स्मार्टफोन 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. या मोटोरोला मोबाइलचे डायमेंशन 163.95 x 74.94 x 8.49एमएम आणि वजन 185ग्राम आहे. हे देखील वाचा: Motorola चा धमाका! भारतात लाँच केला मोठा डिस्प्ले असलेला स्वस्त टॅबलेट; इतकी आहे किंमत

5000mah battery smartphone moto e22s launched budget Motorola mobile phone check price specifications

Moto E22s अँड्रॉइड 12 आउट ऑफ द बॉक्ससह सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो जी57 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. युरोपमध्ये हा स्मार्टफोन 4 जीबी रॅमवर लाँच झाला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

5000mah battery smartphone moto e22s launched budget Motorola mobile phone check price specifications

फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. मोटो ई22एस च्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 16 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या मोटोरोला मोबाइलमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.

5000mah battery smartphone moto e22s launched budget Motorola mobile phone check price specifications

Motorola Moto E22s एक ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे तसेच हा मोबाइल फेस अनलॉक फीचरला देखील सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी मोटोरोला ई22एस मध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हे देखील वाचा: सॅमसंगच्या हद्दीत मोटोचा राडा! दोन-दोन डिस्प्लेसह लाँच केला Moto Razr 2022 फोल्डेबल स्मार्टफोन

Moto E22s Price

युरोपमध्ये मोटोरोला मोटो ई22एस सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. या फोनमध्ये 4 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या एकमेव मॉडेलची प्राइस 159 यूरो म्हणजे भारतीय चालनानुसार 12,500 रुपयांच्या आसपास आहे. युरोपमध्ये हा स्मार्टफोन Arctic Blue आणि Eco Black कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here