2023 मध्ये भारतात येऊ शकतात ‘हे’ दणकट स्मार्टफोन्स; पाहा यादी

Upcoming Flagship Phone in 2023: दरवर्षी अनेक स्मार्टफोन टेक मंचावर सादर केले जातात परंतु काही निवडक डिवायस गर्दीत देखील आपलं स्थान निर्माण करतात तसेच मोबाइल युजर्सचा विश्वास मिळवतात. सर्व स्मार्टफोन ब्रँड वेगवेगळ्या बजेट आणि कॅटेगरीमध्ये आपले प्रोडक्ट सादर करतात परंतु काही फ्लॅगशिप डिवायसची वाट अनेक महिने आधीपासून पाहिली जाते. साल 2023 मध्ये देखील अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेले असे काही स्मार्टफोन लाँच होणार आहेत जे बाजारात आल्यावर धुमाकूळ घालतील, परंतु लाँचच्या आधी देखील हे टेक विश्वात चर्चेचा विषय ठरले आहेत. पुढे आम्ही 2023 मध्ये लाँच होणाऱ्या काही बहुप्रतीक्षित फ्लॅगशिप फोन्सची माहिती दिली आहे जे आपल्या टेक्नॉलॉजी आणि पावरच्या जोरावर नवीन रेकॉर्ड बनवू शकतात.

2023 मध्ये लाँच होतील हे फ्लॅगशिप फोन :-

 • Samsung Galaxy S23
 • Samsung Galaxy S23 Ultra
 • Apple iPhone 15
 • Apple iPhone 15 Pro MAX
 • OnePlus 11
 • OnePlus 11R
 • OnePlus 11 Pro
 • Xiaomi 13
 • Xiaomi 13 Pro
 • Vivo X90
 • Vivo X90 Pro
 • Vivo X90 Pro+
 • Redmi Note 12 Pro 5G
 • Redmi Note 12 Pro+ 5G
 • iQOO 11 5G

Samsung Galaxy S23 बदलेल बाजाराचा मूड

सॅमसंग गॅलेक्सी एस23 बद्दल सांगितलं जात आहे की हा मोबाइल फोन 6.1 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असू शकते जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकते. प्रोसेसिंगसाठी या सॅमसंग फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट असल्याचं देखील रिपोर्ट्स व लीक्समध्ये समोर आलं आहे. Samsung Galaxy S23 चा 8जीबी रॅम व्हेरिएंट समोर आला आहे जोडीला 128जीबी व 256जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते . हे देखील वाचा: शाओमीनंतर आता Samsung ची बारी! आयफोनला लाजवणाऱ्या कॅमेऱ्यासह येऊ शकतो Galaxy S23 Ultra

Samsung Galaxy S23 ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो. या फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 12 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि 10 मेगापिक्सलची थर्ड लेन्स मिळू शकते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी एस23 मध्ये 10 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 3,900एमएएचची बॅटरी असल्याचं लीकमध्ये सांगण्यात आलं आहे.

Apple iPhone 15 सह मिळू शकते अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी

अ‍ॅप्पल निवडक मॉडेल्स घेऊन येते संपूर्ण लाईमलाईट आपल्या नावावर करते. साल 2023 मध्ये यावेळी हे काम करू शकतो iPhone 15. कंपनी या फोनचे प्रो आणि मॅक्स मॉडेल देखील सादर करू शकते तसेच हे सर्व आयफोन्स लेटेस्ट आणि अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजीसह येऊ शकतात. आयफोन 14 प्रो सह कंपनीनं नवीन नॉच डिजाईनची सुरुवात केली आहे आणि हाच ट्रेंड आयफोन 15 सीरीजमध्ये मिळू शकतो.

Apple iPhone 15 बद्दल चर्चा आहे की या फोनची किंमत यावेळी 1 लाखांच्या बजेटमध्ये जाऊ शकते. म्हणजे ही आतापर्यंतच्या सर्व आयफोन सीरीजमध्ये सर्वात महागडी असू शकते. फीचर्सवर नजर टाकता या फोनची थिकनेस फक्त 7.4एमएम असू शकते. नवीन बायोनिक प्रोसेसर आणि अ‍ॅडव्हान्स कॅमेरा नवीन आयफोन्समध्ये मिळू शकतो. या फोन संबंधित नवीन माहिती येताच ही बातमी अपडेट केली जाईल.

OnePlus 11 Pro मध्ये मिळेल कमालीची पावर

वनप्लसच्या आगामी नंबर सीरीजचा हा सर्वात पावरफुल स्मार्टफोन असू शकतो. ही स्मार्टफोन सीरीज 4 जानेवारीला चीनमध्ये लाँच होऊ शकते तसेच 7 फेब्रुवारीला भारतात एंट्री करू शकते. फोनची जास्त माहिती अद्याप समोर आली नाही परंतु एवढं निश्चित आहे की वनप्लस 11 प्रो क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटसह लाँच जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 13 सह ऑक्सीजनओएस 13 असल्याचं समजलं आहे. तसेच या फोनच्या सर्वात मोठ्या व्हेरिएंटमध्ये 16जीबी रॅम मिळू शकतो.

OnePlus 11 Pro बद्दल सांगण्यात आलं आहे की हा स्मार्टफोन 144हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या कर्व्ड डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो जो 2के रिजोल्यूशनला सपोर्ट करू शकतो. परंतु स्क्रीन साईज व पॅनलची माहिती समोर आली नाही. लीकनुसार हा वनप्लस स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो जी Hasselblad लेन्स असू शकते. हे देखील वाचा: लाँच पूर्वीच लीक झाले OnePlus 11 चे फोटो; पुढील आठवड्यात येतोय शक्तिशाली अँड्रॉइड फोन

Vivo X90 चे फीचर आणि स्पेक्स असू शकतात दमदार

विवो एक्स90 सीरीज ग्लोबली लाँच झाली आहे जी 2023 मध्ये भारतात एंट्री करू शकते. सीरीज अंतगर्त Vivo X90, Vivo X90 Pro आणि Vivo X90 Pro+ स्मार्टफोन लाँच झाले आहेत. ये सर्व 5G Vivo Phone आहेत. सीरीजचा सर्वात मोठा मॉडेल विवो एक्स90 प्रो प्लस 12GB RAM, Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेट, 50MP+50MP+48MP+64MP क्वॉड रियर कॅमेरा तसेच 32MP सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

विवो एक्स90 5जी पाहता हा स्मार्टफोन 6.78 इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. हा मोबाइल फोन देखील 12GB RAM + 512GB Storage सह लाँच झाला आहे तसेच प्रोसेसिंगसाठी यात MediaTek Dimensity 9200 चिपसेट देण्यात आला आहे. हा विवो मोबाइल 50MP+50MP+12MP रियर कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी 4,870एमएएचच्या बॅटरीसह 120W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग देण्यात आली आहे.

Samsung Galaxy S23 Ultra चे शक्तिप्रदर्शन

हा मोबाइल फोन 1440 x 3088 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या स्क्रीनसह लाँच होऊ शकतो जी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो. सॅमसंग गॅलेक्सी एस23 अल्ट्रा स्मार्टफोनमध्ये 3.36गीगाहर्ट्ज पर्यंतचा क्लॉक स्पीड असलेला ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच हा स्मार्टफोन 12 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 1टीबी पर्यंतच्या स्टोरेजसह लाँच होऊ शकतो.

Samsung Galaxy S23 Ultra मध्ये फोटोग्राफीसाठी 200 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. जोडीला 108 मेगापिक्सल + 12 मेगापिक्सल + 12 मेगापिक्सलचे सेन्सर मिळू शकतात. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. हा सॅमसंग फोन 4,885एमएएच बॅटरीसह बाजारात येऊ शकतो.

Xiaomi 13 Pro चा कॅमेरा आहे दमदार

Xiaomi 13 Series चीनमध्ये लाँच झाली आहे जी नव्या वर्षात भारतात येऊ शकते. यात Xiaomi 13 Pro 6.73 इंचाच्या क्वॉडएचडी+ ई6 अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे जो इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. अँड्रॉइड 13 आधारित मीयुआय 14 सह हा स्मार्टफोन 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: बाहुबली स्मार्टफोन लाँच! दणकट प्रोसेसर, शानदार कॅमेऱ्यासह Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro ची एंट्री

हा फोन चीनमध्ये 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेजसह लाँच झाला आहे. फोनच्या बॅक कॅमेरा सेटअपमध्ये 50MP Sony IMX989 सेन्सर + 50 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स + 50 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे तसेच फ्रंट पॅनलवर 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. 120वॉट फास्ट चार्जिंग, 50वॉट वायरलेस चार्जिंग आणि 10वॉट रिवर्स वायरलेस चार्जिंगसह फोनमध्ये 4,820एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

OnePlus 11 ठरू शकतो नवीन फ्लॅगशिप कीलर

वनप्लस 11 पाहता लीक्स नुसार हा स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजी असलेल्या 6.7 इंचाच्या क्वॉडएचडी+ पंच-होल डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो जो अ‍ॅमोलेड पॅनलवर बनला असू शकतो तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. या फ्लॅगशिप फोनमध्ये देखील क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट दिला जाऊ शकतो. OnePlus 11 16जीबी पर्यंतच्या रॅमला सपोर्ट करेल तसेच यात 512 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

फोटोग्राफीसाठी वनप्लस 11 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. लीकनुसार फोनच्या बॅक पॅनलवर 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सर, 48MP IMX581 अल्ट्रा वाइड लेन्स आणि 32MP IMX709 2x झूम कॅमेरा दिला जाऊ शकतो, या सर्व Hasselblad लेन्स असू शकतात. तसेच पावर बॅकअपसाठी OnePlus 11 मध्ये 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच बॅटरी मिळू शकते. हे देखील वाचा: काही मिनिटांत चार्जिंग फुल! 100W फास्ट चार्जिंगसह येतोय OnePlus Ace 2; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Xiaomi 13 5G देखील येऊ शकतो

शाओमी 13 5जी फोन 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.36 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल ओएलईडी डिस्प्लेवर चीनमध्ये लाँच झाला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट व 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. अँड्रॉइड 13 आधारित मीयुआय 14 सह हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटवर चालतो.

फोटोग्राफीसाठी शाओमी 13 5जी च्या रियर पॅनलवर 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 10 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे. हा फोन 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी शाओमी 13 5जी फोन 4,500एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. यात 67वॉट फास्ट चार्जिंग, 50वॉट वायरलेस चार्जिंग आणि 10वॉट रिवर्स वायरलेस चार्जिंग मिळते.

OnePlus 11R देऊ शकतो हायएन्ड स्पेसिफिकेशन्स

OnePlus 11 आणि OnePlus 11 Pro च्या तुलनेत वनप्लस 11आर थोडा हलका स्मार्टफोन असू शकतो परंतु हा हायएन्ड स्पेसिफिकेशन्स असलेला चांगला ऑप्शन ठरू शकतो. लीकनुसार हा मोबाइल फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन 1 चिपसेटसह लाँच होऊ शकतो, जोडीला 16 जीबी पावरफुल रॅम दिला जाऊ शकतो. तसेच या फोनचा 8जीबी रॅम व्हेरिएंट देखील बाजारात येण्याची शक्यता आहे.

हा स्मार्टफोन 6.7 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेसह लाँच होईल जो अ‍ॅमोलेड पॅनलवर बनला असेल तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. लीकनुसार, वनप्लस 11आर 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकतो तसेच पावर बॅकअपसाठी या वनप्लस मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते. वनप्लस 11आर मध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेन्सर देखील दिला जाऊ शकतो.

Redmi Note 12 Pro+ 5G चा कॅमेरा, प्रोसेसर आणि बॅटरी सर्वच दमदार

रेडमी नोट 12 प्रो+ 5जी फोन भारतात 5 जानेवारीला लाँच होऊ शकतो. चिनी मॉडेलचे यात 6.67 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट व 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन 12 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगच्या बाबतीत देखील हा प्रो मॉडेल प्रमाणे मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेटवर चालतो तसेच ग्राफिक्ससाठी माली-जी68 जीपीयूला सपोर्ट करतो.

Redmi Note 12 Pro+ 5G चा कॅमेरा याची मेन यूएसपी आहे. हा फोन 200MP Samsung HPX रियर सेन्सरला सपोर्ट करतो जो एफ/1.65 अपर्चरसह येतो. ही 7पी लेन्स आहे जी एएलडी कोटेड आहे. त्याचबरोबर फोनच्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये 8एमपीची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2एमपीचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. रेडमी नोट 12 प्रो+ 5जी 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या रेडमी फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 120वॉट फास्ट चार्जिंगसह येते.

iQOO 11 5G मिनिटांत होईल फुल चार्ज

आयकू 11 5जी फोन 10 जानेवारीला भारतात लाँच होऊ शकतो. या स्मार्टफोनच्या चिनी मॉडेलमध्ये 6.78 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 144हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. इंटरनॅशनल मार्केटमध्ये हा स्मार्टफोन 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटवर लाँच झाला आहे जो 16 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 512 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह iQOO 11 आणि iQOO 11 Pro लाँच; वनप्लसला मिळणार खरी टक्कर

फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे आणि ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 8 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी कंपनीनं 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here