अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेल 2023: स्वस्त 5जी फोन झाले आणखी स्वस्त

अ‍ॅमेझॉनचा प्राइम डे सेल सुरु झाला आहे आणि तुम्हाला माहित असेल की ह्या सेलसह प्राइम युजर्सना शानदार ऑफर मिळतात. ह्यावेळी देखील कंपनीनं काही शानदार डील्स आणल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करतात असाल तर ही योग्य वेळ ठरेल. कंपनी जवळपास प्रत्येक सेगमेंटमध्ये प्रोडक्ट्सवर मोठी सूट देत आहे. परंतु ह्या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला 5जी फोनवर मिळणाऱ्या बेस्ट डीलची देणार आहोत.

रेडमी नोट 12 5जी

सर्वप्रथम रेडमीच्या लोकप्रिय स्मार्टफोन रेडमी नोट 12 5जीची डील पाहू. हा फोन 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 चिपसेटवर चालतो आणि ह्यात 2.0 गीगाहर्ट्झचा ऑक्टा कोर प्रोसेसर मिळतो. फोटोग्राफीसाठी कंपनीनं हा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सादर केला आहे ज्यात 48 एमपीच्या मुख्य कॅमेऱ्यासह 8 एमपीचा अल्ट्रा वाइड आणि 2 एमपीची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फीसाठी ह्यात 32 एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन 6.67 इंचाच्या मोठी स्क्रीनसह येतो आणि कंपनीनं अ‍ॅमोलेड पॅनलचा वापर केला आहे. पावर बॅकअपसाठी ह्या फोनमध्ये 33 वॉटच्या फास्ट चार्जिंगसह 5,000 एमएएचची बॅटरी मिळते.

सॅमसंग गॅलेक्सी एम34 5जी

ह्या लिस्टमध्ये दुसरे नाव सॅमसंगच्या लेटेस्ट फोन गॅलेक्सी एम34 5जीचे आहे. फोनमध्ये 6.5-इंचाची 120 हर्ट्झ सुपर अ‍ॅमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन एक्सिनॉस 1280 चिपसेटवर सादर करण्यात आला आहे. हा प्रासेसर 12 5जी बँड्सना सपोर्ट करतो. कंपनीनं हा 50MP+8MP+2MP च्या ट्रिपल कॅमेऱ्यासह सादर केला आहे. तसेच 6,000 एमएएचची मोठी बॅटरी मिळते.

रेडमी 11 प्राइम 5जी

अफोर्डेबल 5जी फोनमध्ये, शाओमीच्या रेडमी 11 प्राइम 5जीचं नाव नक्की येतं आणि हा फोन अ‍ॅमेझॉनच्या हाय लिस्टमध्ये देखील आहे. फोनवर तुम्हाला मोठा डिस्काउंट मिळत आहे. रेडमी 11 प्राइम 5जीचे स्पेसिफिकेशन पाहता फोनमध्ये 6.58 इंचाची एफएचडी+ स्क्रीन आहे जी 90 स्क्रीन रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 700 प्रोसेसरवर चालतो. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी 50 एमपीचा एआय ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर फ्रंटला 8 एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे.

ओप्पो ए78 5जी

ओप्पोचा हा फोन स्टाइलिश दिसतो आणि अ‍ॅमेझॉनवर मिळणाऱ्या ऑफर्ससह चांगली निवड ठरू शकतो. फोनचे स्पेसिफिकेशन पाहता ह्यात 6.56 इंचाचा डिस्प्ले आहे जो 90 हर्ट्झ स्क्रीन रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं हा 5,000 एमएएचच्या बॅटरीसह सादर केला आहे आणि फोनमध्ये 33 वॉट सूपरवूक चार्जिंग सपोर्ट आहे. फोनमध्ये 50 एमपीच्या मेन एआय कॅमेऱ्यासह 2 एमपीचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंटला 8 एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे. कंपनीनं हा मीडियाटेक डायमेन्सिटी 700 प्रोसेसरसह सादर केला आहे.

वनप्लस नॉर्ड सीई 2 लाइट 5जी

अ‍ॅमेझॉनचा हा सेल वनप्लस फॅनसाठी खुशखबर घेऊन आला आहे. ह्या सेलमध्ये तुम्ही वनप्लस नॉर्ड सीई 2 लाइट सर्वात कमी किंमतीत विकत घेऊ शकता. हा फोन 6.59 इंचाच्या फुल एचडी+ डिस्प्लेसह येतो जो 120 हर्ट्झ पर्यंतचा रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. अँड्रॉइड 12 आधारित हा फोन क्वॉलकॉमच्या दमदार 5जी प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 695 वर चालतो. फोनमध्ये 5,000 एमएएचच्या बॅटरीसह 33 वॉट सूपरवूक चार्जर मिळतो. कंपनीनं हा 64 एमपीच्या ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह सादर केला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम14 5जी

सॅमसंगचा स्वस्त 5जी फोन इथे आणखी शानदार किंमतीत उपलब्ध झाला आहे. हा तुम्ही फक्त 14,490 रुपयाच्या डील प्राइसमध्ये विकत घेऊ शकता. गॅलेक्सी एम14 5जी एक्सिनॉस 1330 चिपसेटवर चालतो आणि ह्यात तुम्हाला ऑक्टाकोर प्रोसेसर मिळतो. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी 50 एमपीचा ट्रिपल रियर कॅमेरा आणि 13 एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित वन युआय 5.1 वर चालतो. तसेच व्हॉइस फोकस, सॅमसंग वॉलेट आणि सिक्योर फोल्डर सारखे प्रीमियम फीचर्सही कंपनी देत आहे.

रेडमी के50आय 5जी

रेडमी के50आय 5जी देखील ह्या सेलमध्ये चांगल्या ऑफर्ससह उपलब्ध आहे. हा फोन दमदार मीडियाटेक डायमेन्सिटी 8100 प्रोसेसरवर चालतो. हा प्रोसेसर भारतातील जवळपास सर्व 5जी बँड्सना सपोर्ट करू शकतो. 5जी सह हा फोन तुम्हाला दमदार फोटोग्राफी देतो. फोनमध्ये 64 एमपीचा ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे जो खूप चांगला म्हणता येईल. डिस्प्ले पाहता ह्यात 6.6 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे जो 144 हर्ट्झ स्क्रीन रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच फोनमध्ये डॉल्बी व्हिजन सपोर्ट आहे जो व्यू एक्सपीरियंस आणखी शानदार बनवतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी

सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीज अ‍ॅमेझॉन स्टोरवर सेलसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे गॅलेक्सी ए सीरीजच्या जवळपास सर्व फोनवर चांगली डील मिळत आहे. ह्या सेलमध्ये गॅलेक्सी ए23 तुम्ही शानदार ऑफर्ससह घेता येईल. हा फोन 6जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरीसह येतो. हा 6.6 इंचाच्या फुल एचडी+ डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे, जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. त्याचबरोबर 5,000 एमएएचची मोठी बॅटरी उपलब्ध आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस20 एफई 5जी

सॅमसंगचा फ्लॅगशिप ग्रेड फोन गॅलेक्सी एस 20 एफई 5जी देखील ह्या सेलमध्ये शानदार ऑफरसह उपलब्ध आहे. कंपनीनं हा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसरसह सादर केला आहे जो फ्लॅगशिप ग्रेड परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. कंपनीनं ह्यात 12 एमपीचा ओआयएस कॅमेरा दिला आहे जो ड्युअल पिक्सलला सपोर्ट करतो. जोडीला 8 एमपीची ओआयएस टेलीफोटो लेन्स आणि 12 एमपीचा ही अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळतो. फोनमध्ये 6.5-इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह येतो. त्याचबरोबर 4,500 एमएएचची बॅटरी फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. तसेच ह्यात वायरलेस चार्जिंग आणि आयपी68 सपोर्ट आहे.

ओप्पो एफ23 5जी

5जीसाठी ओप्पो फोनचा पर्याय निवडायचा असेल तर ओप्पो एफ23 5जी पाहता येईल. हा फोन फक्त स्टाइलिश दिसत नाही तर परफॉर्मन्स देखील दमदार आहे. कंपनीनं हा 6.72 इंचाच्या फुल एचडी स्क्रीनसह सादर केला आहे आणि फोनमध्ये 120 हर्ट्झचा रिफ्रेश रेट मिळतो. फोटोग्राफीसाठी ह्यात 64 एमपीचा ट्रिपल कॅमेरा आणि फ्रंटला 32 एमपीचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. हा फोन अँड्रॉइड 13 वर चालतो आणि ह्यात 67 वॉटच्या फास्ट चार्जिंगसह 5,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here