Samsung Galaxy M21 स्मार्टफोन झाला स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत

सॅमसंगने आपली बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy M21 च्या किंमतीत कपात केली आहे. Galaxy M21 स्मार्टफोनच्या किंमतीत कंपनीने 1500 रुपयांची (Samsung Galaxy M21 New Price) कपात आहे. सॅमसंगने गेल्यावर्षी Galaxy M21 इंडियन स्मार्टफोन मार्केटमध्ये लॉन्च केला होता. Galaxy M21 स्मार्टफोन सॅमसंगने 6000mAh ची बॅटरी, 48 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा आणि 20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासह सादर केला आहे. जर तुम्ही सॅमसंगचा हा स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर सॅमसंगने Galaxy M21 च्या किंमतीत कपात केली आहे. (Samsung Galaxy M21 gets price cut in India check new India Price and specifications)

Samsung Galaxy M21 ची नवीन किंमत

Samsung Galaxy M21 स्मार्टफोन कंपनीने दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला आहे. Samsung Galaxy M21 स्मार्टफोन 4GB रॅम + 64GB स्टोरेज वेरिएंट ऑनलाइन मार्केट 6GB रॅम + 128 GB स्टोरेज वेरिएंट ऑफलाइन मार्केटमध्ये लॉन्च केला गेला आहे. दोन्ही स्मार्टफोनच्या किंमतीत कंपनीने 1500 रुपयांची कपात केली आहे. Samsung Galaxy M21 स्मार्टफोनचा 4GB रॅम + 64GB स्टोरेज वेरिएंट आता 12,499 रुपयांची किंमत (Samsung Galaxy M21 Price In India) मध्ये विकत घेता येईल. तसेच 6GB रॅम + 128 GB स्टोरेज वेरिएंट 14,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

हे देखील वाचा : Samsung Galaxy A32 स्मार्टफोनवर मिळत आहे 3000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, सविस्तर जाणून घ्या ऑफर

Samsung Galaxy M21 स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M21 स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेमध्ये फ़्रंट कॅमेऱ्यासाठी वाटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. डिस्प्लेचा आसपेक्ट रेश्यो 20:9 आहे. तसेच डिस्प्लेचे रिजोल्यूशन 2400 × 1080 पिक्सल आहे. डिस्प्लेमध्ये कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन मिळते. Galaxy M21 स्मार्टफोनमध्ये सॅमसंगचा Exynos 9611 चिपसेट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 10 सह कंपनीच्या कस्टम युआयसह सादर केला गेला आहे.

हे देखील वाचा : Oppo A35 स्मार्टफोन 13 MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि Helio P35 सह लॉन्च, जाणून घ्या खासियत

Samsung Galaxy M21 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्राइमेरी कॅमेरा 48-मेगापिक्सलचा आहे, तसेच फोनमध्ये 5-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि 8-मेगापिक्सलचा वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे. फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Galaxy M21 मध्ये 20-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी आणि 15W का फास्ट चार्जर मिळत आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम21 व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here