Realme 8 5G स्मार्टफोनचा भारतातील लॉन्च निश्चित, समोर आले नवीन स्पेसिफिकेशन्स

Realme 8 5G स्मार्टफोनच्या लॉन्चसाठी आता कमी वेळ उरला आहे. रियलमीचा हा स्मार्टफोन थायलंडमध्ये 21 एप्रिलला लॉन्च होईल. रियलमी लवकरच भारतात हा स्मार्टफोन लॉन्च करेल. रियलमी इंडियाने ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Flipkart वर लिस्ट करून या फोनचा भारतातील लॉन्चची पुष्टी केली आहे. सध्या रियलमी 8 5G स्मार्टफोनच्या इंडिया लॉन्चच्या डेट बद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. Realme 8 5G स्मार्टफोनच्या लॉन्चपूर्वी हा स्मार्टफोन Google Play Console वर स्पॉट केला गेला आहे. गुगल प्ले कंसोलवर या स्मार्टफोनची लिस्टिंग सर्वप्रथम MySmartPrice ने रिपोर्ट केला आहे. या लिस्टिंगच्या माध्यमातून काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. (Realme 8 5G India launch tease on Flipkart Google play console listing revealed some specifications check details)

Realme 8 5G चा भारतातील लॉन्च निश्चित

ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर Realme 8 5G स्मार्टफोन टीज केला गेला आहे. म्हणजे रियलमी लवकरच हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्याचे प्लानिंग करत आहे. फ्लिपकार्टवरील टीजरनुसार हा फोन 16 एप्रिलला समोर येईल. तसेच रियलमी इंडियाने ट्वीट करून MediaTek Dimensity 700 SoC सह आगामी स्मार्टफोन टीज केला आहे.

Realme 8 5G : Google Play Console लिस्टिंग

Realme 8 5G स्मार्टफोनच्या Google Play Console लिस्टिंगनुसार हा अपकमिंग स्मार्टफोन MediaTek MT6882 चिपसेट म्हणजे MediaTek Dimensity 800 SoC सह लॉन्च केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये ग्राफिक्ससाठी Mali-G57 MC2 GPU देण्यात आला आहे. तसेच रियलमीचा हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित कंपनीच्या कस्टम युआयवर चालेल.

हे देखील वाचा : Samsung Galaxy A32 स्मार्टफोनवर मिळत आहे 3000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, सविस्तर जाणून घ्या ऑफर

Realme 8 5G

रियलमीचा अपकमिंग 5G स्मार्टफोन 8GB RAM सह सादर केला जाऊ शकतो. रियलमी 8 5G स्मार्टफोन यापूर्वी Geekbench च्या लिस्टिंगमध्ये MediaTek Dimensity 700 SoC सह स्पॉट केला गेला होता. Realme 8 5G स्मार्टफोनचे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता या फोनमध्ये FHD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचे रिजोल्यूशन 1080 x 2400 पिक्सल असू शकते. अंदाज लावला जात आहे कि Realme 8 5G स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च झालेल्या Realme V13 5G चा रिब्रँड असू शकतो.

हे देखील वाचा : Samsung Galaxy M21 स्मार्टफोन झाला स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत

Realme 8 5G च्या टीजरमध्ये दिसली झलक

Realme 8 5G स्मार्टफोनच्या टीजरमध्ये या स्मार्टफोनच्या डिजाइनची झलक दिसली आहे. त्याचबरोबर रियलमीच्या या स्मार्टफोनचे कलर वेरिएंट्स पण समोर आले आहेत. रियलमीचा हा स्मार्टफोन दोन कलर ऑप्शन सुपरसोनिक ब्लू आणि सुपरसोनिक ब्लॅकमध्ये सादर केला जाऊ शकतो. रियलमीचा अपकमिंग 5G स्मार्टफोन 8.5mm जाड आणि 185 ग्राम वजनाचा असू शकतो. डिजाइन पाहता Realme 8 5G स्मार्टफोनच्या मागे चौकोनी कॅमेरा मॉड्यूल दिला जाऊ शकतो. या फोनचा प्राइमेरी कॅमेरा 48MP चा असू शकतो.

Realme V13 5G स्पेसिफिकेशन्स

Realme V13 5G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन FHD+, रिफ्रेश रेट 90Hz, टच सॅंपिंग रेट 180Hz आणि मॅक्सिमम ब्राइटनेस 600 निट्स आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी डिस्प्लेमध्ये पंच होल कटआउट देण्यात आला आहे. रियलमीचा हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 700 SoC सह 8GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेजसह सादर केला गेला आहे. तसेच रियलमीचा हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित Realme UI 2.0 वर चालतो.

Realme V13 मध्ये कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये प्राइमेरी कॅमेरा 48MP मेगापिक्सलचा आहे, तसेच 2MP चा मॅक्रो कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरी पाहता या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्ज देण्यात आला आहे. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये डुअल-SIM, डुअल-5G, डुअल-बॅंड Wi-Fi ac, Bluetooth v5.1, GPS, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जॅकसह सादर केला गेला आहे. तसेच या फोनमध्ये सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here