Apple iPhone Discount: आज म्हणजे 7 सप्टेंबरला Apple iPhone 14 सीरीज लाँच होणार आहे. iPhone 14 Launch होण्याआधी कंपनीच्या जुन्या मॉडेल iPhone 13 आणि iPhone 12 वर डिस्काउंटची घोषणा करण्यात आली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आयफोन 14 ची किंमत जास्त असेल आणि तुमच्या बजेटमध्ये बसणार नाही तर तुम्ही आयफोन 13 आणि आयफोन 12 विकत घेण्याचा विचार करू शकता. चला जाणून घेऊया कुठे आणि कधी हे iPhone Model डिस्काउंटसह विकत घेता येतील.
इथे मिळतील स्वस्तात iPhone
Amazon Great Indian Festival sale दरम्यान iPhone 12 आणि iPhone 13 डिस्काउंटसह सादर केले जातील. अजूनतरी अॅमेझॉन सेलची तारीख समोर आली नाही. परंतु Great Indian Festival sale त्याच दिवशी सुरु होईल ज्या दिवशी Flipkart Big Billion Days sale 2022 सुरु होणार आहे. म्हणजे अॅमेझॉन सेल देखील या महिन्याच्या अखेरीस सुरु होऊ शकतो. हे देखील वाचा: जुन्या आयफोन्सपेक्षा स्वस्तात लाँच होणार का iPhone 14; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि मॉडेल्सची सविस्तर माहिती
Amazon नं ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमधील डील्सचा खुलासा केला आहे, ज्यात iPhone 12 आणि iPhone 13 सीरीजवरील मोठ्या डिस्काउंटचा समावेश देखील आहे. विशेष म्हणजे याकाळात फ्लिपकार्ट देखील iPhone 13 आणि अन्य मॉडेल्स डिस्काउंटसह विकण्यास सुरु करेल. म्हणजे सणासुदीच्या दिवसांमध्ये एक नवीन आयफोन विकत घेणं चांगलं ठरू शकतं.
या फोनवर देखील मिळेल डिस्काउंट
याव्यतिरिक्त, अॅमेझॉन टीजरमधून असा देखील खुलासा झाला आहे की ई-कॉमर्स साइटवर काही लोकप्रिय फोन्सवर सुरु दिली जाईल, ज्यात iQOO 9T, OnePlus 10T, आणि अनेक अन्य Samsung, Realme, Redmi, iQOO, Oppo, Vivo, Lava, Nokia फोन्सचा समावेश असेल. तसेस अॅमेझॉनकडून टीव्ही, घरगुती उपकरणे आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर देखील सूट देण्यात येईल.
SBI कार्डवर मिळेल एक्स्ट्रा डिस्काउंट
ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये Amazon नं 10 टक्के अतिरिक्त तात्कळ डिस्काउंटसाठी भारतीय स्टेट बँक (SBI) सह भागेदारी केली आहे. ही बँक ऑफर एसबीआय डेबिट कार्डसह क्रेडिट कार्ड्सवर देखील उपलब्ध होईल. हे देखील वाचा: रेडमी-रियलमी राहणार मागे! 13GB RAM, 64MP कॅमेऱ्यासह येतोय हा बाहुबली Phone
iPhone14 Series Price
आयफोन 14 सीरीजबद्दल अनेक प्रकारच्या बातम्या आणि लीक्स इंटरनेटवर येत आहेत परंतु या फोन्सच्या किंमतीबाबत बोलायचं तर लीक्सनुसार iPhone 14 ची प्रारंभिक किंमत 749 डॉलर्स म्हणजे जवळपास 59,500 रुपयांच्या आसपास असेल.
तसेच iPhone 14 Max ची Price 849 डॉलर्स म्हणजे जवळपास 67,000 रुपये तर iPhone 14 Pro ची किंमत 1049 म्हणजे 83,000 रुपयांच्या आसपास ठेवण्यात येईल. तर आयफोन 14 सीरीजमधील सर्वात मोठ्या मॉडेल iPhone 14 Pro Max ची किंमत 1149 डॉलर्स म्हणजे जवळपास 91,000 रुपयांपासून सुरु होऊ शकते.