ASUS ROG Phone 3 ची किंमत झाली कमी, कंपनीने केली सर्व वेरिएंट्सच्या किंमतीत कपात

मोबाईल गेमिंगच्या चाहत्यांना विचारले कि स्मार्टफोन मध्ये गेम खेळण्यासाठी सर्वात बेस्ट फोन कोणता आहे, तर जास्तीत जास्त लोकांचे उत्तर Asus ROG Phone 3 असेल. कदाचित हा फोन सर्वजण वापरत नसतील, पण या फोनची क्षमता जाणून आहेत. ताकदवान स्पेसिफिकेशन्स असलेला स्मार्टफोन पर्यंत युजर्सना सहज पोहोचता यावे म्हणून असूसने आपल्या डिवायसच्या किंमतीत थेट 3,000 रुपयांची कपात केली आहे. या प्राइस कट सोबतच कंपनी फोनच्या खरेदीवर अनेक चांगल्या ऑफर पण देत आहे.

Asus ROG Phone 3 भारतीय बाजारात तीन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने तिन्हींची किंमत 3,000 रुपये कमी केली आहे. या प्राइस कट नंतर फोनचा 49,999 रुपयांमध्ये विकल्या जाणाऱ्या 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 46,999 रुपये झाली आहे. तर फोनचा 12 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 52,999 रुपयांच्या ऐवजी 49,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. तर आरओजी फोन 3 चा सर्वात मोठा 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट आता 54,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल, आतापर्यंत या वेरिएंटची विक्री 57,999 रुपये होती.

किंमत कमी करण्याव्यतिरिक्त ROG Phone 3 च्या खरेदीवर Asus ने इतर आर्कषक ऑफर्स पण दिल्या आहेत. कंपनीने आपल्या फोनचे सर्व वेरिएंट्स नो कॉस्ट ईएमआई वर विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहे, याअंतर्गत 3 महीने, 6 महीने आणि 9 महिन्याचे ईएमआई देता येतील. तसेच 4 नोव्हेंबर पर्यंत शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून हा फोन विकत घेताना ऍक्सिस बँकेच्या कार्डचा वापर केल्यावर 10 टक्क्यांचा एक्स्ट्रा डिस्काउंट पण मिळेल.

ASUS ROG Phone 3

असूस आरओजी फोन 3 को 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.59 इंचाच्या एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो 144हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 270हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट वर चालतो. हि स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येते जी 2.5डी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्ट केली गेली आहे. ROG Phone 3 च्या बॅक पॅनल वर RGB लाइटिंग आहे जी नोटिफिकेशन्स इत्यादि सह चमकते.

हे देखील वाचा : सर्वात ताकदवान प्रोसेसर आणि फ्लिप कॅमेरा असलेले ASUS ZenFone 7 आणि 7 Pro झाले लॉन्च, चीनी कंपन्यांना मिळेल टक्कर

Asus ROG Phone 3 अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो 3.1गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या 64 बिट ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या स्नॅपड्रॅगॉन 865 प्लस चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये एड्रेनो 650जीपीजू देण्यात आला आहे. हेवी गेमिंग करताना फोन गरम होऊ नये म्हणून आरओजी फोन 3 “गेमकूल 3” कूलिंग सिस्टम सह येतो. तसेच फोन मध्ये टच सेंसिटिव अल्ट्रासॉनिक बंपर/शोल्डर बटन एयरट्रिगर सारखे ऍडव्हान्स फीचर्स आहेत.

फोटोग्राफीसाठी Asus ROG Phone 3 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा SONY IMX686 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्यासोबत एफ/2.4 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेंसर आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 24 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हा फोन 30वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 6,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

आसूस आरओजी फोन 3 व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here