मोठ्या पडद्याची मजा मिळवा घरच्या घरी; 75 इंचाच्या या स्मार्ट टीव्हीवर दिसतील सर्व डिटेल्स

Blaupunkt 75 Inch Screen Smart Tv Sale Flipkart Big Billion Days Lowest Price Offers

Blaupunkt नं आपला 75 इंच स्क्रीन साइज असलेला मोठा स्मार्ट टीव्ही भारतात लाँच केला आहे. जर तुम्ही देखील सिनेप्रेमी असाल आणि चित्रपटगृहाची मजा तुम्हाला घरच्या घरी हवी असेल तर हा टीव्ही तुम्हाला मदत करेल. ही मोठ्या साइजची टीव्ही विकत घेतल्यास तुम्हाला ग्रँड मूव्ही हॉलचा अनुभव मिळेल. Blaupunkt च्या या 75-inch TV बद्दल बोलायचं तर यात Dolby Vision आणि ATMOS सपोर्ट देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या मोठ्या स्मार्ट टीव्हीची किंमत आणि फीचर्स.

किंमत आणि सेल

Blaupunkt QLED स्मार्ट टीव्ही कंपनीनं 84,999 रुपयांमध्ये सादर केला आहे. टीव्हीची विक्री 23 सप्टेंबर 2022 पासून सुरु होईल. अलीकडेच लाँच करण्यात आलेले QLED TV मॉडेल 50, 55 आणि 65 इंच स्क्रीन साइजची सेल देखील फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल म्हणजे 23 सप्टेंबर 2022 पासून सुरु होईल, ही सेल 30 सप्टेंबरपर्यंत सुरु राहील.हे देखील वाचा: वनप्लसला टक्कर देणारे Samsung चे स्मार्टफोन 30 हजारांच्या आत; Galaxy S20 FE आणि Galaxy S21 FE 5G वर मोठा डिस्काउंट

Blaupunkt 75 Inch Screen Smart Tv Sale Flipkart Big Billion Days Lowest Price Offers

ऑफर

या सेलमध्ये Flipkart Axis बँक क्रेडिट कार्डनं खरेदी केल्यास 8 टक्के डिस्काउंट दिला जात आहे. तसेच ICICI बँक कार्डवर 10 टक्के सूट मिळत आहे. Paytm वरून खरेदी केल्यास 10 टक्के इश्योर्स सेविंगचा ऑप्शन दिला जात आहे.

स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Blaupunkt चा 75 इंचाच्या बेजेललेस प्रीमियम टीव्हीचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स पाहता हा टीव्ही 4k रेजोल्यूशनला (3840 × 2160 पिक्सल) सपोर्टसह येतो. या टीव्हीमध्ये डिजिटल नॉइज फिल्टर आणि गुगल असिस्टंट सपोर्ट देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर स्मार्ट टीव्हीमध्ये सिनेमॅटिक आणि रिच साउंड क्वॉलिटी सपोर्ट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: चिनी कंपन्यांना आस्मान दाखवण्यासाठी स्वदेशी Lava Blaze Pro लाँच; 10,499 रुपयांमध्ये 6X झूम असलेला कॅमेरा

Blaupunkt 75 Inch Screen Smart Tv Sale Flipkart Big Billion Days Lowest Price Offers

टीव्हीमध्ये 1.5 गिगाहर्टज क्वॉड-कोर मीडियाटेक MT9602 (A53) प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी Mali-G52 MC1 GPU देण्यात आला आहे. टीव्ही 2GB रॅम आणि 32GB रॅमला सपोर्ट करतो. शानदार साउंडसाठी टीव्हीमध्ये 60W स्पिकर आउटपुट देण्यात आला आहे. हा टीव्ही अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. हा टीवी वायफाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.0, 3 HDMI पोर्ट, 2 यूएसबी पोर्ट, एवी इनपुट आणि 1 ईथरनेट पोर्ट अशा कनेक्टिव्हिटी ऑप्शन्ससह बाजारात आला आहे.

या टीव्हीमध्ये डॉल्बी व्हिजन, डॉल्बी डिजिटल प्लस, डॉल्बी अ‍ॅटमॉस आणि DTS ट्रू-सराउंड साउंड टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. तसेच यात 6000 पेक्षा जास्त अ‍ॅप्स आणि गेमिंग अ‍ॅप्स उदा. Netflix, Prime Video, Hotstar, Zee5 सपोर्ट देण्यात आला आहे. टीव्हीमध्ये 550 nits पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here