स्वदेशी Lava Blaze Pro लाँच; 10,499 रुपयांमध्ये 6X झूम असलेला कॅमेरा

Lava Blaze Pro Smartphone Launched In India Price Specifications Sale Offer Deals Details

भारतीय स्मार्टफोन बाजारात चिनी कंपन्यांचा दबदबा आहे, निवडक भारतीय कंपन्या या ब्रँडशी लढा देत आहेत. यात Lava कंपनीचा देखील समावेश आहे. आपल्या फिचर फोन्ससाठी लोकप्रिय असलेल्या लावानं आज भारतात आपला नवीन आणि दमदार स्मार्टफोन Lava Blaze Pro लाँच केला आहे. याआधी कंपनीनं सादर केलेल्या Lava Blaze च्या यशानंतर आता नवीन लावा ब्लेज प्रो फोन बाजारात आला आहे. ज्याची किंमत 10,499 रुपये ठेवण्यात आली आहे.

हा नवीन लावा स्मार्टफोन फ्रॉस्टेड ग्लास बॅक स्टाइलसह सादर करण्यात आला आहे आणि यात शानदार कॅमेरा टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. फोनमध्ये 6.5 इंचाचा मोठा डिस्प्ले, दमदार Helio G37 प्रोसेसर, मोठी बॅटरी, 6X झूमसह 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअपसह अनेक शानदार फिचर देण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया स्वदेशी Lava Blaze Pro च्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती.

Lava Blaze Pro Specifications

Lava Blaze Pro Smartphone Launched In India Price Specifications Sale Offer Deals Details

लावा ब्लेज प्रो स्मार्टफोनमध्ये 6.5 HD+ Notch डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात 90Hz रिफ्रेश रेट आणि 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेश्यो मिळतो. कंपनी 100 दिवसांची स्क्रीन रिप्लेसमेंट मोफत देत आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हे देखील वाचा: Jio 5G येण्याआधीच अंबानींच्या कंपनीला मोठा फायदा; Airtel आणि Vi राहिले मागे

फोनमध्ये ऑक्टा कोर MediaTek Helio G37 प्रोसेसर देण्यात आला आहे. नवीन लावा स्मार्टफोन Android 12 वर चालतो. हा फोन 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह बाजारात आला आहे. स्मार्टफोनमधील स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं 256GB पर्यंत वाढवता येते. तर 3GB अतिरिक्त रॅम मिळवण्यासाठी एक्सटेंडेड रॅम फिचर देखील देण्यात आलं आहे.

फोनच्या सुरक्षेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिन्ट सेन्सर देण्यात आला आहे. Lava Blaze Pro फेस अनलॉकला देखील सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटीसाठी या स्वदेशी स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम 4G, Wi-Fi 802.11 b/g/n/ac, आणि Bluetooth 5.0 सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच चार्जिंगसाठी यात यूएसबी Type-C पोर्ट असून सोबत एक 3.5mm हेडफोन जॅक देखील मिळतो.

Lava Blaze Pro स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर 6X जूम सपोर्टसह मिळतो. जोडीला 2 मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा लेन्स आणि तिसरा डेप्थ कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हे देखील वाचा: Jio 5G येण्याआधीच अंबानींच्या कंपनीला मोठा फायदा; Airtel आणि Vi राहिले मागे

Lava Blaze Pro Smartphone Launched In India Price Specifications Sale Offer Deals Details

Lava Blaze Pro Price

कंपनीनं Lava Blaze Pro स्मार्टफोनचा एकच 4GB रॅम व 64GB स्टोरेज व्हेरिएंट सादर केला आहे. ज्याची किंमत कंपनीनं 10,499 रुपये ठेवली आहे. लवकरच यापेक्षा छोटा बेस व्हेरिएंट बाजारात येणार असल्याची माहिती देखील कंपनीनं दिली आहे. युजर्सना स्मार्टफोनसाठी ग्लास ग्रीन, ग्लास ऑरेंज, ग्लास ब्लू, ग्लास गोल्ड सारख्या चार वेगवेगळ्या कलर व्हेरिएंटमध्ये विकत घेता येईल. या स्वदेशी स्मार्टफोनची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart सह लावा ई-स्टोर आणि रिटेल स्टोरवर देखील केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here