330 रुपयांच्या मासिक हप्त्यावर मिळवा Realme C21Y; 5000mAh ची बॅटरी आणि 4 कॅमेरे स्वस्तात

Realme C21Y स्मार्टफोन भारतात HD+ डिस्प्ले, UNISOC T610 चिपसेट, 4GB रॅम आणि 5,000mAh च्या बॅटरीसह आला आहे. कंपनीनं या स्मार्टफोनची किंमत देखील अगदी बजेटमध्ये ठेवली आहे. तरीही जर तुमचं बजेट कमी असेल तर हा फोन तुम्ही फक्त 330 रुपयांमध्ये घरी घेऊन येऊ शकता. यासाठी तुम्हाला ईएमआयचा पर्याय निवडावा लागेल. पुढे आम्ही याची सविस्तर माहिती दिली आहे.

Realme C21Y वरील ऑफर

Realme C21Y जेव्हा भारतात लाँच झाला होता तेव्हा या स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 9499 रुपये ठेवण्यात आली होती. हा फोन ई-कॉमर्स शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट, रियलमीच्या वेबसाईटसह ऑफलाईन स्टोरवर देखील उपलब्ध आहे. तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून मोठी सूट मिळवू शकता. किंवा फ्लिपकार्टवरून हा स्मार्टफोन फक्त 330 रुपयांच्या मासिक हप्त्यावर देखील खरेदी करता येईल.

Realme C21Y ची किंमत

Realme C21Y स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतीयांच्या भेटीला आले आहेत. यातील 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत 9499 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेला मॉडेल 10599 रुपयांमध्ये विकत घेता येईल. स्मार्टफोनचे ब्लॅक आणि ब्लू कलर ऑप्शन बाजारात उपलब्ध आहेत.

Realme C21Y चे स्पेसिफिकेशन्स

Realme C21Y स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. नॉच डिजाईनसह या हँडसेटची बाजारात एंट्री झाली आहे. रियलमीच्या या फोनचा बॅक पॅनल पॉलीकार्बोनेटपासून बनवण्यात आला असून मागे डायमंड कट डिजाइन दिसते. रियर पॅनलवर सुरक्षेसाठीफिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे. कनेक्टव्हिटीसाठी 4G VoLTE, WiFi 802.11 b/g/n, Bluetooth 5.0, GPS, आणि मॅक्रो USB पोर्ट देण्यात आला आहे.

Realme C21Y स्मार्टफोन UNISOC T610 प्रोसेसरसह बाजारात आला आहे, सोबत Mali-G52 GPU ची ताकद देखील देण्यात आली आहे. हा फोन 4GB पर्यंत रॅम आणि 64GB स्टोरेजला सपोर्ट करतो. ही स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. रियलमीचा हा फोन Android 11 आधारित Realme UI 2.0 वर चालतो.

Realme C21Y स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 13MP चा आहे, सोबत 2MP चा मॅक्रो आणि 2MP चा ब्लॅक अँड व्हाइट कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये 5MP चा सेल्फी कॅमेरा आहे. या बजेट स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 10W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here