Airtel नं आणला फक्त 49 रुपयांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, पाहा ह्याचे फायदे

Highlights

    हा 49 रुपयांचा डेटा व्हाउचर आहे.
  • ह्यात इंटरनेट बेनिफिट देण्यात आला आहे.
  • कंपनीकडे 65 रुपयांचा प्लॅन देखील आहे.

Bharti Airtel भारतातील दूसरी सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी आहे. Reliance Jio ला मागे टाकण्याच्या प्रयत्नात कंपनी नवनवीन ऑफर्स व प्लॅन घेऊन येत आहे आणि म्हणूनच आता एयरटेलनं 49 रुपयांचा एक स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. हा एक डेटा व्हाउचर (Data Voucher) आहे ज्याची माहिती पुढे वाचता येईल.

एयरटेल 49 रुपयांचा प्लॅन

Airtel चा 49 रुपयांचा प्लॅन डेटा व्हाउचर म्हणून सादर केला गेला आहे. नावावरून तुम्हाला समजलं असेल की ह्यात कंपनी इंटरनेट डेटा बेनिफिट देत आहे. हा डेटा व्हाउचर फक्त एक दिवसाच्या व्हॅलिडिटीसह येतो जो एकदा रिचार्ज केल्यानंतर पुढील 24 तास अ‍ॅक्टिव्ह राहील.

49 रुपयांच्या एयरटेल प्लॅनमध्ये कंपनी 6GB DATA देत आहे. हा डेटा 4जी स्पीडवर वापरता येईल जो रिचार्ज केल्यांनतर पुढील 24 तासांच्या आत वापरता येईल. हा डेटा रोलओव्हर होत नाही. म्हणजे जर 1 दिवस पूर्ण झाल्यावर देखील 6जीबी डेटा पैकी काही डेटा उरला तर त्याचा वापर पुढल्या दिवशी करता येत नाही.

एयरटेल डेटा व्हाउचर फक्त इंटरनेट वापरण्याची सुविधा देतो. ह्या प्लॅनमध्ये कॉलिंग किंवा एसएमएसची सुविधा मिळत नाही. तसेच हा रिचार्ज व्हाउचर एक्स्ट्रा व्हॅलिडिटी देखील देत नाही. इतर बेनिफिट्स एयरटेल युजरच्या नंबरवर आधी अ‍ॅक्टिव्ह असलेल्या प्लॅनच्या हिशोबाने मिळतील.

एयरटेल 65 रुपये प्लॅन

विशेष म्हणजे एयरटेलनं एक 65 रुपयांचा डेटा व्हाउचर प्लॅन देखील सादर केला आहे. ह्यात युजर्सना 4GB 4G Data मिळतो. या प्लॅनमध्ये देखील कोणतेही कॉलिंग किंवा मेसेज बेनिफिट मिळत नाहीत.

Airtel ₹49 Plan vs ₹65 Plan

तुम्हाला प्रश्न पडला असेल की 49 रुपयांच्या प्लॅनपेक्षा जास्त किंमत असून देखील कमी डेटा का. तर 65 रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी कोणतीही व्हॅलिडिटी देण्यात आली नाही. म्हणजे ह्या 4जीबी डेटाचा वापर आधीपासून अ‍ॅक्टिव्ह प्लॅनच्या वैधतेनुसार करता येईल. 49 रुपयांचा प्लॅन प्रमाणे 24 तासांत डेटा संपवण्याची गरज नाही.

4G Data,Airtel,Airtel Plans,Airtel Recharge Plan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here