फक्त 24,990 रुपयांमध्ये Windows 11 असलेला लॅपटॉप; खास विद्यार्थ्यांसाठी Infinix Inbook X1 Neo ची एंट्री

शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉपची गरज असते परंतु स्वस्त लॅपटॉपमध्ये बऱ्याचदा क्रोम ओएस मिळतं, जे लॅपटॉपचा पुरेपूर आनंद देत नाही. यावर उपाय म्हणून आता Infinix कंपनी फक्त 24,990 रुपयांमध्ये नवीन आणि किफायतशीर विंडोज 11 लॅपटॉप सादर केला आहे. हा नवीन लॅपटॉप Inbook X1 सीरीज अंतगर्त लाँच करण्यात आला आहे, ज्याचे नाव Infinix Inbook X1 Neo आहे. या लॅपटॉपमध्ये Intel Celeron Quad Core N5100 प्रोसेसर, 8GB पर्यंत रॅमसह 256GB पर्यंतची स्टोरेज मिळते. तसेच लॅपटॉप खूप हलका आहे, ज्याचे वजन फक्त 1 किलो 24 ग्राम आहे. चला जाणून घेऊया नवीन Infinix Inbook X1 Neo लॅपटॉपचे सर्व फीचर्स आणि किंमत.

Infinix Inbook X1 Neo लॅपटॉपची किंमत

कंपनीनं नवीन लॅपटॉप 24,990 रुपयांमध्ये सादर केला आहे. ज्याची विक्री 21 जुलैपासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर सुरु होईल. कंपनीनं या लॅपटॉपचे कॉस्मिक ब्लू आणि स्टारफॉल ग्रे असे दोन दोन कलर ऑप्शन सादर केले आहेत, ज्यातील तुम्ही करू शकता. तसेच सेल दरम्यान तुम्हाला या डिवाइसवर अनेक बँक ऑफर्स आणि डिस्काउंट मिळेल, त्यामुळे किंमत आणखी कमी होण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा: 17 हजारांत 108MP कॅमेरा असलेला फोन; स्वस्तात प्रीमियम फीचर्ससह Infinix Note 12 5G सीरीजची एंट्री

Infinix Inbook X1 Neo लॅपटॉपचे फीचर्स

या लॅपटॉपमध्ये 14 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1920×1080 पिक्सल रिजॉल्यूशन, 16:9 अस्पेक्ट रेशियो आणि 300 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. Infinix InBook X1 मध्ये अ‍ॅल्युमिनियम ग्रेड फिनिश डिजाईन देण्यात आली आहे. प्रोसेसर पाहता यात Intel Celeron quad core N5100 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. सोबतीला Intel Integrated UHD ग्राफिक्स आहे. हा लॅपटॉप मायक्रोसॉफ्टच्या लेटेस्ट Windwos 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.

लॅपटॉप मध्ये 8GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंतची इंटरनल PCIe 3.0 SSD स्टोरेज मिळते, जी साधारण HDD पेक्षा पाचपट जास्त वेगवान आहे. व्हिडीओ कॉलिंग आणि मीटिंगसाठी यात HD वेबकॅम देण्यात आला आहे. तसेच ड्युअल स्टार लाईट फ्लॅश फीचर देखील मिळतं. इनफिनिक्सनं यात 50W ची बॅटरी दिली आहे जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ही बॅटरी सिंगल चार्जवर 11 तासांचा बॅकअप देते, असा दावा करण्यात आला आहे. हे देखील वाचा: 32MP च्या सेल्फी कॅमेऱ्यासह शानदार Vivo V25 Pro येणार भारतात; लाँचपूर्वीच जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

तसेच यात दोन मायक्रोफोनसह DTS audio सपोर्ट देखील मिळतो. या लॅपटॉपमध्ये दोन USB 3.0 पोर्ट्स, दोन USB Type C पोर्ट्स एक HDMI 1.4, एक SD कार्ड स्लॉट आणि एक हेडफोन जॅक मिळतो. कंपनीनं यात बॅकलिट कीबोर्डचा वापर केला आहे, त्यामुळे अंधारात देखील टायपिंग करता येईल. यातील Ice Storm 1.0 कुलिंग सिस्टम दीर्घकाळ वापर केल्यानंतर देखील लॅपटॉपला थंड ठेवते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here