चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी वीवो ने आपला वीवो वी15 प्रो स्मार्टफोन नुकताच लॉन्च केला होता. आता कंपनी आपला नवीन स्मार्टफोन वीवो वी15 लॉन्च करण्यासाठी तयार आहे. 91मोबाईल्सला कंपनीच्या विश्वसनिय सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे कि वी15 लॉन्च करण्यासाठी कंपनी 25 फेब्रुवारीला भारतात एका इवेंटचे आयोजन करेल.
वी15 कंपनी द्वारा लॉन्च वी15 प्रो चा डाउन वर्जन असेल. किंमत पाहता कंपनी वी15 22,000 रुपये ते 25,000 रुपयांदरम्यान लॉन्च करू शकते.
वीवो वी15 चे स्पेसिफिकेशन्स
वीवो वी15 मध्ये 6.39-इंचाची एलसीडी स्क्रीन आणि रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर असेल. तसेच हॅन्डसेट मध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल. तसेच मागील बाजूस 24-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर असेल. पण सध्या 24-मेगापिक्सल कॅमेरा 8-मेगापिक्सल वाइड-एंगल शूटर आणि 5-मेगापिक्सल डेप्थ सेंसिंग लेंस सोबत असेल कि नाही याची माहिती मिळालेली नाही.
28 फेब्रुवारीला लॉन्च होतील सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजचे नवीन हॅन्डसेट
आम्ही आधीच एक्सक्लूसिवली सांगतले होते कि वीवो वी15 मध्ये मीडियाटेक हेलियो पी70 प्रोसेसर असेल. तसेच फोन मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज देण्यात येईल. त्याचबरोबर फोन एंडरॉयड 9 पाई-बेस्ड फनटच ओएस आणि 3,700एमएएच बॅटरी सह येईल.
वीवो वी15 प्रो कंपनी ने ग्लास फिनिश मध्ये सादर केला आहे जो समोरून पूर्णपणे बेजल फ्री आहे. कंपनी ने हा 19.5:9 आसपेक्ट रेशियो सह सादर केला आहे आणि यात 6.39—इंचाचा फुल एचडी+ (1080 x 2316 पिक्सल रेजल्यूशन) स्क्रीन देण्यात आली आहे. खास बाब अशी कि फोन मध्ये सुपर एमोलेड स्क्रीन पॅनलचा वापर केला गेला आहे जो चांगल्या डिस्प्ले साठी ओळखला जातो.
4 मार्चला लॉन्च होईल रियलमी 3, शाओमीला मिळेल टक्कर
हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर (2×2.0 गीगाहट्र्ज क्रयो 460 गोल्ड आणि 6×1.7 गीगाहट्र्ज क्रयो 460 सिल्वर) देण्यात आला आहे. हा क्वालकॉमचा नवीन प्रोसेसर आहे जो शानदार प्रोसेसिंग साठी ओळखला जातो. तसेच कंपनी ने हा 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी सह सादर केला आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,700 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन वीवोच्या फनटच ओएस वर चालतो जो एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 9 पाई वर आधारित आहे.














