Google आणि Microsoft ने या भारतीय ऍप मध्ये गुंतवले 100 मिलियन डॉलर, बनेल देशी टिकटॉक

TikTok ची फॅन फॉलोइंग जितकी भारतात आहे तितकी या ऍपच्या स्वतःच्या देशात म्हणजे चीन मध्ये पण नाही. जरी टिकटॉक कितीही वादात असला तरी हे मात्र सत्य आहे कि TikTok सारखे यश आतापर्यंत इतर कोणत्याही शॉर्ट व्हिडीओ मेकिंग ऍपला मिळाले नाही. देशात टिकटॉक बॅन झाल्यानंतर इतर अनेक ऍप्सने याची जागा घेण्याचा विचार केला आहे आणि सतत काम पण केले आहे. पण यासर्वांमधे देशी शॉर्ट व्हिडीओ ऍप Josh चे नाव समोर येत आहे ज्यात Google आणि Microsoft सारख्या दिग्गज कंपन्यांनी 100 मिलियन यूएस डॉलरची गुंतवणूक केली आहे.

टिकटॉकच्या यशानंतर भारतात शॉर्ट व्हिडीओ ऍप्स वेगाने लोकप्रिय होत आहेत. सध्या अर्धा डझन पेक्षा जास्त असे ऍप्स भारतात ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांना युजर्सचा प्रतिसाद पण चांगला मिळत आहे. या मोठ्या यादीत भारतीय ऍप जोश (Josh) चे नाव समोर आले आहे ज्यात गुगल आणि माइक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांनी आपला इंटरस्ट दाखवला आहे. बातमी आहे कि या दोन्ही कंपन्यांनी जोश ऍप वर 100 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

Josh ऍप पाहता हा एक देशी शॉर्ट व्हिडीओ मेकिंग ऍप आहे ज्याची मालकी वर्स इनोवेशन (VerSe) कंपनीकडे आहे. वर्स इनोवेशन बेंगळुरूची कंपनी आहे जी तिथूनच ऑपरेट करते. जोश ऍपची लोकप्रियता वाढल्यानंतर फक्त गुगल आणि माइक्रोसॉफ्टच नाही तर अल्फावेव, सोफिना ग्रुप आणि लुपा सिस्टम्स सारख्या गुंतवणूकदारांनी पण या कंपनीत गुंतवणूक केली आहे. Google आणि Microsoft जोडले गेल्यानंतर आता जोश ऍपची व्हॅल्यू 1 बिलियन डॉलर पेक्षा पण जास्त झाली आहे.

हे देखील वाचा : इंडियन कंपनीने लॉन्च केले तीन नवीन फोन, किंमत फक्त 4,999 रुपयांपासून सुरु, कोणताही पार्ट नाही चायनीज

Insta Reels, ShareChat, Bolo Indya, Chingari, Mitron, Roposo आणि HiPi काही असेच शॉर्ट व्हिडीओ मेकिंग ऍप्स आहेत जे टिकटॉक बॅन नंतर भारतात वापरले जात आहेत आणि लोकप्रिय पण आहेत. हे ऍप्स गुगल प्ले स्टोर सोबतच ऍप्पल ऍप स्टोर वर पण डाउनलोडसाठी उपलब्ध आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here