नंबर प्लेटवरून मिळवा वाहनांची माहिती कशी मिळवायची, जाणून घ्या

How to Get Vehicle Owner Details by Number Plate
सौजन्य: Acko.com

असे बरेच प्रसंग येतात जेव्हा तुम्हाला एखाद्या वाहनाची माहिती हवी असते. एखादी सेकंड हँड कार विकत घेताना कार आणि मालकाची सर्व माहिती जाणून घेणं आवश्यक असतं. तसेच तुम्ही एखादा अपघात किंवा हिट-अँड-रनची घटना बघितली असेल तर अशावेळी त्वरित कारवाई करण्यासाठी वाहनाच्या मालकाची माहिती मिळवणं आवश्यक आहे. तुम्हाला माहित आहे का फक्त नंबर प्लेटवरून तुम्ही वाहनाच्या मालकाची संपूर्ण माहिती मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा 5 पद्धती सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही कोणत्याही वाहनाच्या नंबर प्लेटवरून त्याच्या मालकाची आणि वाहनांची माहिती मिळवू शकता. चला जाणून घेऊया.

Vahan Parivahan Website

How to Get Vehicle Owner Details by Number Plate

  • सर्वप्रथम Vahan Parivahan Website वर जा.
  • जर तुम्ही यापूर्वी अकाऊंट ओपन केलं असेल तर तुमचा मोबाइल नंबर टाका किंवा Create Account वर क्लिक करा.
  • अकाऊंट बनवण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी नोंदवा.
  • मिळेल ओटीपी सबमिट करा आणि पासवर्ड बनवा.
  • त्यानंतर तुमच्या मोबाइल नंबर आणि पासवर्डसह लॉग इन करा.
  • पुढील पेजवर वाहन प्लेट नंबर टाका.
  • व्हेरिफिकेशन कोड (कॅप्चा) सबमिट करा.
  • “Vahan search” बटनवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला वाहनाची माहिती मिळेल.
  • इथे तुम्हाला वाहनांची आरसी माहिती जसे की ईंधन प्रकार, स्थिती, मालकाचे नाव, वैधता, विम्याची तारीख आणि रेजीस्ट्रेशन डेट मिळेल. गोपनीयतेच्या कारणांमुळे मालकाचे संपूर्ण नाव दाखवलं जात नाही.

हे देखील वाचा: OTUA Electric Cargo फुल चार्जमध्ये देणार 300km पर्यंत रेंज; ड्रायवर केबिनमध्ये गारगार एसी

Transportbook Website

हा Vahan Parivahan Website चा एक चांगला पर्याय आहे. या प्रक्रियेत तुम्हाला लॉगइन किंवा साइनअप करण्याची गरज नाही.

How to Get Vehicle Owner Details by Number Plate

  • सर्वप्रथम Transportbook Website वर जा.
  • वाहन प्लेट नंबर दर्ज करा.
  • “Find” वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला वाहनांची माहिती मिळेल.

Acko App

  • तुमच्या Android किंवा iOS वर डिवाइसवर Acko अ‍ॅप डाउनलोड करा.
  • तुमचा मोबाइल नंबर नोंदवा.
  • ओटीपी सबमिट करा.
  • “Do more with Acko” अंतर्गत, आरटीओ माहितीवर क्लिक करा.
  • त्यानंतर वाहनाचे रजिस्ट्रेशन नंबर टाका.
  • त्यानंतर तुम्हाला वाहनाची माहिती मिळेल.

SMSच्या माध्यमातून वाहनाच्या मालकाची माहिती मिळवा.

  • SMS अ‍ॅप ओपन करा.
  • VAHAN टाइप करा <स्पेस> <स्पेस न देता वाहनाचा नंबर टाका> (उदा.: MH01TR1234)
  • 7738299899 वर एसएमएस पाठवा.
  • त्यानंतर थोड्यावेळाने तुम्हाला वाहनाच्या मालकाचे नाव, आरटीओची माहिती, मॉडेल, आरसी/एफसीची वैधता, विम्याची माहिती असलेला एक SMS मिळेल.

हे देखील वाचा: Mahindra XUV400 EV आवडली नाही? मग या 5 Electric Cars चा विचार करता येईल, पाहा लिस्ट

Digit Website व्हा वापर करून वाहनाच्या मालकाची माहिती मिळवा

  • GoDigit Website वर जा
  • वाहनाचा प्रकार निवडा (कमर्शियल/खाजगी 4W/2W)
  • वाहनाच्या मालकाचे नाव टाका (माहित नसल्यास एखादं काल्पनिक नाव द्या)
  • रजिस्ट्रेशन नंबर टाका.
  • तुमचा मोबाइल नंबर टाका.
  • त्यानंतर मिळेल ओटीपी सबमिट करा.
  • कॅप्चा टाका आणि फिर “Get Details” वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला वाहनाची संपूर्ण माहिती दिली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here