दगडू-पालवीची लव्ह स्टोरी ‘या’ OTT वर पाहता येणार; ‘टाइमपास 3’ च्या ऑनलाईन रिलीजची तारीख ठरली

timepass 3 ott release date

अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि हृता दुर्गुळे(Hruta Durgule) या दोघांची मुख्य भूमिका असलेला ‘टाइमपास 3’ (Timepass 3) चित्रपट काही दिवसांपूर्वीच चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला होता. टाइमपास सीरिजच्या या तिसऱ्या भागाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. रवी जाधव दिग्दर्शित हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. टाइमपास 3 चित्रपटा 16 सप्टेंबर रोजी झी5 रिलीज होणार आहे. पांडू, झोंबिवली, धर्मवीर सारखे नवीन मराठी चित्रपट प्लॅटफॉर्मवर आधीपासून उपलब्ध आहेत, त्यात आता टाइमपास 3 देखील भर पडणार आहे.

टाइमपास 3 मध्ये संजय नार्वेकर, भाऊ कदम, वैभव मांगले प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलं आहे. अमितराज यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे, तर Zee Studios आणि Athaansh Communication ने मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 29 जुलै 2022 रोजी हा चित्रपट महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता आणि आता 16 सप्टेंबर 2022 रोजी टाइमपास 3 ओटीटी प्लॅटफॉर्म झी5 च्या माध्यमातून ऑनलाइन दर्शकांच्या भेटीला येत आहे.

या यशस्वी फ्रँचाईझीमधल्या तिसऱ्या सिनेमात प्रथमेश परब आणि हृता दुर्गुळे मुख्य भूमिकांत आहेत. 36 टक्के मिळवून बारावीची परीक्षा पास झाल्यानंतर दगडू (प्रथमेश परब) कॉलेजविश्वात पाऊल टाकतो आणि मग पुढे काय होतं हे या सिनेमात पाहायला मिळणार आहे. गुंड म्हणून आपला भूतकाळ मागे टाकून नवी सुरुवात करण्याचा दगडूचा निश्चय त्याच्या भोवती असलेल्या लोकांमुळे पणाला लागतो. हे देखील वाचा: विवोपेक्षा स्वस्तात रंग बदलणारा स्मार्टफोन; 8GB RAM, 64MP कॅमेऱ्यासह Tecno CAMON 19 Pro Mondrian Edition भारतीयांच्या भेटीला

आपण कधीच बदलणार नाही असं त्याला वाटायला लागतं, मात्र तरीही पुढे जात राहाण्याचं बळ त्याला मिळतं, कारण तो एका गँगस्टरच्या मुलीच्या- पालवीच्या (हृता दुर्गुळे) प्रेमात पडतो. दगडूच्या सुसंस्कृत वागण्यानं पालवी प्रभावित होते, मात्र सगळ्याच चांगल्या गोष्टी कधी ना कधी संपतात या न्यायाने दगडूचं हा उसना अवतारही संपतो. त्यामुळे दगडू- पालवीच्या नात्यावर काय परिणाम होतो हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.

सिनेमाविषयी हृता दुर्गुळे म्हणाली, “या सिनेमात काम करताना माझ्यासमोर एकच आव्हान होतं आणि ते म्हणजे, भाषेचं. पालवी ज्या टोन किंवा लहेजामध्ये बोलते ते माझ्यासाठी सोपं नव्हतं. शूटिंगचा पहिलाच दिवस माझ्यासाठी खूप अविस्मरणीय होता, विशेषतः पालवी म्हणून मी जेव्हा तयार झाले तो क्षण मी कधीही विसरणार नाही. तो सगळाच अनुभव माझ्यासाठी मजेदार आणि वेगळा होता.” हे देखील वाचा: 64MP कॅमेऱ्यासह OPPO F21s Pro 5G आणि 4G Phone भारतात लाँच; पाहा किंमत व स्पेसिफिकेशन्स

याविषयी अभिनेता प्रथमेश परब म्हणाला, “दगडूच्या मित्रांच्या गँगप्रमाणेच कॉलेजमध्ये माझीही गँग होती. फरक इतकाच होता, की दगडू इतरांचे सल्ले ऐकत बसतो आणि प्रत्यक्षात मी स्वतःचे निर्णय स्वतः घेतो. टाइमपास 3 चं शूटिंग करताना, दगडूची सिग्नेचर पोझ देताना, त्याचे धमाल पंचलाइन्स, जबरदस्त स्टारकास्ट, शिवाय निसर्गरम्य ठिकाणी रोमँटिक सीन्स करताना मला खूप मजा आली. टाइमपास 3 नं मला कित्येक आठवणी दिल्या आणि त्या कायम लक्षात राहतील.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here