12 इंचाची स्क्रीन आणि 8,300mAh Battery असलेला HONOR Pad 9 येत आहे भारतात, यात आहेत 8 Speakers!

MWC 2024 च्या मंचावरून टेक ब्रँड ऑनरने आपला नवीन टॅबलेट डिव्हाईस HONOR Pad 9 सादर केला होता. हा टॅब आता भारतीय बाजारात येण्यासाठी तयार आहे. कंपनीकडून घोषणा करण्यात आली आहे की ऑनर पॅड 9 भारतातील लाँचसाठी तयार आहे आणि हा लवकरच मार्केटमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. ब्रँडच्या अधिकाऱ्याने या टॅबलेटला टिझ केले आहे ज्यात डिव्हाईसचे फिचर्स व स्पेसिफिकेशनची माहिती पण मिळाली आहे.

HONOR Pad 9 किंमत (जागतिक)

ऑनर पॅड 9 ला पश्चिमी देशांमध्ये EUR 349 च्या सुरुवाती किंमतीत सादर करण्यात आले आहे. ही किंमत भारतीय चलनानुसार 31,000 रुपयांच्या आसपास आहे. परंतु हे मानले जाऊ शकते की भारतात या टॅबलेटची किंमत 28,000 रुपयांपेक्षा कमी ठेवली जाऊ शकते. तसेच कंपनीने शॉपिंग साईट अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून पहिलेच सांगितले आहे की भारतात या टॅबलेटला Honor Bluetooth Keyboard Free मिळेल.

HONOR Pad 9 स्पेसिफिकेशन (जागतिक)

  • 12.1″ 120Hz 2.5K Screen
  • Qualcomm Snapdragon 6 Gen 1
  • 8GB RAM + 256GB Storage
  • 13MP Back + 8MP Front Camera
  • 35W 8,300mAh Battery

डिझाईन: ऑनर पॅड 9 टॅबलेट खूप पातळ आहे याचे वजन 555 ग्रॅम आणि डायमेंशन 6.96 मिमी आहे. टॅबच्या बॅक पॅनलवर मध्ये कॅमेरा लावण्यात आला आहे. जो यूनिक डिझाईन प्रदान करतो. तसेच याची बॉडी मेटलपासून बनलेली आहे.

डिस्प्ले: HONOR Pad 9 मध्ये हाई स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 12.1-इंचाचा, 2.5K एलसीडी डिस्प्ले आहे. ही स्क्रीन टीयूवी रीनलँड रेटिंगसह ठेवण्यात आली आहे ज्याच्या मदतीने डोळ्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

प्रोसेसर: HONOR Pad 9 अँड्रॉईड 13 आधारित मॅजिकओएस 7.2 वर आधारित ठेवण्यात आला आहे. तसेच प्रोसेसिंगसाठी या टॅबलेट डिव्हाईसमध्ये 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे.

मेमरी: डेटा स्टोर करण्यासाठी 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजची सुविधा आहे. त्याचबरोबर टर्बो रॅम सादर करण्यात आली आहे. ज्यामुळे तुम्ही 16जीबी पर्यंत रॅमला वाढवू शकता.

कॅमेरा: कॅमेराच्या बाबतीत HONOR Pad 9 बॅक पॅनलवर गोलाकार कॅमेरा मॉड्यूलसह येतो. ज्यात 13MP चा सेन्सर आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP चा कॅमेरा मिळतो.

बॅटरी: टॅबलेटला पावर देण्यासाठी कंपनीने यात 8300mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. याला चार्ज करण्यासाठी 35W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here