जगभरात धुमाकूळ घातल्यानंतर आता Coronavirus भारतात पण पाय पसरत आहे. देशात कोरोना संक्रमणच्या केसेस 600 च्या आसपास पोचल्या आहेत. काल म्हणजे 24 मार्चला देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी कोरोनाचा प्रकोप थांबवण्यासाठी 21 दिवस भारत लॉकडाउन करण्याची घोषणा केली आहे. येत्या 14 एप्रिल पर्यंत सर्वांना स्वतःच्या घरात राहण्यास सांगितले आहे. सर्व शाळा, कॉलेज व ऑफिसेस बंद करण्यात आले आहेत आणि लोकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. काल रात्री 12 नंतर प्रत्येकाला जिथे आहे तिथेच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोकांच्या बाहेर जाण्यावर आणि नातेवाईकांना व मित्रांना भेटण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही पण एखाद्या खास व्यक्तीला मिस करत असाल तर पुढे आम्ही 5 असे सोप्पे मार्ग सांगितले आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही कोणत्याही खर्चाविना आपल्या मित्र तसेच नातेवाईकांशी थेट लाईव वीडियो चॅट करू शकाल आणि विचारपूस करू शकाल. थेट आणि सोप्प्या शब्दांत बोलायचे तर जाणून घ्या अश्या बेस्ट वीडियो कॉलिंग ऍप्स बाबत जे आहेत पूर्णपणे मोफत!
व्हाट्सऍप भारतातील नंबर वन इंस्टेंट मेसेजिंग ऍप आहे. आज घरातील लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या स्मार्टफोन्स मध्ये Whatsapp डाउनलोडेड आहे. चॅटिंग करने आणि इंटरस्टिंग स्टेट्स ठेवण्यासोबतच तुम्ही व्हाट्सऍप वर वीडियो कॉल पण करू शकता. Whatsapp वर इतर कोणत्याही व्यक्तीचा इंटरफेयर होणार नाही तसेच फोन मध्ये नंबर असल्यावरच तुम्ही वीडियो कॉल करू शकाल. यात तुम्ही पर्सनल वीडियो चॅट सोबतच ग्रुप वीडियो कॉल पण करू शकता आणि एक साथ 4 मित्रांशी बोलू शकता.
Facebook Messenger
व्हाट्सऍप वर तर तुम्ही त्या लोकांशी वीडियो चॅट कराल ज्यांचा नंबर तुमच्या फोन मध्ये आहे. पण काही असे मित्र पण असतात जे फक्त इंटरनेट वरच चॅटिंग करतात आणि नंबरची देवाणघेवाण झाली नाही. अश्यावेळी ऑनलाईन फ्रेंड्सना बघण्यासाठी Facebook बेस्ट आहे. फेसबुक वर वीडियो चॅट डेस्कटॉप साइट वरून करता येते किंवा वेगळे फेसबुक मेसेंजर ऍप डाउनलोड करावे लागेल. Facebook messenger पण पूर्णपणे फ्री आहे आणि तुमच्या एफबी अकाउंटच्या माध्यमातून एक साथ 8 लोकांचा ग्रुप वीडियो कॉल करू शकता.
Google Duo
गूगल डुओ टेक दिग्गज कंपनी गूगलचा मेसेजिंग ऍप आहे. या ऍपमुळे कोणत्याही स्मार्टफोन वरून दुसऱ्या स्मार्टफोन वर थेट वीडियो कॉल केला जाऊ शकतो. यासाठी फक्त गूगल अकाउंटने लॉगइन करावी लागेल आणि ज्या व्यक्तीला पाहायचे आहे त्याचे गूगल अकाउंट किंवा जीमेल आईडी तुमच्या कडे हवी. Google Duo मध्ये पण एक साथ 8 लोकांशी वीडियो कॉल केला जाऊ शकतो. या ऍप मध्ये पण यूजर्सना व्हाट्सऍप व एफबी मेसेंजर प्रमाणे आर्कषक फिल्टर्स मिळतात.
FaceTime
फेसटाईम त्या लोकांसाठी बेस्ट आहे जे iPhone वापरतात. फेसटाईम करण्यासाठी कोणताही थर्डपार्टी ऍप फोन मध्ये इंस्टाल करण्याची गरज नसते. तुमच्या फोनबुक मध्ये सेव नंबर आपोआप FaceTime शी जोडला जातो. आईफोन वर फेसटाईम करताना फोनच्या सेलुलर नेटवर्क सोबतच वाईफाईचा पण वापर केला जाऊ शकतो. Apple यूजर या इनबिल्ट ऍपच्या माध्यमातून एक साठी 32 लोकांशी वीडियो चॅट करू शकतात. पण त्या सर्वांकडे iPhone असणे आवश्यक आहे.
Skype
स्काइपचे नाव जितके जुने आहे तितकेच विश्वासू पण आहे. अनेक वर्षांपासून स्काइप वीडियो चॅटिंग सर्विस देत आहे. या ऍपचा वापर मोबाईल सोबतच लॅपटॉप किंवा कंम्प्यूटर वर पण केला जाऊ शकतो. तुम्ही एंडरॉयड यूजर असा किंवा आईफोन यूजर याने फरक पडत नाही फक्त प्ले स्टोर किंवा ऍप स्टोर वरून हा ऍप फोन मध्ये डाउनलोड करावा लागेल.
















