एसबीआय एटीएम पिन कसा जनरेट करायचा? जाणून सर्वात सोपी पद्धत

सध्याच्या युगात डेबिट कार्डचा वापर वाढला आहे. फक्त एटीएममधून कॅश काढण्यासाठी नव्हे तर बँकिंग सेवा अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी देखील डेबिट कार्ड उपयुक्त ठरतं. परंतु नवीन कार्ड (New ATM) आल्यावर ते अ‍ॅक्टिव्हेट करणं वेगळंच टेंशन आहे. काही ग्राहकन एसबीआयच्या एटीएम पिन जेनरेशनसाठी (SBI PIN Generation) एटीएम (ATM Machine) किंवा बँकेच्या ब्रांचमध्ये जातात. परंतु भारतीय स्टेट बँक (SBI) आपल्या ग्राहकांना घर बसल्या SBI ATM डेबिट कार्डचा पिन जनरेट करण्याची सुविधा देते. या पिन जनरेट करण्याच्या पद्धतीला ग्रीन पिन जनरेशन म्हणतात. SBI ATM PIN फक्त एक SMS आणि नेट बँकिंगद्वारे कसं जनरेट करता येतं चला जाणून घेऊया.

एसबीआय एटीएम पिन कसा जनरेट करायचा

 • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला www.onlinesbi.com वर जावं लागेल. जिथे युजर आयडी आणि तुमचा पासवर्ड टाकून लॉग इन करावं लागेल.
 • त्यानंतर वेबसाईटवर e-services च्या टॅबमध्ये ‘ATM card services’ ची निवड करा.
 • या सेक्शनमध्ये ‘ATM PIN generation’ वर क्लिक करा जिथे तुम्हाला दोन ऑप्शन one-time password (OTP) आणि Profile Password दिसतील. इथे ओटीपी ऑप्शन निवडून एटीएम पिन जनरेशनवर क्लिक करा.
 • त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल.
 • ओटीपी आल्यानंतर त्या डेबिट कार्डशी लिंक सेव्हिंग अकाऊंटवर जाऊन तुमचं एटीएम कार्ड सिलेक्‍ट करा.
 • त्यानंतर सबमिटवर क्लिक करा. जो नवीन पिन हवा असेल त्याचे पहिले दोन आकडे नोंदवा.
 • पुढील दोन अंक एसएमएसच्या माध्यमातून तुम्हाला पाठवले जातील. त्यानंतर पहिले दोन अंक आणि मोबाईल नंबरवर मेसेजच्या माध्यमातून आलेले दोन अंक एकत्र नोंदवून सबमिटवर क्लिक करा.
 • अशाप्रकारे तुमचा पिन इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून जनरेट होईल.

ATM PIN विसरल्यावर SMS वरून करा जनरेट

 • SBI एटीएम पिन एसएमएसच्या माध्यमातून जनरेट करण्यासाठी रजिस्टर्ड नंबरवरून PIN < ATM कार्डचे शेवटचे चार डिजिट> <अकाऊंट नंबरचे शेवटचे चार डिजिट> लिहून 567676 या नंबरवर सेंड करा.
 • या मेसेजनंतर तुम्हाला वन टाइम पासवर्ड (OTP) येईल. जो OTP दोन दिवसांसाठी वैध असेल.
 • 2 दिवसांत SBI ATM वर जाऊन ओटीपीच्या मदतीनं SBI ATM PIN जनरेट करता येईल.

IVR (कस्टमर केयर) सिस्‍टमच्या मदतीनं सेट करा एटीएम पिन

 • आयवीआर सिस्टमच्या माध्यमातून SBI डेबिट कार्ड ग्रीन पिन जनरेट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून टोल फ्री नंबर 1800 112 211 किंवा 1800 425 3800 वर कॉल करावा लागेल.
 • कॉल करण्यापूर्वी तुमच्या एटीएम कार्ड आणि अकाऊंट नंबरची माहिती जवळ ठेवा, जी तुम्हाला नोंदवावी लागू शकते.
 • कॉल लागल्यावर एटीएम/डेबिट कार्ड संबंधी सेवांसाठी 2 दाबा.
 • त्यानंतर पिन जनरेशनसाठी 1 दाबा आणि पुढील सूचनांचे पालन करून पिन जनरेट करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here