फोन मध्ये वाय-फाई स्लो आहे का? मग असा करा फास्ट स्लो वाय-फाई

भारतात जेवढे लोक फोन मध्ये इंटरनेट वापरतात, तेवढे जगातील इतर कोणत्याही देशात वापरत नसतील. कोणत्याही बजेटचा कोणताही स्मार्टफोन असो, त्यात इंटरनेट नक्की मिळेल. इंटरनेटच्या फास्ट ऍक्सेससाठी, बिना दिक्कत व्हिडीओज बघण्यासाठी आणि मोबाईल मध्ये गेम खेळण्यासारख्या अनेक ऍक्टिव्हिटीज मध्ये आपल्याला कोणत्याही अडचणीविना स्मूद इंटरनेट चालू राहावे असे वाटते. तसेच यासाठी अधिकांश लोक फोन वाय-फाईशी कनेक्ट करतात. पण अनेकदा असे दिसले आहे कि फोन वाय-फाईशी कनेक्ट होऊन सुद्धा इंटरनेट खूप स्लो चालतो. त्यामुळे त्रास होतो आणि समजत नाही कि काय करावे. आज आम्ही तुम्हाला असे उपाय सांगणार आहोत, जे वापरून तुम्ही तुमच्या स्मार्टफोन मध्ये वेगाने वाय-फाई वापरू शकाल.

फ्रिक्वेंसी बॅंड सेटिंग

स्मार्टफोन मध्ये वाय-फाई स्पीड स्लो किंवा वेगवान करण्यात फ्रिक्वेंसी बॅंडची महत्वाची भूमिका असते. आधी 2.5गीगहर्ट्ज बॅंडला सपोर्ट करणारे मोबाईल फोन्स यायचे, सध्या स्मार्टफोन्स मध्ये 5गीगाहर्ट्ज पर्यंतचा फ्रिक्वेंसी बॅंडचा सपोर्ट दिला जातो. तसे पाहता फ्रिक्वेंसी बॅंड सेटिंग मॅन्युअल पद्धतीने ऍडजस्ट केला जाऊ शकतो, पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि फ्रिक्वेंसी बॅंड ऑटो मोड वर सेट करा. असे केल्याने स्पेक्ट्रम बॅंड म्हणजे वाय-फाई डिवायस द्वारे येत असलेल्या फ्रिक्वेंसीनुसार स्मार्टफोन स्वतः त्यावर शिफ्ट होईल आणि बिना दिक्कत इंटरनेट चालू राहील.

कॅशे मेमरी

सतत वेगवेगळ्या वेबसाइट्स ऍक्सेस केल्यामुळे आणि त्यांच्यावर काम केल्यामुळे त्या वेबसाइट्सच्या नावावर सेव होत असलेली कॅशे मेमरी अनेकदा खूप जास्त स्टोर होते. बऱ्याचदा हि मेमरी एकटी हेवी होते कि ब्राउजर स्लो होतो आणि आपल्याला वाटते कि इंटरनेट स्लो आहे. अश्यावेळी इंटरनेट बदलण्याची नव्हे तर कॅशे मेमरी डिलीट करण्याची गरज असते. ब्राउजरच्या सेटिंग मध्ये जाऊन थेट कॅशे मेमरी क्लीन केली जाऊ शकते. असे केल्यावर ब्राउजर पुन्हा वेगाने चालेल.

हे देखील वाचा : दोन फोन मध्ये वापरा एकच WhatsApp, जाणून घ्या संपूर्ण पद्धत

मॉडेमची प्लेसमेंट

बऱ्याचदा घरात वाय-फाई लावल्यानंतर एका खोलीत खूप चांगला स्पीड येतो, पण दुसऱ्या खोलीत स्पीड स्लो होतो. हि समस्या तुमच्या स्मार्टफोनची नाही तर त्या वाय-फाई राउटर किंवा मॉडेमची आहे. या समस्येचा अर्थ असा नाही कि तो खराब आहे, फक्त तो योग्य त्या ठिकाणी नाही. वाय-फाई मॉडेम एखाद्या खुल्या जागी ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून राउटर मधून निघणाऱ्या वेव्स भिंती किंवा दरवाज्यामुळे अडकू नये आणि जिथे जिथे तुम्ही स्मार्टफोन घेऊन जाल तिथे फोन मध्ये फास्ट इंटरनेट चालू राहील.

सॉफ्टवेयर अपडेट

स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर फोन मध्ये वाय-फाई स्लो चालण्याचे कारण फोनचे सॉफ्टवेयर/फर्मवेयर अपडेट न होणे पण असू शकते. एखादा नवीन अपडेट आला आहे कि नाही हे स्वतःहून चेक करणे नेहमीच चांगले. आणि जर नवीन अपडेट उपलब्ध असेल तर फोन मध्ये तो इंस्टाल करा आणि स्मार्टफोन अपडेट करा. अश्या अपडेट्स नंतर एकदा फोन रिस्टार्ट करणे चांगले. स्टेप्स फॉलों केल्यानंतर फोन मध्ये पुन्हा वाय-फाई वेगाने चालेल.

फोनचा कवर पण असू शकतो मोठे कारण

आजकल स्मार्टफोनला स्टाईलिश लुक देण्यासाठी वेगवेगळे आर्कषक मोबाईल कवर बाजारात मिळतात. पण हे मोबाईल कवर पण स्मार्टफोन मध्ये वाय-फाई आणि इंटरनेटचा स्पीड कमी करतात. मेटल कवर किंवा हार्ड प्लास्टिक शेल फोनच्या अँटिना बॅंड्स वर येतात. तसेच अश्या कवरमूळे वाय-फाई वेव्स पण डिस्ट्रॉट होतात, ज्यामुळे इंटरनेटचा स्पीड कमी होतो. एकदा चेक करा कि कवरविना वाय-फाई नीट चालत आहे कि नाही. जर चालत असेल तर तो कवर न वापरणे नेहमीच चांगले.

Published by
Siddhesh Jadhav