9 हजार रुपयांच्या आत नवाकोरा Smart TV; ‘या’ कंपनीनं दिली भारतीयांना भेट, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Infinix नं भारतात नवीन किफायतशीर स्मार्ट टीव्ही Infinix 32-inch Y1 Smart TV लाँच केला आहे. इनफिनिक्सचा हा स्मार्ट टीव्ही भारतात 9 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत सादर करण्यात आला आहे. कंपनीनं हा भारतातील सर्वात अफोर्डेबल स्मार्ट टीव्ही असल्याचा दावा देखील कंपनीनं केला आहे. Infinix नं इंडियन स्मार्ट टीव्ही मार्केटमध्ये गेल्यावर्षी प्रवेश केला होता. कंपनीनं आतापर्यंत भारतात दोन स्मार्ट टीव्ही सीरीज Infinix X1 आणि X3 चे 32-इंच ते 43-इंचाचे फुल HD TV लाँच केले आहेत.

Infinix 32-इंच Y1 Smart TV: किंमत आणि उपलब्धता

लेटेस्ट Infinix 32-इंच Y1 Smart TV स्मार्ट टीव्ही ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. लाँच ऑफर अंतगर्त कंपनी या टीव्हीसह अनेक डिस्काउंट ऑफर सादर करत आहे. Infinix 32-इंच Y1 Smart TV ची किंमत भारतात 8,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या मॉडेलची विक्री ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाईल. हा टीव्हीचा पहिला सेल 18 जुलैला आयोजित करण्यात येईल. कंपनीनं या टीव्हीचा फक्त ब्लॅक कलर ऑप्शन सादर केला आहे. हे देखील वाचा: एसबीआय एटीएम पिन कसा जनरेट करायचा? जाणून सर्वात सोपी पद्धत

Infinix 32-inch Y1 Smart TV वर काही ऑफर्स देखील ग्राहकांना मिळतील. लाँच ऑफर अंतर्गत SBI च्या क्रेडिट कार्ड धारकांना हा टीव्ही स्वस्तात विकत घेता येईल, EMI ट्रँजॅक्शनवर 10 टक्के म्हणजे सुमारे 900 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. तसेच Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर धारकांना 5 टक्के डिस्काउंट देखील मिळेल.

Infinix 32-inch Y1 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Infinix 32-इंच Y1 स्मार्ट टीव्हीमध्ये 32-इंचाचा HD रिजोल्यूशन (1366 x 768 pixels) डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. या डिस्प्लेची पीक ब्राईटनेस 250 निट्स आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 20W स्पिकर सेटअप देण्यात आला आहे जो Dolby ऑडियोला सपोर्ट करतो. कंपनीनं Infinix TV मध्ये स्लिम बेजल्स डिजाईन दिली आहे. हे देखील वाचा: शाओमीच्या अल्ट्राला रियलमीचा मास्टर भिडणार; 100W फास्ट चार्जसह Realme GT 2 Master Explorer Edition लाँच

इनफिनिक्सच्या या टीव्हीमध्ये क्वॉड कोर प्रोसेसर, 512 MB रॅम आणि 4GB स्टोरेज देण्यात आली आहे. या टीव्हीमध्ये अनेक अ‍ॅप्स प्री-इंस्टॉल मिळतात, ज्यात Prime Video, Zee5, YouTube, SonyLIV आणि Aaj Tak सारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे. अनेक अ‍ॅप्स युजर्स अ‍ॅप स्टोरवरून देखील डाउनलोड करू शकतात. हा स्मार्ट टीव्ही अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर चालत नाही तर कंपनीची कस्टम ऑपरेटिंग सिस्टम आहे.

इनफिनिक्सच्या टीव्हीमध्ये तीन HDMI पोर्ट, दोन USB पोर्ट, एक ऑप्टिकल आणि एक LAN पोर्ट देण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये मिराकास्ट आणि कास्ट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या टीव्हीच्या रिमोटमध्ये YouTube, Browser, आणि Prime Video साठी शॉर्टकट बटन आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here