iQOO Z9 5G चे भारतात लाँच झाले कंफर्म, अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाला डिवाइस

Highlights

  • iQOO Z9 5G अ‍ॅमेझॉनवर लिस्ट करण्यात आला आहे.
  • हा Dimensity 7200 प्रोसेसरसह असणार आहे.
  • यात Sony IMX882 OIS कॅमेरा सेन्सर मिळेल.


आयक्यूने भारतात आपल्या नवीन Z-सीरीज स्मार्टफोन iQOO Z9 5G चे लाँच कंफर्म केले आहे. डिवाइस काही प्रमुख स्पेसिफिकेशन्ससह अधिकृत भारतीय वेबसाइट आणि ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर लिस्ट करण्यात आला आहे. तसेच 91 मोबाईलने या मोबाइलच्या लाँचबद्दल एक्सक्लूसिव्ह माहिती शेअर केली होती आता खरी असल्याचे वाटत आहे. चला, पुढे नवीन टीजर आणि याच्या संभावित फिचर्सबाबत माहिती जाणून घेऊया.

iQOO Z9 5G भारतातील लाँच कंफर्म

  • iQOO Z9 5G फोनबद्दल ब्रँडने अधिकृतपणे “कमिंग सून” टॅगलाइन सह देशात याच्या लाँचची पुष्टी केली आहे.
  • डिवाइस Amazon आणि iQOO च्या अधिकृत वेबसाइटवर लिस्टेड आहे. यात काही प्रमुख स्पेसिफिकेशन पण समोर आले आहेत.
  • लिस्टिंगमध्ये दिसले आहे की iQOO Z9 5G स्मार्टफोन MediaTek Dimensity 7200 प्रोसेसरसह असणार आहे.
  • फोनमध्ये सेगमेंटचा पहिला Sony IMX882 OIS कॅमेरा सेन्सर मिळेल. याचे कॅमेरा मॉड्यूल, ड्युअल लेन्स यूनिट आणि ड्युअल LED फ्लॅश पण टीजरमध्ये दिसला आहे.

iQOO Z9 5G डिजाइन

  • iQOO Z9 5G चे डिजाइन पाहता अ‍ॅमेझॉन लिस्टिंगमध्ये हा हिरव्या कलरमध्ये समोर आला आहे. यात यूनिक ब्रश पॅटर्न आणि टेक्सचर दिसते.
  • डिव्हाइसच्या बॅक पॅनलवर ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश सादर करण्यात आले आहे.
  • फोनच्या उजव्या साइडवर पावर आणि वॉल्यूम बटन पाहायला मिळू शकतात. तर फोनचे पुढचा पॅनल अजून कंपनीद्वारे सांगण्यात आले नाही.

iQOO Z9 5G चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले: iQOO Z9 5G फोनमध्ये 6.67-इंचाचा 1.5K OLED डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. यावर 120Hz रिफ्रेश रेट, 1800 निट्स पीक ब्राइटनेस आणि 300Hz ​टच सॅम्पलिंग रेट दिला जाऊ शकतो.
  • प्रोसेसर: ब्रँडने कंफर्म केले आहे की iQOO Z9 MediaTek Dimensity 7200 चिपसोबत लाँच केला जाईल.
  • कॅमेरा: फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा LED फ्लॅशसह मिळण्याची गोष्ट पण कंफर्म आहे ज्या प्रायमरी कॅमेऱ्यामध्ये Sony IMX882 OIS कॅमेरा सेन्सर असेल.
  • बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत सांगण्यात आले आहे की नवीन iQOO Z9 5G 6,000mAh ची बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो.
  • स्टोरेज: डेटा स्टोरेज पाहता iQOO Z9 मध्ये 12 जीबी पर्यंत रॅम आणि 512 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळू शकते.
  • ओएस: iQOO Z9 डिव्हाइसमध्ये लेटेस्ट अँड्रॉइड 14 ला सादर केले जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here