Jio 5G येण्याआधीच अंबानींच्या कंपनीला मोठा फायदा; Airtel आणि Vi राहिले मागे

Reliance Jio Adds Over 29 Lakh Mobile Subscribers Before Ambani 5G Service

Jio 5G Launch: रिलायन्स जियो (Reliance Jio) पुढील महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये दिवाळी (24 ऑक्टोबर 2022) पर्यंत 5G लाँच करणार आहे. याची माहिती Mukesh Ambani यांनी स्वतः गेल्या महिन्यात झालेल्या रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत दिली होती. त्यामुळे जियो भारतातील सर्वात पहिली टेलिकॉम कंपनी ठरू शकते, जी 5G सेवा लाँच करेल. ग्राहकांना देखील चौल लागल्याचं अलीकडेच आलेल्या टेलिकॉम रेग्युलेटर अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) च्या रिपोर्टमधून दिसून येत आहे. जियोचं नवीन सिम (JIO SIM) घेण्यासाठी ग्राहक गर्दी करत आहेत. चला जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे.

जियो युजर्सची संख्या वाढली

टेलीकॉम रेग्युलेटर अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) प्रत्येक महिन्यात काही आकडेवारी जारी करते, जिच्या माध्यमातून टेलिकॉम विश्वातील घडामोडी समोर येतात. आता लेटेस्ट आकडेवारीनुसार Jio नं जुलैमध्ये 29 लाख 40 हजार नवीन सब्सक्राइबर्स जोडले आहेत. तर जूनमध्ये जियोनं सुमारे 4 लाख 20 हजार नवीन सब्सक्राइबर्स अ‍ॅड केले होते. हे देखील वाचा: अँड्रॉइडपेक्षा स्वस्त झाले iPhone; नवीन मॉडेल येताच जुन्या मॉडेल्सवर जबरदस्त डील

Reliance Jio Adds Over 29 Lakh Mobile Subscribers Before Ambani 5G Service

Airtel आणि Vi राहिले मागे

Bharti Airtel बद्दल बोलायचं झालं तर जुलैमध्ये एयरटेलनं फक्त 5 लाख नवीन सब्सक्राइबर्स अ‍ॅड केले. तर वोडाफोन आयडियाच्या 15 लाख सब्सक्राइबर्सनी जुलैमध्ये कंपनीची साथ सोडली आहे. सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL चे 1,327,999 ग्राहक कमी झाले आहेत, जी गेले कित्येक महिने युजर्स जोडत होती. MTNL बद्दल बोलायचं झालं तर दुसऱ्या सरकारी कंपनीने देखील 3,038 युजर्स गमावले आहेत.

Reliance Jio Adds Over 29 Lakh Mobile Subscribers Before Ambani 5G Service

Jio कडे एकूण 41.5 कोटी सब्सक्राइबर्स

ट्रायच्या आकडेवारीनुसार सर्वात जास्त टेलिकॉम सब्सक्राइबर्स जियो (Jio) कडे आहेत. जियोकडे एकूण 41.5 कोटी सब्सक्राइबर्स आहेत. तर भारती एयरटेलच्या युजर्सची संख्या 36.3 कोटींच्या घरात आहे. तसेच या लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानी वोडाफोन-आयडिया (Vodafone Idea) आहे. Vi कडे एकूण सब्सक्राइबर्सची संख्या 25.5 कोटी आहे. हे देखील वाचा: Jio Offer: 300 रुपयांचा रिचार्ज करा आणि 10 लाख जिंका; जियोच्या भन्नाट ऑफरचे फक्त तीन दिवस शिल्लक

Jio 5G बँड्स आणि स्पीड

कंपनीनं मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ़मध्ये एकूण 4420 कोटी रुपयांचं रुपयांचा 5G स्पेक्ट्रम खरेदी केलं आहे. तसेच 5जी स्पेक्ट्रम लिलावातून जियोने 700 MHz, 800 MHz, 1800 MHz, 3300 MHz मिड फ्रीक्वेंसी बँड्स तसेच 26 GHz High frequency bands मिळवले होते. तसेच रिलायन्स जियोनं देशातील सर्व 22 टेलिकॉम सर्कल्समध्ये 700 मेगाहर्ट्ज प्रीमियम स्पेक्ट्रम मिळवलं आहे. यात मुंबई, दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू, पुणे आणि चेन्नई सारख्या जास्त लोकसंख्या शहरांचा देखील समावेश आहे. रिलायन्स जियो ग्राहकांना जास्त वेगवान आणि इनडोर 5जी कव्हरेज देणार आहे, असा दावा कंपनीनं केला आहे. कदाचित म्हणूनच कंपनीकडे नव्या कंपन्यांचा ओढ वाढला असावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here