कमी किंमत असलेले असलेले OnePlus Nord N10 5G आणि Nord N100 या महिन्यात होऊ शकतो लॉन्च

टेक कंपनी वनप्लस 14 ऑक्टोबरला OnePlus 8T लॉन्च करणार आहे. हा फोन 65W फास्ट चार्जिंग आणि 120hz रिफ्रेश रेट डिस्प्ले सारख्या फीचर्स सह येईल. इतकेच नव्हे तर हा वनप्लसचा सर्वात फास्ट फोन असेल आणि त्यात स्नॅपड्रॅगॉन 865+ प्रोसेसर मिळू शकतो. या फ्लॅगशिप फोन व्यतिरिक्त कंपनी मिड-सेगमेंटच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपले अजून दोन नवीन फोन OnePlus Nord N10 आणि Nord N100 स्मार्टफोन पण या महिन्यात लॉन्च करण्याची तयारी करत आहे. याची माहिती टिप्सटर मुकुल शर्माने ट्विट करून दिली आहे.

Nord सीरीज मध्ये येणाऱ्या या स्मार्टफोन्स बद्दल बोलले जात आहे कि हे अफोर्डेबल कॅटेगरी मधेच सादर केले जातील. अलीकडेच OnePlus Nord 100 आणि OnePlus Nord 105g नावाचे फोन्स एका वेबसाइट वर काही काळासाठी लिस्ट केले गेले होते, त्यावरून इशारा मिळाला होता होता कि हे दोन फोन पण भविष्यात कंपनी लॉन्च करू शकते. तसेच कंपनी अनेक दिवसांपासून आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम पेज OnePlus Nord वर टीजर टाकत आहे.

टिप्सटरने फोन्सच्या लॉन्च डेटची माहिती दिली नाही. पण बोलले जात आहे कि हे फोन्स सर्वात आधी अमेरिकेत सादर केले जातील. आधीच्या रिपोर्टनुसार OnePlus Nord N10 5G ची किंमत लॉन्च झालेल्या OnePlus Nord पेक्षा पण कमी असेल. रिपोर्टनुसार फोनची किंमत $400 (जवळपास 29,500 रुपये) च्या आसपास असेल.

View this post on Instagram

#ComingSoon

A post shared by OnePlus Nord (@oneplus.nord) on

वनप्लस नॉर्ड एन10 5जी चे स्पेसिफिकेशन्स

काही दिवसांपूर्वी आलेल्या रिपोर्ट नुसार वनप्लस नॉर्ड एन10 5जी मध्ये 6.49 इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले आणि 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट दिला जाईल. तसेच हा फोन स्नॅपड्रॅगॉन 690 प्रोसेसर सह 6 जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज सह येऊ शकतो.

इतकेच नव्हे तर वनप्लस नॉर्ड एन10 5जी मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्याचा प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा असेल आणि 8 मेगापिक्सलचा वाइड-अँगल कॅमेरा असेल. तसेच दोन अतिरिक्त 2 मेगापिक्सलचे कॅमेरे असू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here