OPPO कडून दिवाळीची शानदार भेट! 1-2 नव्हे तर 5 स्मार्टफोन्सच्या किंमती केल्या कमी

ओप्पो इंडियानं दिवाळीच्या निमित्ताने आपल्या स्मार्टफोन युजर्सना दमदार भेट दिली आहे. कंपनीनं एकाच वेळी आपल्या 5 स्मार्टफोन मॉडेल्सच्या किंमतीत मोठी कपात करून त्यांची प्राइस कमी केली आहे. हा प्राइस ड्रॉप OPPO A55, OPPO A77, OPPO F21 Pro आणि OPPO F21s Pro मध्ये झाला आहे त्यामुळे आजपासून हे OPPO Mobiles कमी किंमतीत विकत घेता येतील. कोणत्या ओप्पो मोबाइलच्या किंमतीत किती कपात झाली ही माहिती पुढे देण्यात देण्यात आली आहे.

OPPO Phone Price

सर्वप्रथम ओप्पो ए सीरीज स्मार्टफोन्स पाहता, OPPO A55 6GB RAM + 128GB storage व्हेरिएंटच्या किंमतीत कंपनीनं 1 हजार रुपयांची कपात केली आहे. हा फोन व्हेरिएंट आतापर्यंत 15,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होता जो आजपासून 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच ओप्पो ए55 चा 4 जीबी रॅम मॉडेल जवळपास 500 रुपयांनी स्वस्त झाला आहे, त्यामुळे 14,990 रुपयांच्या ऐवजी हा 14,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. OPPO A77 ची प्राइस आधी 16,499 रुपये होती जी आता कमी होऊन 15,999 रुपये झाली आहे. हे देखील वाचा: हा प्लॅन पाहून सिम पोर्ट करण्याची होईल इच्छा! 160 दिवसांची वैधता आणि 2GB डेली डेटा असलेला प्लॅन

OPPO F21 Pro आणि OPPO F21s Pro दोन्ही स्मार्टफोन आता कंपनीकडून 1,000 रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहेत. हे दोन्ही मोबाइल फोन 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात, ज्यांची किंमत आधी 22,999 रुपये होती. आता प्राइस कटनंतर हे ओप्पो स्मार्टफोन्स 21,999 रुपयांमध्ये विकत घेता येतील.

OPPO A17

ओप्पो ए17 स्मार्टफोन 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. वॉटरड्रॉप नॉच स्टाइल असलेल्या या फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 60हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. या फोनची जाडी फक्त 8.29 एमएम आहे तर OPPO A17 चे वजन 189 ग्राम आहे.

50mp camera 5000mah battery phone oppo a17 launched india price sale specification

OPPO A17 अँड्रॉइड 12 आधारित कलर ओएस 12.1.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे तर ग्राफिक्ससाठी हा मोबाइल फोन आईएमजी जीई8320 जीपीयूला सपोर्ट करतो. 4जीबी एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजीमुळे या ओप्पो मोबाइलला 8 जीबी रॅम पर्यंतची ताकद मिळते.

फोटोग्राफीसाठी ओप्पो ए17 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला सेकंडरी डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: घर बसल्या मिळेल Airtel 5G सिम, फक्त करावं लागेल छोटंसं काम

OPPO A17 एक ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई वर चालतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी हा ओप्पो मोबाइल 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. आयपीएक्स4 रेटिंग या ओप्पो स्मार्टफोनला पाण्याच्या शिंतोड्यांपासून वाचवू शकते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here