8 हजारांच्या आत लाँच होऊ शकतो 6,000एमएएच बॅटरी असलेला itel चा आगामी स्मार्टफोन, आमच्या हाती लागली माहिती

Highlights

  • itel कंपनी 6,000mAh battery असलेला नवीन फोन घेऊन येत आहे.
  • हा स्मार्टफोन 8,000 रुपयांच्या आत विकला जाऊ शकतो.
  • या आयटेल फोनमध्ये 6.6 इंच एचडी डिस्प्ले मिळू शकतो.

आयटेलनं अलीकडेच भारतीय बाजारात आपला एंट्री लेव्हल डिवायस itel A60 सादर केला आहे जो फक्त 5,999 रुपयांमध्ये लाँच केला गेला आहे. आता 91मोबाइल्सला एक्सक्लूसिव्ह बातमी मिळाली आहे की ही कंपनी आपला आणखी एक स्वस्त मोबाइल फोन बाजारात आणण्याची तयारी करत आहे जो पावरफुल 6,000mAh battery सह येऊ शकतो. सर्वात मोठी बाब म्हणजे हा आयटेल मोबाइल 8,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत भारतात लाँच होऊ शकतो.

आयटेल कंपनी 8 हजार रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये नवीन फोन घेऊन येऊ शकते. या फोनमध्ये 6,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते जी मोठा बॅकअप देऊ शकते. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी नवीन आयटेल फोनमध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते. मिळालेल्या माहितीनुसार हा लो बजेट स्मार्टफोन 6.6 इंचाच्या लार्ज डिस्प्लेला सपोर्ट करू शकतो जो एचडी+ रिजोल्यूशनसह येईल. फोटोमध्ये दिसत आहे की यात ड्युअल रियर कॅमेरा आणि रियर फिंगरप्रिंट सेन्सर देखील दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: Xiaomi 11 Lite NE मध्ये झाला स्फोट, युजरनं शेयर केला व्हिडीओ

itel A60

  • 6.6″ HD+ Display
  • 5,000mAh Battery
  • SC9832E Chipset
  • 8MP Dual Rear Camera
  • Android 12 Go edition

5,999 रुपयांमध्ये लाँच झालेल्या आयटेल ए60 स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा एचडी+ वॉटरड्रॉप नॉच आयपीएस डिस्प्लेला सपोर्ट देण्यात आला आहे जो 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो आणि 2.5डी कर्व्ड एज ग्लासनं प्रोटेक्टेड आहे. हा फोन 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेजसह Dawn Blue, Vert Menthe आणि Sapphire black कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. फोनमध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सर व फेस अनलॉक दोन्ही फीचर्स मिळतात.

itel A60 अँड्रॉइड 12 गो एडिशनवर लाँच करण्यात आला आहे जो SC9832E चिपसेटवर चालतो. फोनमध्ये 128जीबी पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्डचा वापरता करता येतो. आयटेल ए60 च्या बॅक पॅनलवर 8 मेगापिक्सल ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच फ्रंट पॅनलवर 5 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. या फोनमध्ये 5,000एमएएच असलेली बॅटरी देण्यात आली आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार 750 तासांचा स्टँडबाय टाइम देऊ शकते. हे देखील वाचा: POCO X5 5G फोन भारतात लाँच; फोनमध्ये 48MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी

अलीकडेच समोर आलेल्या काउंटरपॉईंटच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं श्र की आयटेल ब्रँड त्या मोबाइल युजर्सना जास्त आवडत आहे जे पहिल्यांदा स्मार्टफोन वापरत आहेत. हे ते युजर्स आहेत जे 8,000 रुपयांच्या सेग्मेंटमध्ये आपला पहिला स्मार्टफोन खरेदी करू इच्छित आहेत. म्हणजे एंट्री लेव्हल स्मार्टफोन्सच्या कॅटेगरीमध्ये आईटेल ब्रँड लोकप्रिय होत आहे. अलीकडेच आयटेलनं बॉलीवुड अ‍ॅक्टर ऋतिक रोशनला ब्रँड अ‍ॅम्डेबडर बनवलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here