Realme C55 भारतात 21 मार्चला होईल लाँच, मिळेल 64MP Camera आणि 16GB Dynamic RAM

Highlights

  • Realme C55 च्या भारतीय लाँच डेटची घोषणा केली आहे.
  • फोनमध्ये 33W Fast Charging आणि 5,000mAh Battery चा सपोर्ट मिळेल.
  • स्मार्टफोनमध्ये 64MP Rear Camera आणि 16GB Dynamic RAM ची पावर मिळेल.

Realme C55 21 मार्चला भारतात लाँच होईल. याबाबत गेल्या कित्येक दिवसांपासून लीक्स येत आहेत आणि कंपनी देखील अनेक दिवस हा फोन आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीज करत आहे. आज रियलमीनं या नवीन ‘सी’ सीरीज स्मार्टफोनच्या लाँच डेटची घोषणा केली आहे. 21 मार्चला भारतात लाँच होणारा रियलमी सी55 स्मार्टफोन 64MP Rear Camera आणि 16GB Dynamic RAM च्या पावरसह येईल, अशी माहिती स्मार्टफोनच्या प्रोडक्ट पेजवरून मिळाली आहे.

रियलमी सी55 इंडिया लाँच

कंपनीनं अधिकृतपणे माहिती दिली आहे की Realme C55 स्मार्टफोन येत्या 21 मार्चला भारतात लाँच केला जाईल. रियलमी इंडिया वेबसाइटवर या फोनचं प्रोडक्ट पेज लाइव्ह करण्यात आला आहे ज्यात अनेक फीचर्स व स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. रियलमी सी55 लाँच इव्हेंट 21 मार्चला दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल जो कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच रियलमी इंडियाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह बघता येईल. विशेष म्हणजे शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर देखील Realme C55 प्रोडक्ट पेज लिस्ट करण्यात आलं आहे, त्यामुळे हा फोन फ्लिपकार्टवर विकला जाईल हे स्पष्ट झालं आहे. हे देखील वाचा: POCO X5 5G फोन भारतात लाँच; फोनमध्ये 48MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी

रियलमी सी55 चे स्पेसिफिकेशन्स

  • 16GB Dynamic RAM
  • 64MP Rear Camera
  • 33W SuperVOOC charging
  • 5,000mAh battery

रियलमी इंडिया वेबसाइटवर खुलासा झाला आहे की हा स्मार्टफोन 8जीबी डायनॉमिक रॅम टेक्नॉलॉजीसह येईल. या फोनमध्ये 8 जीबी इंटरनल रॅम दिली जाईल जो डायनॉमिक रॅम टेक्नॉलॉजीसह मिळून Realme C55 ला 16जीबी रॅमची परफॉर्मन्स देऊ शकेल. आशा आहे की भारतात हा फोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल ज्यात 6जीबी रॅमचा देखील समावेश असू शकतो.

Realme C55 मध्ये फोटोग्राफीसाठी डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल ज्यात प्रायमरी सेन्सर 64 मेगापिक्सलचा असेल. हा कॅमेरा सेन्सर आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजी तसेच पोर्टरेट मोड व नाइट मोडसह येईल. या फोनमध्ये पंच-होल स्टाईल स्क्रीन मिळेल. तसेच कंपनीनं सांगितलं आहे की रियलमी सी55 ची जाडी फक्त 7.89एमएम असेल. हे देखील वाचा: 8 हजारांच्या आत लाँच होऊ शकतो 6,000एमएएच बॅटरी असलेला itel चा आगामी स्मार्टफोन, आमच्या हाती लागली माहिती

पावर बॅकअपसाठी रियलमी सी55 5,000एमएएच बॅटरीसह बाजारात येईल जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. कंपनीचा दावा आहे की हा मोबाइल फोन फक्त 29 मिनिटांत 0 ते 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकतो. एक्स फुल चार्ज झाल्यावर 27 दिवसांचा स्टँडबाय टाइम देखील हा फोन देऊ शकतो, असं कंपनीनं सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here