realme P1 5G भारतात झाला लाँच, जाणून घ्या या स्वस्त मोबाईलची किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशनसह सर्व माहिती

रियलमीने आजपासून भारतात एका नवीन स्मार्टफोन सीरिज realme P series ची सुरुवात केली आहे. यानुसार दोन मोबाईल फोन realme P1 5G आणि realme P1 Pro 5G भारतात लाँच झाले आहेत. दोन्ही फोन कमी किंमतीत चांगले फिचर्स आणि स्पेसिफिकेशन प्रदान करतात. सीरिजचे बेस मॉडेल रियलमी पी 1 5 जी फोनची किंमत, ऑफर्स आणि सेलसह इतर माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

realme P1 5G Specifications

  • 6.7″ 120Hz Curved AMOLED Screen
  • Qualcomm Snapdragon 6 Gen 1
  • 8GB RAM + 256GB Storage
  • 8GB Dynamic RAM
  • 16MP Selfie Camera
  • 50MP Dual Rear Camera
  • 45W 5,000mAh Battery

स्क्रीन : रियलमी पी 1 5 जी फोनमध्ये फ्लॅट स्क्रीन देण्यात आली आहे. हा मोबाईल 2412 X 1080 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे जी अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे. यावर 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट, 240 हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट व 600 निट्स ब्राईटनेससह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर पण मिळते.

प्रोसेसर : रियलमी पी 1 मीडियाटेक डाइमे​नसिटी 7050 ऑक्टाकोर प्रोसेसरवर लाँच झाला आहे. हा 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेली मोबाईल चिपसेट आहे जी 2.6 गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर रन करण्याची क्षमता ठेवतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये माली-जी68 जीपीयू आहे.

मेमरी : realme P1 5G फोन RAM UFS3.1 + LPDDR4X Storage टेक्नॉलॉजीवर चालतो. हा मोबाईल 8 जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट करतो जो फोनच्या फिजिकल रॅमसह मिळून याला 16 जीबी पर्यंत वाढवते. या फोनमध्ये 256 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेज मिळते ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1 टीबी पर्यंत वाढवता येते.

ओएस : रियलमी पी 1 5 जी स्मार्टफोन अँड्रॉईड 14 वर लाँच झाला आहे जो रियलमी युआय 5.0 सह मिळून चालतो. कंपनी आपला हा फोन 4 जेनरेशन Android Software update तसेच 3 वर्षाच्या security update सह घेऊन येणार आहे.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी रियलमी पी 1 ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल सोनी एलवायटी 600 सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असणारा 2 मेगापिक्सल ब्लॅक अँड व्हाईट सेन्सरसह चालतो. सेल्फी काढणे तसेच रिल्स बनविण्यासाठी या फोनमध्ये एफ/2.45 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी : realme P1 5G फोन 67 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. या मोबाईलमध्ये 5,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार 28 मिनिटामध्ये 0 ते 50% चार्ज तसेच 65 मिनिटामध्ये 100 टक्के फुल चार्ज होऊ शकते. या फोनमध्ये OTG reverse charging पण मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here