19,999 रुपयांच्या बजेटमध्ये आला Realme P1 Pro 5G, 16 जीबी पर्यंत रॅम आणि मिळेल 50MP कॅमेरा 5000mAh बॅटरी

भारतीय बाजारात रियलमीची पहिली पी-सीरिज सादर झाली आहे. यानुसार Realme P1 5G आणि Realme P1 Pro 5G स्मार्टफोन बाजारात लाँच झाले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही फोन कमी बजेटमध्ये जबरदस्त डिझाईन आणि शक्तिशाली वैशिष्ट्ये प्रदान करतात. जर प्रो मॉडेल पाहता हा 6.7 इंचाचा मोठा डिस्प्ले, डायनॅमिक टेक्नॉलॉजीसह 16GB रॅम, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, रेनवॉटर स्मार्ट टच फिचर, 5000mAh बॅटरी सारखे अनेक फिचर्ससह ठेवण्यात आला आहे. चला, पुढे रियलमी पी1 प्रो 5 जी ची किंमत आणि संपूर्ण स्पेसिफिकेशन जाणून घेऊया.

Realme P1 Pro 5G ची किंमत

  • रियलमीचे नवीन पी सीरीज डिव्हाईस दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये भारतीय बाजारात आले आहेत.
  • मोबाईलच्या 8GB रॅम +128GB व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे, तर 8GB रॅम +256 जीबी मॉडेल 22,999 रुपये आहे.
  • लाँच ऑफर पाहता Realme P1 Pro 5G वर ब्रँड आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि एसबीआय कार्डच्या मदतीने 2,000 रुपयांचा त्वरित डिस्काऊंट देत आहे.
  • ज्यानंतर सामान्य मॉडेल 19,999 रुपये आणि टॉप मॉडेल 20,999 रुपयांना मिळेल.
  • फोनचे रेड कलर ऑप्शन लिमिटेड सेल 22 एप्रिलपासून संध्याकाळी 6:00 ते 8:00 पर्यंत फ्लिपकार्ट आणि realme.com वर असेल . तसेच, ओपन सेल येत्या 30 एप्रिलपासून दुपारी 12:00 वाजता सुरु होईल.</li

Realme P1 Pro 5G ची डिझाईन

Realme P1 Pro 5G ची डिझाईन पाहता यात युजर्सना अल्ट्रा नॅरो चिन डिझाईन पाहायला मिळते. फोनचे स्क्रीन टू बॉडी रेश्यो 93% आहे. याच्या बॅक पॅनलवर मोठा सर्कुलर कॅमेरा माड्यूल आहे. ज्यात एलईडी फ्लॅश आणि दोन कॅमेरा लावले आहेत. डिव्हाईस मात्र 8.3mm पातळ आहे आणि याचे वजन 184 ग्रॅम आहे. तसेच मोबाईल फोनचे पॅरोट ब्लू आणि फिनिक्स रेड सारखे दोन कलर ऑप्शन लाँच झाले आहेत.

Realme P1 Pro 5G चे स्पेसिफिकेशन

  • 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले
  • 120Hz रिफ्रेश रेट
  • स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 चिपसेट
  • 8GB रॅम +256 जीबी स्टोरेज
  • 50 मेगापिक्सल रिअर
  • 16 मेगापिक्सल फ्रंट
  • 5000mAh बॅटरी
  • 45 वॉट फास्ट चार्जिंग
  • आयपी 65 रेटिंग
  • अँड्रॉईड 14

डिस्प्ले

नवीन डिव्हाईस Realme P1 Pro 5G मध्ये युजर्सना 6.7 इंचाचा FHD+ Curved Vision OLED डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यावर 2412 x 1080 पिक्सल रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 950 निट्स पीक ब्राईटनेस देण्यात आली आहे. हे नवीन डिव्हाईस डोळ्याच्या सुरक्षेसाठी TÜV Rheinland प्रोटेक्शनसह येतो.

प्रोसेसर

रियलमी पी1 प्रो 5 जी चा प्रोसेसर पाहता कंपनीने यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 5G चिपसेट दिली आहे. हा चार नॅनोमीटर प्रक्रियावर चालतो ज्यात युजर्सना 2.2Ghz पर्यंतचे हाईएस्ट क्लॉक स्पीड मिळते. म्हणजे की मोबाईलवर गेमिंग किंवा कोणतेही इतर ऑपरेशन सहज केले जातील. त्याचबरोबर डिव्हाईसमध्ये 3 डी वीसी कूलिंग सिस्टम पण मिळते, ज्यामुळे हीटिंगपासून बचाव होतो.

स्टोरेज

डाटा स्टोर करण्यासाठी फोनमध्ये दोन स्टोरेज ऑप्शन सादर करण्यात आले आहे. ज्यात 8GB रॅम +128GB स्टोरेज आणि 8GB रॅम +256 जीबी स्टोरेजचा समावेश आहे. त्याचबरोबर डायनॅमिक रॅमची सुविधा आहे ज्याच्या मदतीने 8GB पर्यंत रॅम वाढवता येईल. म्हणजे की ग्राहकांना स्मार्टफोनमध्ये 16GB पर्यंत रॅमची पावर मिळते.

कॅमेरा

कॅमेरा फिचर्स पाहता रियलमी पी 1 प्रो 5 जी 50 मेगापिक्सलचे प्रायमरी कॅमेरा सेन्सरसह लाँच करण्यात आला आहे. यात ऑप्टिकल फोटो स्टॅबिलायजेशनला सपोर्ट मिळतो. या मेन कॅमेरा लेन्ससह 8 मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कॅमेरा लावण्यात आला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी युजर्सना 16 मेगापिक्सलची फ्रंट कॅमेरा लेन्स मिळते.

बॅटरी

बॅटरीच्या बाबतीत रियलमी पी1 प्रो 5जी स्मार्टफोन 5000mAh ची बॅटरी आणि 45वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंगला सपोर्टसह बाजारात आला आहे.

इतर

रियलमी पी1 प्रो 5जी मोबाईलमध्ये 2.4 से 5GHz वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, आयपी65 रेटिंग, रेनवॉटर टच फिचर, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, हाय रेस ड्युअल स्पिकर, 9 5G बँड सारखे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.

ओएस

ऑपरेटिंग सिस्टम पाहता रियलमी पी 1 प्रो 5 जी स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉईड 14 आधारित रियलमी युआय 5.0 वर चालतो. कंपनीचा दावा आहे की फोनसह 3 वर्षाचे सिक्योरिटी अपडेट आणि 2 वर्षाचे ओएस अपडेटची सुविधा दिली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here