खुशखबर : 4जीबी रॅम असलेला रियलमी यू1 झाला 1500 रुपयांनी स्वस्त, किंमत फक्त 9,999 रुपयांपासून सुरु

रियलमी ब्रँडचे नाव पण त्या निवडक ब्रँड्स मध्ये येते ज्यांनी नेमक्याच स्मार्टफोन्सच्या जीवावर बाजारात नाव कमावले आहे. आपल्या फॅन्सना भेट देत रियलमी ने फेब्रुवारी मध्ये आपल्या स्वस्त स्मार्टफोन रियलमी यू1 ची किंमत कमी केली होती. आता पुन्हा एकदा रियलमी ने नवा डाव खेळाला आहे. कंपनीने पुन्हा या स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. रियलमी ने रियलमी यू1 अजून स्वस्त केला आहे. कंपनी ने रियलमी यू1 च्या किंमतीत 1,500 रुपयांची कायमस्वरूपी कपात केली आहे.

या आहेत नवीन किंमती
रियलमी इंडिया ने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वर पोस्ट करत रियलमी यू1 मध्ये प्राइज कटची घोषणा केली आहे. कंपनी ने रियलमी यू1 च्या 4जीबी रॅम वेरिएंट मध्ये थेट 1,500 रुपयांची कपात केली आहे. किंमत कमी केल्यांनंतर 13,499 रुपयांमध्ये विकला जाणारा रियलमी यू1 चा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट आता 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच कंपनी ने रियलमी यू1 च्या 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत पण 1,000 रुपयांनी कमी केली आहे. प्राइज कट नंतर रियलमी यू1 चा हा वेरिएंट 10,999 रुपयांच्या ऐवजी आता फक्त 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

इथून विकत घ्या
रियलमी यू1 चे दोन्ही वेरिएंट आज पासूनच रियलमी इंडियाच्या आफिशियल वेबसाइट सोबत शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर सेल साठी उपलब्ध झाले आहेत. रियलमी यू1 एम्बिशियस ब्लॅक, ब्रेव ब्लू आणि फेरी गोल्ड कलर मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

हे देखील वाचा: वोडाफोन पुन्हा एकदा प्रीपेड यूजर्स साठी घेऊन आला आहे 50 आणि 100 रुपयांचे रिचार्ज प्लान, मिळतील हे फायदे

रियलमी यू1 स्पेसिफिकेशन्स
रियलमी यू1 बद्दल बोलायचे तर हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले वर सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप मधील ड्यूड्रॉप नॉच देण्यात आली आहे. हा फोन 6.3-इंचाच्या फुलएचडी+ ​डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 2.5डी कर्व्ड गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. फोनच्या नॉच मधेच सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

हा फोन कलर ओएस 5.2 आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर केला गेला आहे. हा फोन 2.1 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक च्या लेटेस्ट चिपसेट हेलीयो पी70 वर चालतो. या फोन मध्ये ग्राफिक्स साठी एआरएम जी72 जीपीयू देण्यात आला आहे. तसेच फोनच्या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते.

हे देखील वाचा: एआई कॅमेरा आणि मीडियाटेकच्या दमदार प्रोसेसर सह लॉन्च झाला एलजी के12+, बघा किंमत आणि फीचर्स

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता रियलमी यू1 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 25-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनचे दोन्ही कॅमेरा सेटअप बोका इफेक्टला सपोर्ट करतात.

रियलमी यू1 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजीला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी रियलमी यू1 मध्ये ओटीजी सपोर्ट सह 3,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here