पावरफुल Realme X7 Max 5G फोन भारतात लॉन्च, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत बघून व्हाल हैराण

Realme ने आज भारतात आपले शक्तिप्रदर्शन करत नवीन 5जी फोन लॉन्च केला आहे. अनेक दिवस चर्चेत राहिल्यानंतर नंतर आज अखेरीस Realme X7 Max 5G फोनने भारतीय बाजारात पदार्पण केले आहे. रियलमी एक्स7 मॅक्स 5जी फोन भारतीय बाजारात 12जीबी रॅम आणि मीडियाटेक डायमनसिटी 1200 चिपसेटसह लॉन्च केला गेला आहे आणि ताकदवान बॅटरी आणि शानदार कॅमेऱ्यासह येतो. रियलमी एक्स7 मॅक्सची आरंभिक किंमत 26,999 रुपये आहे आणि हा फोन येत्या 4 जूनपासून फ्लिपकार्टवर विकत घेता येईल. (realme x7 max 5g phone officially launched in india price specs sale offer)

Realme X7 Max 5G ची किंमत

रियलमी एक्स7 मॅक्स 5जी फोन भारतात दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च झाला आहे. फोनच्या बेस वेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच दुसरा वेरिएंट 12 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या वेरिएंटची किंमत पाहता 8GB + 128GB 26,999 रुपये तर 12GB + 256GB 29,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

Realme GT Neo 5G launch

Realme X7 Max 5G चे स्पेसिफिकेशन्स

Realme X7 Max 5G चा डिस्प्ले

रियलमी एक्स7 मॅक्स 5जी फोन कंपनीने 2400 x 1080 पिक्सल रेजल्यूशन असलेल्या 6.43 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लॉन्च केला आहे जो सुपर एमोलेड पॅनलवर बनला आहे. हि स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करते तसेच ऑटोमेटिक रेट अडेप्टेशन फंक्शनसह येते. हा फोन डिस्प्ले 1000नीटस ब्राइटनेस आणि डीसीआई-पी3 कलर गामुटला सपोर्ट करतो. स्क्रीन स्क्रॅचेस पासून वाचवण्यासाठी यात ग्लास प्रोटेक्शन देण्यात आले आहे.

हे देखील वाचा : Xiaomi ने आणली दमदार टेक्नोलॉजी, फक्त 8 मिनिटांत फुल चार्ज होईल स्मार्टफोन

Realme X7 Max fet

Realme X7 Max 5G चा प्रोसेसर

रियलमी एक्स7 मॅक्स 5जी फोन अँड्रॉइड 11 ओएसवर लॉन्च झाला आहे जो रियलमी युआय 2.0 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 3.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर तसेच 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेकचा डायमनसिटी 1200 चिपसेट देण्यात आला आहे. सांगण्यात आले आहे कि या स्मार्टफोनमध्ये 7 5G बॅंड सपोर्ट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एआरएम जी77 जीपीयू सोबतच गेमिंग करताना फोन थंड राहावाम्हणून Stainless Steel Vapour Cooling टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

Realme X7 Max 5G चा कॅमेरा

रियलमी एक्स7 मॅक्स 5जी मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सोनी आईएमएक्स682 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.3 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Realme X7 Max 5G फोनमध्ये एफ/2.5 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा इन-डिस्प्ले कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Exclusive : Samsung Galaxy A03s स्मार्टफोनची डिजाइन झाली लीक, स्पेसिफिकेशन्सचा पण झाला खुलासा

Realme X7 Max

Realme X7 Max 5G की बॅटरी

पावरफुल स्पेसिफिकेशन्सचा फायदा युजर दीर्घकाळ घेऊ शकतात यासाठी रियलमीने आपला फोन पावरफुल बॅटरीसह सादर केला आहे. हा मोबाईल फोन 4,500एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो जी वेगाने करण्यासाठी 50W SuperDart Charge टेक्नॉलॉजी सपोर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर Realme X7 Max 5G सुपर पावर सेविंग मोड आणि OTG रिवर्स चार्ज टेक्नोलॉजीसह बाजारात आला आहे.

Realme X7 Max 5G ची डिजाईन

रियलमी एक्स7 मॅक्स 5जी फोन पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च केला गेला आहे. फोनचा बॅक पॅनल ग्लॉसी आणि मैट टेक्स्चरचा बनला आहे ज्याच्या उजव्या कोपऱ्यात कॅमेरा सेटअप आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली संपूर्ण पॅनलवर शाईनी ग्लासी पॅटर्न बनवण्यात आला आहे. या फोनचे डायमेंशन 158.5×73.3×8.4एमएम आणि वजन 179ग्राम आहे. Realme X7 Max 5G ला पाणी व धुळीपासून वाचवण्यासाठी IPX4 रेटिंग देण्यात आली आहे. हा फोन Mercury Silver, Asteroid Black आणि Milky Way कलरमध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here