Exclusive : Samsung Galaxy A03s स्मार्टफोनची डिजाइन झाली लीक, स्पेसिफिकेशन्सचा पण झाला खुलासा

Samsung ने गेल्यावर्षी आपला एंट्री लेवल स्मार्टफोन Galaxy A02s लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन कंपनीच्या Galaxy A-सीरीजचा सर्वात अफोर्डेबल स्मार्टफोन होता, जो कंपनीने भारतात Galaxy M02s नावाने लॉन्च केला होता. आता आम्ही कंफर्म करत आहोत कि Samsung सध्या Galaxy A02s च्या सक्सेसर स्मार्टफोनवर काम करत आहे आणि हा Samsung Galaxy A03s नावाने सादर केला जाऊ शकतो. अपकमिंग Galaxy A03s स्मार्टफोन बाबत सध्या कोणताही लीक रिपोर्ट आले नाहीत. 91Mobiles कडे एक्सक्लूसिव Galaxy A03s स्मार्टफोनचे रेंडर आहेत जे प्रसिद्ध टिपस्टर @OnLeaksच्या माध्यमातून समोर आले आहेत. त्याचबरोबर आमच्याकडे Galaxy A03s स्मार्टफोनसंबंधित काही स्पेसिफिकेशन्स पण आहेत. (samsung galaxy a03s design specifications leaked)

Samsung Galaxy A03s डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A03s स्मार्टफोनचे रेंडर्स पाहून समजले आहे कि या फोनची डिजाइन Galaxy A02s सारखी आहे. असे जरी असले तरी यात काही बदल पण दिसत आहेत. सॅमसंग Galaxy A03s स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर Galaxy A02s स्मार्टफोनची तुलना करायची झाल्यास यात कंपनीने फिंगर प्रिंट स्कॅनर नव्हता दिला. तसेच चार्जिंगसाठी माइक्रो-USB पोर्ट दिला होता. OnLeaksनुसार Galaxy A03s स्मार्टफोनचे मेजरमेंट 166.6 x 75.9 x 9.1mm आहे. जर रियर पॅनलवरील कॅमेरा बंपचा विचार केला तर याची थिकनेस 9.5mm होते.

Samsung Galaxy A03s स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता टिपस्टर Steve Hemmerstoffer ने काही माहिती शेयर केली आहेत. या स्मार्टफोनमध्ये सॅमसंग 6.5-इंचाचा डिस्प्ले देऊ शकते, ज्यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी V-शेप नॉच दिली जाऊ शकते. फ्रंट कॅमेरा 5MP चा कॅमेरा असू शकतो. रियर कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता या फोनचा प्राइमेरी कॅमेरा 13MP चा आहे, त्याचबरोबर दोन 2MP कॅमेरा सेंसर दिले जाऊ शकतात. अपकमिंग Galaxy A03s स्मार्टफोनचे रेंडर्स पाहता यात 3.5mm चा ऑडियो जॅक पण मिळतो.

हे देखील वाचा : Xiaomi ने आणली दमदार टेक्नोलॉजी, फक्त 8 मिनिटांत फुल चार्ज होईल स्मार्टफोन

डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स पाहता Galaxy A03s आणि गेल्यावर्षी लॉन्च केल्या गेलेल्या Galaxy A02s मध्ये अनेक साम्य आहेत. सॅमसंगच्या अपकमिंग स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरसह USB Type-C पोर्ट दिला जात आहे. आशा आहे कि सॅमसंगच्या अपमिंग स्मार्टफोनबाबत जास्त माहिती येत्या काही दिवसांत समोर येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here