Redmi K40 च्या लॉन्चच्या आधी समोर आली महत्त्वाची माहिती, फेब्रुवारी मध्ये करेल एंट्री

शाओमी पासून स्वतंत्र इंडिपेंडेट ब्रँड बनलेली Redmi आपली नवी फ्लॅगशिप सीरीज Redmi K40 पुढल्या महिन्यात लॉन्च करण्यासाठी तयार दिसत आहे. बोलले जात आहे की या सीरीज मध्ये रेडमी के40 आणि रेडमी के40 प्रो सादर केला जाईल. आता Redmi K40 च्या लॉन्च संबंधित माहिती स्वतः रेडमीचे जनरल मॅनेजर ल्यू वीबिंग यांनी शेयर केली आहे. त्यांनी चीनच्या माइक्रोब्लॉगिंग वेबसाइट वीबो वर या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीजची महत्त्वाच्या माहितीचा खुलासा केला आहे.

Redmi K40 सीरीज गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या Redmi K30 सीरीजचा अपग्रेडेड वर्जन असेल. सध्या Redmi K40 सीरीजची लॉन्च डेट समजली नाही. पण असे समजले आहे की Redmi K40 सीरीज स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर सह सादर केला जाईल.

वीबिंगनुसार सीरीज मध्ये स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर चा उल्लेख केला आहे परंतु प्रो वेरियंट मधेच हा चिपसेट असण्याची शक्यता आहे. जनरल मॅनेजरनुसार याची किंमत 2,999 युआन (जवळपास 34,000 रुपये) असेल. रेडमी के40 प्रो स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर असलेला सर्वात स्वस्त हँडसेट असू शकतो.

वीबिंग यांनी इशारा केला आहे कि रेडमी K40 मध्ये AMOLED डिस्प्ले असू शकतो. पण त्यांनी सांगितले आहे की यात Mi 11 प्रमाणे 3 डी घुमावदार डिजाइन असणार नाही. Redmi K40 एका मोठ्या बॅटरी लाइफ सह येईल.

तसेच ब्रँड एग्जिक्युटिवने सांगितले की डिवाइस मध्ये ‘सर्वात महाग फ्लॅट डिस्प्ले’ असेल. तसेच 4000mAh बॅटरी पण दिली जाईल. आशा आहे की रेडमी के40 सीरीजचे सर्व हँडसेट 144 हर्ट्ज रिफ्रेश रेट एलसीडी पॅनल सह येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here