Reliance Jio पुन्हा ठरला देशातील सर्वात वेगवान 4G नेटवर्क

Reliance ने गेल्या आठवड्यात आपल्या 42व्या ऍन्युल जनरल मीटिंग (AGM) च्या मंचावरून Jio Fiber ची घोषणा केली आहे. टेलीकॉम मार्केट मध्ये यश मिळवल्यानंतर या सर्विस सोबत Jio देशातील ब्रॉडबँड बाजारात प्रवेश करत आहे. थोड्याच काळात Vodafone Idea आणि Airtel ला मागे टाकत Jio देशातील सर्वात मोठी दूरसंचार सेवा देणारी कंपनी बनली आहे. Reliance Jio एकीकडे खूप कमी किंमतीत आपल्या सेवा देत आहे तर कंपनी सर्विसच्या बाबतीत प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा कितीतरी पुढे गेली आहे. असाच खुलासा TRAI च्या नवीन रिपोर्ट मध्ये पण झाला आहे.

टेलीकॉम रेग्युलरिटी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे TRAI ने आपला रिपोर्ट सादर केला आहे ज्यात जुलै महिन्याचे वेगवेगळ्या टेलीकॉम कंपन्यांनी दिलेला 4G स्पीड चा लेखाजोखा आहे. या रिपोर्ट मध्ये आश्चर्यकारक आकडे समोर आले आहेत कि Jio फक्त देशात सर्वात वेगवान 4G डाउनलोड स्पीड देत नाही तर Jio चा स्पीड Vodafone Idea आणि Airtel सारख्या कंपन्यांपेक्षा दुप्पटीने जास्त आहे.

4G डाउनलोड स्पीड

TRAI नुसार जुलै 2019 मध्ये Reliance Jio ने 4G नेटवर्क वर सरासरी 21.0 एमबीपीएस चा डाउनलोड स्पीड दिला आहे. या स्पीड सह Jio ने पुन्हा एकदा देशातील सर्वात वेगवान 4जी नेटवर्क असल्याचे सिद्ध झाले आहे. Jio नंतर Airtel कंपनी दुसऱ्या नंबर वर आहे. जुलै महिन्यात Airtel नेटवर्क वर सरासरी 4G डाउनलोड स्पीड 8.8 एमबीपीएस मोजण्यात आला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या नंबर वरील कंपन्यांच्या मध्ये दुपटीपेक्षा जास्त अंतर आहे.

या रिपोर्ट नुसार Vodafone नेटवर्क तिसऱ्या नंबर वर आहे. जुलै 2019 मध्ये Vodafone नेटवर्क वर 7.7 एमबीपीएस चा सरासरी 4जी डाउनलोड स्पीड आला आहे. तर 6.6 एमबीपीएस सरासरी 4जी डाउनलोड स्पीड देत Idea चे नाव चौथ्या नंबर वर आहे.

4G अपलोड स्पीड

त्याचप्रमाणे 4G नेटवर्क वर अपलोड स्पीड बद्दल बोलायचे झाले तर इथे Vodafone चे नाव सर्वात वर आहे. जुलै मध्ये वोडाफोन ने 5.8 एमबीपीएस चा सरासरी 4जी अपलोड स्पीड दिला आहे जो सर्व कंपन्यामध्ये सर्वात जास्त आहे. त्यानंतर Idea चे नाव दुसऱ्या नंबर वर आहे. जुलै 2019 मध्ये आइडिया नेटवर्क वर सरासरी 4जी डाउनलोड स्पीड 5.3 एमबीपीएस चा आहे.

4G नेटवर्क वर सरासरी अपलोड स्पीड मध्ये Reliance Jio तिसऱ्या स्थानावर आहे. Jio ने जुलै 2019 मध्ये 4.3 एमबीपीएस चा सरासरी 4G अपलोड स्पीड दिला आहे. तसेच 3.2 एमबीपीएस चा सरासरी 4जी अपलोड स्पीड देते Airtel ला चौथे स्थान मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here