Samsung Galaxy A10s ची किंमत दिवाळी ऑफर मध्ये झाली अजून पण कमी, 31 ऑक्टोबर पर्यंत मिळेल या किंमतीत

Samsung ने आपल्या फॅन्सना दिवाळीची भेट देत लो बजेट स्मार्टफोन Galaxy A10s ची किंमत कमी केली आहे. हा स्मार्टफोन आता देशात 500 रुपयांच्या डिस्काउंट सह विकत घेता येईल. हि खास फेस्टिव ऑफर फक्त दिवाळीनिमित्त सुरु करण्यात आली आहे जी 31 ऑक्टोबर पर्यंत चालेल. ऑफर अंतर्गत Samsung Galaxy A10s चे दोन्ही वेरिएंट 500 रुपये स्वस्तात विकत घेता येतील. विशेष म्हणजे यूजर्स या ऑफरचा लाभ फक्त ऑफलाईन रिटेल स्टोर्स वरच घेऊ शकतील.

अशी आहे ऑफर

Samsung Galaxy A10s भारतात दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला होता ज्यात 2 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेज आणि 3 जीबी रॅम सह 32 जीबी मेमरी देण्यात आली होती. फोनचा 2 जीबी रॅम वेरिएंट 9,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता तर 3 जीबी रॅम वेरिएंट 10,499 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. आता प्राइज कट केल्यानंतर Galaxy A10s चा 2जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट 8,999 रुपयांमध्ये आणि 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

डिजाईन

Samsung Galaxy A10s कंपनीने इनफिनिटी वी डिस्प्ले वर सादर केला आहे. फोन मध्ये बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्यावर ‘वी’ शेप नॉच आहे. तसेच डिस्प्लेच्या खालच्या बाजूला मोठा चिन पार्ट आहे. Galaxy A10s च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट आहे. Samsung Galaxy A10s च्या रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे. पावर बटण फोनच्या उजव्या पॅनल वर देण्यात आला आहे आणि डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आहे. त्याचप्रमाणे फोनच्या खालच्या पॅनल वर 3.5एमएम जॅक सह यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A10s मध्ये 6.2-इंचाचा एचडी+ टीएफटी इफिनिटी-वी डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात 2.0 गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. भारतात हा फोन दोन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च आहे ज्यात 2जीबी रॅम व 3जीबी रॅम देण्यात आला आहे. दोन्ही वेरिएंट 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात, जी माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. तसेच फोन एंडरॉयड 9 पाई वर चालतो.

फोटोग्राफी साठी सॅमसंग गॅलेक्सी ए10एस मध्ये 13एमपी प्राइमरी कॅमेरा f/1.8 अपर्चर सह देण्यात आला आहे, सोबत 2एमपी डेप्थ सेंसर आहे. वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी फोन मध्ये 8एमपी चा कॅमेरा आहे. कनेक्टिविटी ऑप्शन साठी फोन मध्ये 4जी एलटीई, डुएल-सिल स्लॉट, वाई-फाई, ब्लूटूथ आणि जीपीएस आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच फोन ब्लू, ग्रीन आणि ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here