Samsung Galaxy A90 5G ला मिळाले वाई-फाई सर्टिफिकेशन, लवकरच होऊ शकतो लॉन्च

Samsung Galaxy A90 च्या लॉन्चच्या आधी याबद्दल आतापर्यंत अनेक बातम्या समोर आल्या आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार हा फोन कंपनी 4G वर्जन सह 5G वर्जन मध्ये पण लॉन्च करेल. काही महिन्यांपूर्वी Samsung Galaxy A90 बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म Geekbench वर दिसला होता. मार्केट मध्ये हा डिवाइस SM-A908B मॉडेल नंबर सह येईल. आता Galaxy A90 5G ला वाई-फाई एलायंस वर दिसला आहे.

WIFI Alliance सर्टिफिकेशन पेज मध्ये डिवाइस बद्दल जास्त माहिती समोर आलेली नाही. सर्टिफिकेशन लिस्टिंग नुसार डिवाइस एंडरॉयड 9 पाई आणि डुअल-बॅंड वाई-फाई 802.11 ac सह येईल. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या माहिती नुसार सॅमसंग Galaxy A90 5G मध्ये 48 MP + 12 MP + 5 MP ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल.

गीकबेंच लिस्टिंग नुसार फोन 6 जीबी रॅम सह सादर केला जाईल. अजून एका रिपोर्टनुसार, या फोनचा 5G वर्जन दक्षिण कोरिया सोबत काही यूरोपियन मार्केट मध्ये पण उपलब्ध केला जाईल. यात 4500 एमएएच ची बॅटरी असू शकते.

हे देखील वाचा: Xiaomi Poco F1 ची किंमत झाली थेट 5,000 रुपयांनी कमी, जाणून घ्या नवीन किंमत

संभावित फीचर्स

आता पर्यंत समोर आलेल्या रिपोर्ट्स नुसार या फोन मध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. सोबतच इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण असू शकतो. तसेच , ट्रिपल रियर कॅमेरा असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा असेल तर दुसरा 12 मेगापिक्सलचा आणि तिसरा 5 मेगापिक्सलचा सेंसर असेल. यात Tilt OIS टेक्नोलॉजी वापरली जाऊ शकते. बोलले जात आहे कि हे ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशनचे वेगळे वर्जन असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here