Oppo A35 स्मार्टफोन 13 MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि Helio P35 सह लॉन्च, जाणून घ्या खासियत

OPPO ने होम मार्केट चीनमध्ये नवीन बजेट स्मार्टफोन OPPO A35 लॉन्च केला आहे. चायनीज स्मार्टफोन कंपनीने हा स्मार्टफोन भारतात यापूर्वी दुसऱ्या नावाने लॉन्च केला आहे. ओप्पोचा हा स्मार्टफोन भारतात गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये Oppo A15s नावाने आला आहे. OPPO A35 स्मार्टफोन चीनमध्ये मीडियाटेक Helio P35 चिपसेट आणि 13 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सादर केला गेला आहे. इथे आम्ही तुम्हाला ओप्पोच्या लेटेस्ट स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबाबत सांगणार आहोत. (Oppo A15s launched in China check specifications feature and price)

OPPO A35 स्पेसिफिकेशन्स

OPPO A35 स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.52 इंचाचा IPS LCD डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे आणि रिजोल्यूशन 720×1600 पिक्सल, आसपेक्ट रेश्यो 20:9 आणि ब्राइटनेस 480 निट्स आहे. तसेच डिस्प्लेमध्ये फ्रंट कॅमेऱ्यासाठी वाटरड्रॉप स्टाइल नॉच देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये परफॉर्मन्ससाठी MediaTek चा Helio P35 चिपसेट देण्यात आला आहे. ओप्पोचा हा स्मार्टफोन 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह मार्केटमध्ये आला आहे. तसेच जास्त स्टोरेजची आवश्यकता असणाऱ्या युजर्ससाठी फोनमध्ये microSD कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Samsung Galaxy M42 5G ची किंमत असेल 25,000 रुपयांपेक्षा कमी, 6,000mAh बॅटरीसह मिळेल 64MP कॅमेरा

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता OPPO A35 स्मार्टफोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्राइमेरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे, तसेच 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि LED फ्लॅश देण्यात आला आहे. ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Samsung Galaxy A32 स्मार्टफोनवर मिळत आहे 3000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, सविस्तर जाणून घ्या ऑफर

OPPO A35 स्मार्टफोन लेटेस्ट Android 11 वर आधारित कंपनीच्या कस्टम युजर इंटरफेस ColorOS 7.2 वर चालतो. बॅटरी पाहता ओप्पोने या स्मार्टफोनमध्ये 4,230mAh ची बॅटरी दिली आहे. या फोनसह बॉक्समध्ये 10W चा चार्जिंग अडॅप्टर पण देण्यात आला आहे. कनेक्टिविटी फीचर्स पाहता ओप्पोने चीनमध्ये लॉन्च केलेल्या या स्मार्टफोनमध्ये डुअल 4G VoLTE, Wi-Fi 802.11 b/g/n, Bluetooth 5.0, GPS, आणि 3.5mm ऑडियो जॅक सह microUSB पोर्ट दिला आहे.

OPPO A35 किंमत

OPPO A35 स्मार्टफोन कंपनीने होम मार्केटमध्ये सादर केला असला तरी अजूनही किंमत सांगितली नाही. ओप्पोचा हा फोन तीन कलर ऑप्शन – आइस झेड व्हाइट, ग्लास ब्लॅक आणि मिस्ट सी ब्लूमध्ये लॉन्च केला गेला आहे. भारतात Oppo A15s च्या 4GB रॅम + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 11,490 रुपये आहे. चीनमध्ये पण या स्मार्टफोनची किंमत 10 ते 12 हजार रुपयांच्या आसपास असू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here