ASUS - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:31:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 ASUS Zenfone 10 लाँच; किंमत आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स वाचा इथे https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-10-launched-know-price-and-specifications-detail-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-10-launched-know-price-and-specifications-detail-in-marathi/#respond Fri, 30 Jun 2023 05:09:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21823 असूसनं ग्लोबल टेक मंचावर आपल्या झेनफोन सीरीजचा विस्तार करत नवीन मोबाइल फोन ASUS Zenfone 10 सादर केला आहे. हा स्मार्टफोन पाश्चिमात्य देशांमध्ये लाँच झाला आहे जो लवकरच भारतीय बाजारात देखील येऊ शकतो. पुढे तुम्ही ह्या नवीन असूस फोनच्या प्राइस, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती वाचू शकता. ASUS Zenfone 10 स्पेसिफिकेशन्स 5.9″ 144Hz AMOLED Display Qualcomm Snapdragon […]

The post ASUS Zenfone 10 लाँच; किंमत आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स वाचा इथे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • ह्यात 16GB RAM मेमरी देण्यात आली आहे.
  • फोन Snapdragon 8 Gen 2 वर चालतो.
  • हा 32MP Selfie Camera ला सपोर्ट करतो.

असूसनं ग्लोबल टेक मंचावर आपल्या झेनफोन सीरीजचा विस्तार करत नवीन मोबाइल फोन ASUS Zenfone 10 सादर केला आहे. हा स्मार्टफोन पाश्चिमात्य देशांमध्ये लाँच झाला आहे जो लवकरच भारतीय बाजारात देखील येऊ शकतो. पुढे तुम्ही ह्या नवीन असूस फोनच्या प्राइस, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती वाचू शकता.

ASUS Zenfone 10 स्पेसिफिकेशन्स

  • 5.9″ 144Hz AMOLED Display
  • Qualcomm Snapdragon 8 Gen 2
  • 16GB RAM + 512GB Storage
  • 32MP Front Camera
  • 50MP Rear Camera
  • 30W 5,000mAh Battery
  • 15W Wireless Charging

  • स्क्रीन : हा असूस फोन 5.9 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेसह लाँच झाला आहे जो अ‍ॅमोलेड पॅनलवर बनला आहे तसेच 144हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्क्रीनला गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा देण्यात आली आहे जोडीला 1100निट्स ब्राइटनेस आणि एचडीआरचा सपोर्ट मिळतो.
  • प्रोसेसेर : असूस झेनफोन 10 अँड्रॉइड 13 आधारित असूस झेनयुआयवर लाँच करण्यात आला आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 ऑक्टाकोर चिपसेट आहे. ग्राफिक्ससाठी हा मोबाइल एड्रेनो 740 जीपीयूला सपोर्ट करतो.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर एफ/1.9 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा ओआयएस सेन्सर देण्यात आला आहे जो 13 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह येतो. फ्रंट पॅनलवर 32 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी ASUS Zenfone 10 मध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. ही वेगानं चार्ज करण्यासाठी फोन 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात आला आहे. तसेच हा मोबाइल 15वॉट वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.
  • इतर फीचर्स : ह्यात 3.5mm जॅक, ड्युअल स्टीरियो स्पिकर, IP68, NavIC, NFC, Bluetooth v5.3 आणि OZO ऑडियो नॉइज रिडक्शन टेक्नॉलॉजी सारखे फीचर्स आहेत.

ASUS Zenfone 10 ची किंमत

फोन तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. ह्याच्या 8जीबी रॅम+128जीबी स्टोरेजची किंमत EUR 799 (जवळपास 71,300 रुपये) आहे. 8जीबी रॅम+256जीबी स्टोरेजची किंमत EUR 849 (जवळपास 75,750 रुपये) आहे तर सर्वात मोठ्या 16जीबी रॅम+512जीबी मेमरी व्हेरिएंटची किंमत EUR 929 (जवळपास 82,900 रुपये) आहे. फोन Midnight Black, Comet White, Eclipse Red, Aurora Green आणि Starry Blue कलरमध्ये सादर केला गेला आहे.

The post ASUS Zenfone 10 लाँच; किंमत आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स वाचा इथे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-10-launched-know-price-and-specifications-detail-in-marathi/feed/ 0
ASUS ROG Phone 7 भारतात लाँच, जाणून घ्या गेमिंग फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-7-gaming-phone-launched-in-india-know-price-features-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-7-gaming-phone-launched-in-india-know-price-features-and-specifications/#respond Thu, 13 Apr 2023 13:17:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20264 ASUS नं आपल्या गेमिंग फोनच्या लाइनअपमध्ये नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन ROG Phone 7 आणि ROG Phone 7 Ultimate भारतात लाँच केले आहेत. दोन्ही फोन्सचे स्पेसिफिकेशन्स जवळपास सारखेच आहेत. फक्त अल्टिमेट मॉडेलमध्ये जास्त रॅम, जास्त स्टोरेज, कुलिंगसाठी AeroActive Portal आणि फोनच्या मागे इनकमिंग कॉस इत्यादी माहिती दाखवण्यासाठी PMOLED डिस्प्ले मिळतो. ROG म्हणजे Republic of Gamers हा एक […]

The post ASUS ROG Phone 7 भारतात लाँच, जाणून घ्या गेमिंग फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • ASUS ROG Phone 7 अ‍ॅडव्हान्स गेमिंग फोन भारतात लाँच झाला आहे.
  • या गेमिंग फोनमध्ये AirTrigger system मिळते.
  • असूस आरओजी फोन 7 चे दोन मॉडेल भारतात लाँच झाले आहेत.

ASUS नं आपल्या गेमिंग फोनच्या लाइनअपमध्ये नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन ROG Phone 7 आणि ROG Phone 7 Ultimate भारतात लाँच केले आहेत. दोन्ही फोन्सचे स्पेसिफिकेशन्स जवळपास सारखेच आहेत. फक्त अल्टिमेट मॉडेलमध्ये जास्त रॅम, जास्त स्टोरेज, कुलिंगसाठी AeroActive Portal आणि फोनच्या मागे इनकमिंग कॉस इत्यादी माहिती दाखवण्यासाठी PMOLED डिस्प्ले मिळतो. ROG म्हणजे Republic of Gamers हा एक गेमिंग ब्रँड आहे जो गेमिंग लॅपटॉपसह गेमिंग मोबाइल देखील लाँच करतो. त्यामुळे यात गेमिंगसाठी आवश्यक फीचर्ससह शक्तिशाली स्पेसिफिकेशन्स दिले जातात. नवीन आरओजी फोन 7 आणि आरओजी फोन 7 अल्टिमेटमध्ये देखील असेच स्पेक्स आहेत ज्यांची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

असूस आरओजी फोन 7 आणि आरओजी फोन 7 अल्टिमेट मधील गेमिंग फिचर

  • GameCool 7 cooling system
  • AeroActive Cooler 7
  • GameFX Audio
  • AirTrigger system

या फोनमध्ये नवीन ROG Rapid-Cycle Vapor Chamber डिजाईनचा वापर करण्यात आला जी लिक्विड रिर्टन चॅनेल्सच्या माध्यमातून व्हेपर चेंबर कूलिंगच्या तुलनेत 2.1 गुणा जास्त हिट कमी करते. तसेच यातील एअर ट्रिगर अतिरिक्त गेमिंग बटन्स म्हणून कामी येतात.

असूस आरओजी फोन 7 आणि आरओजी फोन 7 अल्टिमेट चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

  • 6.78” AMOLED
  • 165Hz Refesh Rate
  • in-display fingerprint sensor

ROG Phone 7 5G फोन 20.4:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर बनला आहे ज्यात 2448 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.78 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 165हर्ट्ज रिफ्रेश रेट व 720हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळतो.

ही स्क्रीन 1000निट्स ब्राइटनेस आणि 1,000,000:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला देखील सपोर्ट करते, त्याचबरोबर आय केयर टेक्नॉलॉजी देखील मिळते. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी यात 2.5डी कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा मिळते. घामाने माखलेल्या हातांपासून वाचाण्यासाठी विशेष कोटिंग करण्यात आली आहे.

प्रोसेसर

  • Android 13
  • Qualcomm Adreno 740
  • Qualcomm Snapdragon 8 Gen 2

ASUS ROG Phone 7 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो जो 3.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी यात एड्रेनो 740 जीपीयू देण्यात आला आहे. हा आरओजी फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे ज्यात झेन युआय आणि आरओजी युआय दोन्ही मिळतात. असूसचा हा फोन 2 वर्षांच्या अँड्रॉइड अपडेट तसेच 4 वर्षांच्या सिक्योरिटी अपडेटसह येतो. फोनमध्ये LPDDR5X RAM आणि UFS4.0 Storage मिळते.

कॅमेरा

  • 50MP Rear Camera
  • 32MP Front Camera

फोटोग्राफीसाठी असूस आरओजी फोन 7 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स766 सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला रियर कॅमेरा सेटअपमध्ये 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 8 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देखील आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ASUS ROG Phone 7 32 मेगापिक्सलच्या सेन्सरसह येतो जी एक ओमनी व्हिजन ओवी32 क्वॉड लेन्स आहे.

बॅटरी

  • 6,000mAh Battery
  • 65W Fast Charging

पावर बॅकअपसाठी या असूस फोनमध्ये ड्युअल बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ज्यात 3,000एमएएचचे दोन बॅटरी सेल आहेत जे एकत्र 6,000एमएएचची पावर देतात. मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी आरओजी फोन 7 मध्ये 65वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील देण्यात आली आहे. विशेष म्हणजे फोन बॉक्समध्ये कंपनी 30वॉट पवार अडॅप्टर देईल.

आसूस आरओजी फोन 7 आणि आरओजी फोन 7 अल्टिमेट ची किंमत

  • ASUS ROG Phone 7 (12GB RAM, 256GB) = 74,999 रुपये
  • ASUS ROG Phone 7 Ultimate (16GB RAM, 512GB) = 99,999 रुपये

ASUS ROG Phone 7 मध्ये 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असून याची किंमत 74,999 रुपये आहे. तर ASUS ROG Phone 7 Ultimate मध्ये 16GB RAM आणि 512GB स्टोरेज मिळते ज्यासाठी 99,999 रुपये मोजावे लागतील. ही सीरिज मे महिन्यात विक्रीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन उपलब्ध होईल. कंपनीनं नेमकी तारीख मात्र अजून सांगितली नाही.

The post ASUS ROG Phone 7 भारतात लाँच, जाणून घ्या गेमिंग फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-7-gaming-phone-launched-in-india-know-price-features-and-specifications/feed/ 0
13 एप्रिलला भारतात लाँच होईल पावरफुल गेमिंग फोन Asus ROG Phone 7 https://www.91mobiles.com/marathi/13-april-asus-rog-phone-7-launch-date-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/13-april-asus-rog-phone-7-launch-date-in-india/#respond Fri, 24 Mar 2023 10:31:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19738 गेमिंग फोनचा विषय निघताच असूसच्या आरओजी सीरीजचं नाव सर्वप्रथम येतं. कंपनी आपल्या या सीरीजचा लेटेस्ट स्मार्टफोन Asus ROG Phone 7 भारतात आणणार आहे. आरओजी फोन 7 13 एप्रिलला भारतात लाँच होईल. ROG म्हणजे Republic of Gamers, नावावरून समजतं की हा स्मार्टफोन गेमिंगसाठी किती खास असेल. कंपनीनं या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स मात्र सांगितले नाहीत परंतु लीक्समधून बरीच […]

The post 13 एप्रिलला भारतात लाँच होईल पावरफुल गेमिंग फोन Asus ROG Phone 7 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेमिंग फोनचा विषय निघताच असूसच्या आरओजी सीरीजचं नाव सर्वप्रथम येतं. कंपनी आपल्या या सीरीजचा लेटेस्ट स्मार्टफोन Asus ROG Phone 7 भारतात आणणार आहे. आरओजी फोन 7 13 एप्रिलला भारतात लाँच होईल. ROG म्हणजे Republic of Gamers, नावावरून समजतं की हा स्मार्टफोन गेमिंगसाठी किती खास असेल. कंपनीनं या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स मात्र सांगितले नाहीत परंतु लीक्समधून बरीच माहिती समोर आली आहे जी तुम्ही पुढे वाचू शकता.

असूस आरओजी फोन 7 च्या लाँचची माहिती

असूस इंडियानं ऑफिशियल घोषणा करून सांगितलं आहे की कंपनीचा आगामी गेमिंग मोबाइल फोन Asus ROG Phone 7 13 एप्रिलला भारतात लाँच केला जाईल. या दिवशी संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी फोन जगासमोर ठेवला जाईल आणि याचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व प्राइसची माहिती दिली जाईल. 13 एप्रिलला आरओजी फोन 7 ग्लोबली लाँच होईल अशी अपेक्षा आहे जो भारतासह ताईपे, बर्लिन आणि न्यूयार्कमध्ये देखील एंट्री करू शकतो. हे देखील वाचा: 28,999 रुपयांमध्ये येऊ शकतो 6GB RAM असलेला Samsung Galaxy A34 5G फोन, आमच्या हाती लागली माहिती

असूस आरओजी फोन 7 चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • Qualcomm Snapdragon 8 Gen 2
  • 6.8″ FHD+ 165Hz AMOLED Display
  • 16GB LPDDR5X RAM
  • 65W fast charging
  • 65W 6,000mAh Battery

Asus ROG Phone 7 संबंधित लीक्स व रिपोर्ट्सनुसार हा मोबाइल फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. हा आतापर्यंतच्या सर्वात पावरफुल मोबाइल प्रोसेसर पैकी एक आहे जो 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनला आहे. असूस आपला नवीन फोन 16जीबी रॅमसह मार्केटमध्ये सादर करू शकते जो LPDDR5X RAM आणि UFS 4.0 storage टेक्नॉलॉजीवर काम करू शकतो.

हा आरओजी फोन लेटेस्ट अँड्रॉइड 13 ओएससह मार्केटमध्ये येऊ शकतो. तसेच ग्राफिक्ससाठी यात एड्रेनो 740 जीपीयू मिळू शकतो जो गेमिंग दरम्यान स्मूद व वायब्रेंट मोशन देऊ शकतो. पावर बॅकअप पाहता समोर आलेल्या रिपोर्ट्स नुसार या मोबाइल फोनमध्ये 6,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच फोनमध्ये 65वॉट फास्ट चार्जिंग मिळू शकते. हे देखील वाचा: 6,000mAh च्या राक्षसी बॅटरीसह Samsung Galaxy F14 5G ची एंट्री; किंमत 12,990 रुपये

Asus ROG Phone 7 बद्दल सांगण्यात आलं आहे की हा मोबाइल फुलएचडी+ रिजोल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. या फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनू शकते जी जो 165हर्ट्जच्या हाय रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकते. हा रिफ्रेश रेट हाय ग्राफिक्स रेसिंग गेमला शानदार व्हिज्युअल क्वॉलिटी देऊ शकतो.

The post 13 एप्रिलला भारतात लाँच होईल पावरफुल गेमिंग फोन Asus ROG Phone 7 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/13-april-asus-rog-phone-7-launch-date-in-india/feed/ 0
चिनी कंपन्यांना झटका देण्यासाठी Asus 9z भारतात या दिवशी होऊ शकतो लाँच; जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/asus-9z-launch-date-and-price-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/asus-9z-launch-date-and-price-in-india/#respond Mon, 22 Aug 2022 11:44:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12370 आसुसनं गेल्या महिन्यात Asus Zenfone 9 स्मार्टफोन काही निवडक बाजारपेठांमध्ये लाँच केला होता. हा कॉम्पेक्ट साइज स्मार्टफोन आता भारतात देखील एंट्री करू शकतो. आसुसचा हा स्मार्टफोन फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन्ससह सादर करण्यात आला आहे. ज्यात क्वॉलकॉमची लेटेस्ट Snapdragon 8+ Gen 1 Soc, गिम्बल माउंट प्रायमरी कॅमेरा आणि दमदार बॅटरीचा समावेश आहे. आसुसचा फ्लॅगशिप Zenfone 9 स्मार्टफोन भारतात […]

The post चिनी कंपन्यांना झटका देण्यासाठी Asus 9z भारतात या दिवशी होऊ शकतो लाँच; जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आसुसनं गेल्या महिन्यात Asus Zenfone 9 स्मार्टफोन काही निवडक बाजारपेठांमध्ये लाँच केला होता. हा कॉम्पेक्ट साइज स्मार्टफोन आता भारतात देखील एंट्री करू शकतो. आसुसचा हा स्मार्टफोन फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन्ससह सादर करण्यात आला आहे. ज्यात क्वॉलकॉमची लेटेस्ट Snapdragon 8+ Gen 1 Soc, गिम्बल माउंट प्रायमरी कॅमेरा आणि दमदार बॅटरीचा समावेश आहे. आसुसचा फ्लॅगशिप Zenfone 9 स्मार्टफोन भारतात या आठवड्यात नव्या नावानं लाँच होऊ शकतो. चला जाणून घेऊया आसुसच्या आगामी स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स.

युट्युबर साहिल करौलनुसार, Asus Zenfone 9 स्मार्टफोन भारतात 23 ऑगस्टला लाँच केला जाऊ शकतो. आसुसचा हा फोन भारतात Asus 9z नावानं दाखल होईल. साहिलच्या या दाव्यावर विश्वास ठेवणं काठी आहे कारण आसुस इंडियानं अजूनतरी एकही टिजर शेयर केला नाही. या स्मार्टफोनची गुपचूप एंट्री होण्याची शक्यता देखील कमी आहे. परंतु भारतात एंट्री झाल्यावर या स्मार्टफोनची थेट टक्कर वनप्लस, सॅमसंग, शाओमी, विवोच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सशी होईल.

Asus Zenfone 9 Price in India

ASUS Zenfone 9 स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट युरोपियन बाजारात आले आहेत. या फोनचा बेस व्हेरिएंट 8GB + 128GB सह 799 यूरो (सुमारे 64,700 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन मिडनाइट ब्लॅक, स्टारी ब्लू, सनसेट रेड आणि मूनलाईट व्हाईट कलर ऑप्शनमध्ये लाँच झाला आहे. परंतु भारतात या फोनची किंमत थोडी कमी असू शकते. Asus 9z स्मार्टफोन भारतात 60,000 रुपयांपर्यंतच्या किंमतीत सादर केला जाऊ शकतो.

ASUS Zenfone 9 चे स्पेसिफिकेशन्स

ASUS Zenfone 9 स्मार्टफोनमध्ये 5.9-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनच्या डिस्प्लेचं रिजोल्यूशन Full HD+ 2400 x 1080 पिक्सल आणि अस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे. कंपनीनं फ्रंटला Gorilla Glass Victus ची सुरक्षा दिली आहे. आसुसचा हा फोन क्वॉलकॉमच्या लेटेस्ट आणि पावरफुल Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह येतो. हा फोन 16GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतच्या स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे.

आसुसच्या लेटेस्ट Zenfone 9 स्मार्टफोनमध्ये 4,300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. या अँड्रॉइड 12 फोनमध्ये 3.5mm जॅक देखील आहे. फोनचे अन्य फिचर्स पाहता हा IP68 डस्ट आणि वॉटर रेजिस्टंट, साईड माउंटेड टच सेन्सेटिव्ह फिंगरप्रिंट स्कॅनर, ड्युअल स्पिकर, व्हेपर चेंबर, 8K व्हिडीओ रेकॉर्डिंग, WiFi 6/6E, Bluetooth 5.2, आणि NFC सपोर्ट देण्यात आला आहे.

Asus Zenfone 9 स्मार्टफोनमध्ये मोठा ड्युअल कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे, ज्यात 6-अ‍ॅक्सिस गिम्बल स्टॅबिलायजेशन सपोर्ट मिळतो, ज्यामुळे फोटो किंवा व्हिडीओ घेताना हात हलल्यास दृश्य हलत नाही. फोनचा प्रायमरी कॅमेरा Sony IMX766 आहे जो OIS सपोर्टसह येणारा 50MP सेन्सर आहे. तसेच फोनमध्ये 12MP अल्ट्रा-वाईड कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.

The post चिनी कंपन्यांना झटका देण्यासाठी Asus 9z भारतात या दिवशी होऊ शकतो लाँच; जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-9z-launch-date-and-price-in-india/feed/ 0
छोटा पॅकेट बडा धमाका! 16GB रॅमसह दणकट ASUS Zenfone 9 लाँच; वनप्लस-शाओमीच्या अडचणी वाढल्या https://www.91mobiles.com/marathi/16gb-ram-50mp-camera-30w-fast-charge-phone-asus-zenfone-9-launched/ https://www.91mobiles.com/marathi/16gb-ram-50mp-camera-30w-fast-charge-phone-asus-zenfone-9-launched/#respond Fri, 29 Jul 2022 07:29:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11827 Asus Zenfone 9 कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप फोन आहे जो क्वॉलकॉमच्या सर्वात दमदार Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे.

The post छोटा पॅकेट बडा धमाका! 16GB रॅमसह दणकट ASUS Zenfone 9 लाँच; वनप्लस-शाओमीच्या अडचणी वाढल्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ASUS नं आपला नवीन कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन Zenfone 9 लाँच केला आहे. यात क्वॉलकॉमचा लेटेस्ट आणि पावरफुल Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर मिळतो. हा फोन ASUS Zenfone 8 चा उत्तराधिकारी आहे, जो कंपनीनं 6-इंचापेक्षा छोट्या डिस्प्लेसह सादर केला होता. ASUS Zenfone 8 च्या तुलनेत Zenfone 9 मध्ये मोठी बॅटरी, फ्लॅट साईड, स्लीमर बेजल आणि सुधारित कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा डिजाईन देखील बदलण्यात आली आहे. हा फोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच झाला आहे. भारतात हा फोन ASUS 9Z नावानं सादर केला जाऊ शकतो. चला जाणून घेऊया आकाराने छोट्या असलेल्या ASUS Zenfone 9 ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.

ASUS Zenfone 9 चे स्पेसिफिकेशन्स

ASUS Zenfone 9 स्मार्टफोनमध्ये 5.9-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनच्या डिस्प्लेचं रिजोल्यूशन Full HD+ 2400 x 1080 पिक्सल आणि अस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे. कंपनीनं फ्रंटला Gorilla Glass Victus ची सुरक्षा दिली आहे. आसुसचा हा फोन क्वॉलकॉमच्या लेटेस्ट आणि पावरफुल Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह येतो. हा फोन 16GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतच्या स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. हे देखील वाचा: विराट कोहलीच्या हातात दिसला आगामी Vivo V25 Pro; शक्तिशाली Dimensity 1300 प्रोसेसरसह होणार एंट्री

Asus Zenfone 9 स्मार्टफोनमध्ये मोठा ड्युअल कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे, ज्यात 6-अ‍ॅक्सिस गिम्बल स्टॅबिलायजेशन सपोर्ट मिळतो, ज्यामुळे फोटो किंवा व्हिडीओ घेताना हात हलल्यास दृश्य हलत नाही. फोनचा प्रायमरी कॅमेरा Sony IMX766 आहे जो OIS सपोर्टसह येणारा 50MP सेन्सर आहे. तसेच फोनमध्ये 12MP अल्ट्रा-वाईड कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. हे देखील वाचा: 10 हजारांच्या आत स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन; 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेऱ्यासह दमदार मोबाईलची एंट्री

आसुसच्या लेटेस्ट Zenfone 9 स्मार्टफोनमध्ये 4,300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. या अँड्रॉइड 12 फोनमध्ये 3.5mm जॅक देखील आहे. फोनचे अन्य फिचर्स पाहता हा IP68 डस्ट आणि वॉटर रेजिस्टंट, साईड माउंटेड टच सेन्सेटिव्ह फिंगरप्रिंट स्कॅनर, ड्युअल स्पिकर, व्हेपर चेंबर, 8K व्हिडीओ रेकॉर्डिंग, WiFi 6/6E, Bluetooth 5.2, आणि NFC सपोर्ट देण्यात आला आहे.

ASUS Zenfone 9 ची किंमत

ASUS Zenfone 9 स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट युरोपियन बाजारात आले आहेत. या फोनचा बेस व्हेरिएंट 8GB + 128GB सह 799 यूरो (सुमारे 64,700 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. तसेच हा फोन 256GB स्टोरेजसह 8GB रॅम आणि 16GB रॅम ऑप्शनमध्ये देखील लाँच करण्यात आला आहे, ज्यांची किंमत अनुक्रमे 849 यूरो (सुमारे 68,700 रुपये) आणि 899 यूरो (सुमारे 72,700 रुपये) आहे. हा फोन मिडनाइट ब्लॅक, स्टारी ब्लू, सनसेट रेड आणि मूनलाईट व्हाईट कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल.

The post छोटा पॅकेट बडा धमाका! 16GB रॅमसह दणकट ASUS Zenfone 9 लाँच; वनप्लस-शाओमीच्या अडचणी वाढल्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/16gb-ram-50mp-camera-30w-fast-charge-phone-asus-zenfone-9-launched/feed/ 0
Snapdragon 888 सह येणाऱ्या बेस्ट फोनची संपूर्ण यादी, बघा कोणता आहे तुमच्या योग्य https://www.91mobiles.com/marathi/best-snapdragon-888-phones-full-list/ https://www.91mobiles.com/marathi/best-snapdragon-888-phones-full-list/#respond Tue, 18 May 2021 13:40:12 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10959 तुम्ही पण एक नवीन पावरफुल प्रोसेसर असलेला फोन विकत घेण्याचा प्लान करत असाल तर तुम्ही सध्या भारतीय बाजारात उपलब्ध असलेले हे फोन बघू शकता.

The post Snapdragon 888 सह येणाऱ्या बेस्ट फोनची संपूर्ण यादी, बघा कोणता आहे तुमच्या योग्य first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने गेल्यावर्षीच्या शेवटच्या महिन्यात जगातील पहिला Snapdragon 888 फोन लॉन्च करून आपले नाव सर्व कंपन्यांच्या वर नेले होते. आता Snapdragon 888 SoC वर काम करणारे स्मार्टफोन भारतीय बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. स्नॅपड्रॅगॉन 888 बद्दल बोलायचे तर हा क्वालकॉमचा लेटेस्ट चिपसेट आहे जो ग्राफिक कॅपेबिलिटीज, फोटोग्राफी, मशीन लर्निंगसह येतो. त्यामुळे हा सध्याचा सर्वात पावरफुल प्रोसेसर असल्याचे बोलले जात आहे. जर तुम्ही पण एक नवीन पावरफुल प्रोसेसर असलेला फोन विकत घेण्याचा प्लान करत असाल तर तुम्ही सध्या भारतीय बाजारात उपलब्ध असलेले हे फोन बघू शकता. पुढे आम्ही तुम्हाला या फोनबाबत संपूर्ण माहिती देत आहोत. (Best Snapdragon 888 phones full list)

iQOO 7 Legend

iQOO 7 Legend हा Qualcomm च्या फ्लॅगशिप Snapdragon 888 प्रोसेसरसह येणारा भारतीय बाजारात लॉन्च झाला सर्वात लेटेस्ट स्मार्टफोन आहे. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये Adreno 660 GPU आहे. तसेच फोन 12GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256GB पर्यंतच्या UFS 3.1 स्टोरेजने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात OIS सपोर्ट असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 13 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेंस आणि 13 मेगापिक्सलची पोट्रेट लेंस मिळते. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी आयक्यू 7 लेजेंडमध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

iQOO 7 Legend

यात 6.62 इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 20:9 आस्पेक्ट रेशियो आणि 91.4 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियोसह येतो. डिस्प्ले पॅनलचा रिफ्रेश रेट 120Hz आहे 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 4,400mAh ची बॅटरी आहे. तसेच फोनची आरंभिक किंमत 39,990 रुपये आहे.

Mi 11X Ultra

या फोनची आरंभिक किंमत 69,990 रुपये आहे. मी 11 अल्ट्रा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 प्रोसेसरसह येतो, जो Adreno 660 जीपीयू, 12GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256 UFS 3.1 स्टोरेजने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी मी 11 अल्ट्रा फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, जो आयतकार कॅमेरा मॉड्यूलमध्ये आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर दोन 48 मेगापिक्सलचे अल्ट्रा-वाइड-अँगल आणि फिल्ड-ऑफ-व्यू कॅमेरा सेंसर्सचा समावेश करण्यात आला आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेला Realme Narzo 30 झाला लॉन्च, Redmi फोन्सला मिळेल आव्हान

mi 11 ultra photo

फोन Android 11 वर चालतो आणि यात 6.81-इंचाचा 2K WQHD+ (3,200× 1,440 पिक्सल) ई4 एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, 551पीपीआई पिक्सल डेंसिटी आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह येतो. फोनमध्ये HDR10+ आणि Dolby Vision सह DisplayMate ची A+ रेटिंग देण्यात आली आहे. फोनमध्ये 1.1 इंचाचा (126×294 पिक्सल) अजून एक एमोलेड सेकंडरी टच डिस्प्ले देण्यात आला आहे. यात पावर बॅकअपसाठी 5,000 एमएएचची बॅटरी आहे.

ASUS ROG Phone 5 Series

अँड्रॉइड 11 आधारित या फोनमध्ये 2.84गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालणारा 64बिट आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 5जी चिपसेट देण्यात आला आहेै. या सीरीजची आरंभिक किंमत 49,999 रुपये आहे. हि सीरीज 20.4:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केली गेली आहे जी 2448 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करते. जसे कि सर्वांना माहित असेल कि हि सीरीज खास गेमिंगसाठी बनवण्यात आली आहे त्यामुळे आरओजी 5 आणि आरओजी 5 प्रो ची स्क्रीन 144हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 300हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. फोनचा डिस्प्ले 2.5डी कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्टेड आहे.

ROGPHONE 5

फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा SONY IMX686 सेंसर देण्यात आला आहे. सोबत एफ/2.4 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.0 अपर्चर असलेली 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.45 अपर्चर असलेल्या 24 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा फोन डुअल बॅटरीला सपोर्ट करतो ज्याची पावर 3,000एमएएच आहे. या हिशोबाने फोनमध्ये एकूण 6,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. मोठ्या बॅटरी सोबतच हा स्मार्टफोन 65वॉट हायपर फास्ट चार्जिंगला पण सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेला Realme Narzo 30 झाला लॉन्च, Redmi फोन्सला मिळेल आव्हान

OnePlus 9 Series

वनप्लसने काही दिवसांपूर्वी OnePlus 9 सीरीजमध्ये OnePlus 9R, OnePlus 9, आणि OnePlus 9 Pro सादर केले होते. याअतिरिक्त, फ्लॅगशिप वनप्लस 9 आणि वनप्लस 9 प्रो दोन्हीमध्ये स्नॅपड्रॅगॉन 888 SoC, 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट, हॅसलब्लेड कॅमेरा आणि 4,500mAh ची बॅटरी आहे. तसेच वनप्लस 9 मध्ये आईपी रेटिंग पण आहे. OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro ची आरंभिक किंमत क्रमश: 49,999 रुपये आणि 69,999 रुपये आहे.

OnePlus 9 Series

वनप्लस 9 मध्ये FHD + रिजॉल्यूशनसह 6.55-इंचाचा डिस्प्ले आहे. OnePlus 9 Pro एका मोठ्या 6.67-इंच LTPO डिस्प्लेला सपोर्ट करतो जी QHD + रिजॉल्यूशनसह येते. OnePlus 9 मध्ये मागे 48MP + 50MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि OnePlus 9 Pro मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 48MP + 50MP + 8MP + 2MP कॅमेरा सेंसर आहेत.

Vivo X60 Pro+

Vivo X60 Pro Plus अँड्रॉइड ओएस अँड्रॉइड 11 वर सादर केला होता जो फनटच ओएस 11.1 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये ऑक्टा-कोर (एक 2.842गीगाहर्ट्ज + तीन 2.419गीगाहर्ट्ज + चार 1.805गीगाहर्ट्ज ) प्रोसेसरसह 5 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉमचा पावरफुल स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 660 जीपीयूला सपोर्ट करतो. Vivo X60 Pro+ भारतात 69,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. वीवो एक्स60 प्रो प्लस कंपनीने 2376 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर बनवण्यात आला आहे.

हे देखील वाचा : अश्याप्रकारे करा BATTLEGROUNDS MOBILE INDIA मोबाईल गेम, भारतात रजिस्ट्रेशन झाले सुरु

Vivo X60 Pro Plus

फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाईटसह एफ/1.57 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा GN1 सेंसर देण्यात आला आहे जो vivo OIS टेक्नॉलॉजीसह चालतो. तसेच हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 48 मेगापिक्सलच्या Sony IMX598 सेकंडरी सेंसरला सपोर्ट करतो जो गिंबल स्टेबलाइजेशन टेक्नॉलॉजीसह येतो. Vivo X60 Pro+ च्या रियर पॅनलवर एफ/2.08 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/3.4 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची सुपर मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.45 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Mi 11X Pro

Mi 11X Pro स्मार्टफोन कंपनीने फ्लॅगशिप Snapdragon 888 चिपसेट, X60 मॉडेम आणि Adreno 660 ग्राफिक्ससह सादर केला गेला होता. या फोनमध्ये 8GB रॅमसह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. फोन Android 11 वर आधारित MIUI 12 वर चालतो. फोनमध्ये 4520mAh ची बॅटरी मिळते. तसेच फोनची किंमत 41,999 रुपये आहे. Mi 11X Pro स्मार्टफोनमध्ये 108 मेगापिक्सलचा प्राइमेरी कॅमेरा देण्यात आला आहे, जो Samsung HM2 सेंसर आहे. या कॅमेरा सेंसरसह बॅक पॅनलमध्ये 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे.

Xiaomi Mi 11X

सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये 20 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. Mi 11X Pro मध्ये 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन FHD+ 2400×1080 पिक्सल, रिफ्रेश रेट 120Hz, टच सॅम्पलिंग रेट 360Hz आहे. डिस्प्लेबद्दल शाओमीचे म्हणते कि हा मॅक्सिमम ब्राइटनेस 1300 निट्स आणि HDR10+ सपोर्टसह येतो.

The post Snapdragon 888 सह येणाऱ्या बेस्ट फोनची संपूर्ण यादी, बघा कोणता आहे तुमच्या योग्य first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-snapdragon-888-phones-full-list/feed/ 0
ASUS ZenFone 8 सीरीजचा भारतातील लॉन्च कंफर्म, कोरोनामुळे भारतात उशिरा होतील लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-8-series-india-launch-delay-check-details/ https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-8-series-india-launch-delay-check-details/#respond Mon, 10 May 2021 14:53:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10876 ASUS ZenFone 8 स्मार्टफोनबाबत बोलले जात आहे कि यात 5.9-इंचाचा FHD+ डिस्प्ले दिली जाऊ शकते.

The post ASUS ZenFone 8 सीरीजचा भारतातील लॉन्च कंफर्म, कोरोनामुळे भारतात उशिरा होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ASUS ZenFone 8 सीरीजचे स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये 12 मेला लॉन्च होणार आहेत. या सीरीज अंतगर्त कंपनी कॉम्पॅक्ट साइजमध्ये ZenFone 8 आणि फ्लिप कॅमेरा मॉड्यूलसह ZenFone 8 Flip स्मार्टफोन लॉन्च करेल. आसुसच्या अपकमिंग ZenFone 8 सीरीजबद्दल बोलले जात होते कि हे लवकरच भारतात लॉन्च होतील. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आसुसचे हे स्मार्टफोन भारतात काही दिवसांनंतर लॉन्च केले जातील. आसुस इंडियाचे बिजनेस हेड दिनेश शर्मा यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे कि कोरोना वायरसची दुसरी लाट पाहता ASUS ZenFone 8 सीरीज भारतात थोडीशी उशिरा लॉन्च केली जाईल. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये कंपनी या सीरीजचे स्मार्टफोन्स कधी लॉन्च करेल, हे मात्र सांगितले नाही. आसुसचे हे स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये 12 मेला येतील. (Asus Zenfone 8 series India launch delay check details)

दिनेश शर्मा यांनी आपल्या विधानात म्हटले आहे कि आमच्या नवीन स्मार्टफोनच्या लॉन्चसाठी जग उत्साहित असताना आम्ही भारतात सध्य परिस्थिती सुधरेपर्यंत या स्मार्टफोनचा लॉन्च स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही कोरोनाने प्रभावित लोकांसाठी प्रार्थना करत आहोत. घरी रहा सुरक्षित रहा.

हे देखील वाचा : वारंवार रिचार्जचा त्रास कमी करतील Jio चे हे प्लान, खर्च करावे लागतील 120 रुपयांपेक्षा कमी आणि मिळेल 740GB पर्यंतचा डेटा

asus zenfone 8 mini  चा फोटो

स्पेसिफिकेशन्स

ASUS ZenFone 8 स्मार्टफोनबाबत बोलले जात आहे कि यात 5.9-इंचाचा FHD+ डिस्प्ले दिली जाऊ शकते. हा डिस्प्ले Samsung चा E4 AMOLED डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे आणि हा Gorilla Glass Victus च्या प्रोटेक्शनसह येतो. या डिस्प्लेमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. आसुसच्या या फोनमध्ये Snapdragon 888 5G चिपसेट देण्यात आला आहे ज्यात ग्राफिक्ससाठी Adreno 660 GPU दिला जाऊ शकतो. तसेच हा फोन 16GB पर्यंत रॅम आणि 256GB UFS 3.1 स्टोरेजसह सादर केला जाऊ शकतो. आसुसचा हा आगामी फोन Android 11 वर आधारित ZenUI 8 वर चालेल.

हे देखील वाचा : Realme Narzo 30 च्या लॉन्चपूर्वी समोर आला व्हिडीओ आणि स्पेसिफिकेशन्स, जाणून घ्या वैशिष्टये

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता ZenFone 8 स्मार्टफोनमध्ये 64MP Sony IMX686 प्राइमेरी कॅमेऱ्यासह 12 मेगापिक्सलचा वाइड अँगल आणि मॅक्रो कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो. या फोनच्या फ्रंटला 12 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, डुअल स्पीकर, लाइनर वाइब्रेशन मोटर, 5G सपोर्ट, ब्लूटूथ 5.2, FM रेडियो, 3.5mm ऑडियो जॅक आणि 3-माइक्रोफोन सिस्टम दिली जाऊ शकते. आसुसच्या या फोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी आणि 30W फास्ट-चार्जला सपोर्ट दिली जाऊ शकते.

ASUS ZenFone 8 Flip स्पेसिफिकेशन्स

ASUS ZenFone 8 Flip स्मार्टफोन पाहता यात 6.67-इंच FHD+ AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. याचा रिफ्रेश रेट 90Hz असेल. आसुसच्या या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 चिपसेट दिला जाऊ शकतो, जो 8GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेजसह सादर केला जाऊ शकतो. या फोनमध्ये मोटराइज्ड कॅमेरा मॉड्यूल दिला जाऊ शकतो ज्यात 64MP चा प्राइमेरी कॅमेऱ्यासह 8MP ची टेलीफोटो लेंस आणि 12MP चा मॅक्रो कॅमेरा दिला जाऊ शकतो.

The post ASUS ZenFone 8 सीरीजचा भारतातील लॉन्च कंफर्म, कोरोनामुळे भारतात उशिरा होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-8-series-india-launch-delay-check-details/feed/ 0
ASUS Adolpad 10 Pro टॅबलेट चीनमध्ये झाला लॉन्च, MediaTek प्रोसेसर आणि 7300mAh बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/asus-adolpad-10-pro-launched-check-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/asus-adolpad-10-pro-launched-check-price-and-specifications/#respond Fri, 30 Apr 2021 12:52:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10779 ASUS Adolpad 10 Pro टॅबलेटमध्ये कंपनीने 10.1 इंचाचा Full HD+ IPS डिस्प्ले दिला आहे. MediaTek 8183 चिपसेट साल 2019 मध्ये सादर केला होता.

The post ASUS Adolpad 10 Pro टॅबलेट चीनमध्ये झाला लॉन्च, MediaTek प्रोसेसर आणि 7300mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ASUS ने होम मार्केट चीनमध्ये नवीन अँड्रॉइड टॅबलेट ASUS Adolpad 10 Pro सादर केला आहे. या टॅबमध्ये कंपनीने 10.1 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. तसेच मीडियाटेकच्या ऑक्टा कोर प्रोसेसरसह लॉन्च करण्यात आलेल्या या टॅबमध्ये 4GB रॅम देण्यात आला आहे. तसेच आसुसच्या या टॅबमध्ये 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे, तर सेल्फीसाठी यात 5 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. ASUS Adolpad 10 Pro टॅबलेटमध्ये कंपनीने दमदार 7,300mAh ची बॅटरी दिली आहे. इथे आम्ही तुम्हाला ASUS Adolpad 10 Pro टॅबलेटची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबाबत सविस्तर माहिती देत आहोत. (Asus Adolpad 10 Pro launched check price and specifications)

ASUS Adolpad 10 Pro स्पेसिफिकेशन्स

ASUS Adolpad 10 Pro टॅबलेटमध्ये कंपनीने 10.1 इंचाचा Full HD+ IPS डिस्प्ले दिला आहे. या टॅबमध्ये देण्यात आलेल्या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1920 x 1200 पिक्सल आणि आस्पेक्ट रेश्यो 16:10 आहे. ASUS Adolpad 10 Pro मध्ये युजर्सना दमदार परफॉर्मन्स मिळण्यासाठी या टॅबमध्ये ऑक्टाकोर MediaTek 8183 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच टॅबमध्ये 4GB RAM आणि 128GB ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : गेमिंग फोन Redmi Note 10S भारतीय लॉन्चसाठी तयार, देईल का Realme ला मात?

MediaTek 8183 चिपसेट साल 2019 मध्ये सादर केला होता. हा चिपसेट कंपनीने टॅबलेट्ससाठी तयार केला होता जो 12nm प्रोसेसवर बनला आहे. या चिपसेटमध्ये 8 CPU कोर आहेत, ज्यात चार पावरफुल Cortex-A73 आणि चार छोटे Cortex-A53 कोर आहेत. या चिपसेटमध्ये इंटिग्रेटेड ग्राफिक्स ARM Mali-G72 देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : लो बजेटमध्ये शांत आहे VIVO, वाढत आहे स्वस्त फोनची प्रतीक्षा

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता ASUS Adolpad 10 Pro टॅबलेटमध्ये LED फ्लॅशसह 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच या टॅबच्या फ्रंटला 5 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. या टॅबची जाडी 8.4mm आणि याचे वजन 540 ग्राम आहे.

ASUS Adolpad 10 Pro टॅब अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. या टॅबमध्ये कंपनीने 7,300mAh ची बॅटरी दिली आहे. आसुसचा दावा आहे कि सिंगल चार्जमध्ये हा सहा तासांचा बॅटरी बॅकअप ऑफर करतो. चार्जिंगसाठी या टॅबमध्ये Type C पोर्ट दिला आहे.

ASUS Adolpad 10 Pro किंमत

ASUS Adolpad 10 Pro टॅबलेट कंपनीने चीनमध्ये सिंगल वेरिएंटमध्ये सादर केला आहे. या टॅबचा 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला वेरिएंट 1,599 युआन (करीब 18,200 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे. चीनमध्ये या टॅबची प्री बुकिंग सुरु झाली आहे. हा टॅब भारतीय बाजारात लॉन्च होईल कि नाही याबाबत कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

The post ASUS Adolpad 10 Pro टॅबलेट चीनमध्ये झाला लॉन्च, MediaTek प्रोसेसर आणि 7300mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-adolpad-10-pro-launched-check-price-and-specifications/feed/ 0
18 जीबी रॅम असलेला जगातील पहिला स्मार्टफोन 10 मार्चला होईल लॉन्च, सोबत असेल 6,000एमएएच बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-5-with-18-gb-ram-launch-on-10-march/ https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-5-with-18-gb-ram-launch-on-10-march/#respond Tue, 02 Mar 2021 12:21:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10235 ASUS ROG Phone 5 च्या लॉन्चच्याआधी या फोनच्या मोठ्या डिटेलचा खुलासा झाला आहे. या फोनचा नवीन रॅम वेरिएंट समोर आला आहे जो 18GB RAM ला सपोर्ट करतो.

The post 18 जीबी रॅम असलेला जगातील पहिला स्मार्टफोन 10 मार्चला होईल लॉन्च, सोबत असेल 6,000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ASUS ने सांगितले आहे कि कंपनी येत्या 10 मार्चला आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत ‘आरओजी’ सीरीजचा विस्तार करेल आणि यादिवशी ASUS ROG Phone 5 स्मार्टफोन लॉन्च केला जाईल. ROG म्हणजे Republic of Gamers, या सेग्मेंटचे फोन खासकरून मोबाईल गेमिंगसाठी डिजाईन केले जातात जे पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह येतात. काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या लीक्स मध्ये या फोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत तसेच आता नवीन लिस्टिंगमध्ये समजले आहे कि ASUS ROG Phone 5 जगातील पहिला स्मार्टफोन असेल जो 18 जीबी रॅमवर लॉन्च केला जाईल. (ASUS ROG Phone 5 with 18 gb ram launch on 10 march)

ASUS ROG Phone 5 च्या लॉन्चच्याआधी या फोनच्या मोठ्या डिटेलचा खुलासा झाला आहे. या फोनचा नवीन रॅम वेरिएंट समोर आला आहे जो 18GB RAM ला सपोर्ट करतो. आतापर्यंत असूस आरओजी फोन 5 16 जीबी रॅम सोबतच दिसला होता, 18 जीबी असलेला मॉडेल पहिल्यांदाच हाईलाईट झाला आहे. जर असूसने आपल्या या फोनचे दोन्ही मॉडेल ग्लोबली लॉन्च केले तर ASUS ROG Phone 5 जगातील पहिला फोन असेल जो 18 जीबी रॅमसह लॉन्च होईल.

ASUS ROG Phone 5

असूस आरओजी फोन 5 ची हि महत्वाची माहिती डिटेल गीकबेंचच्या माध्यमातून समोर आली आहे. चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर ASUS ROG Phone 5 चा नवीन मॉडेल सर्टिफाइड झाला आहे ज्यात फोनमध्ये 18 जीबी रॅम असल्याचे समोर आले आहे. हि लिस्टिंग 1 मार्चची आहे जिथे फोन ASUS_I005DB मॉडेल नंबरसह लिस्ट केला गेला आहे. रॅम व्यतिरिक्त या मॉडेलचे अनेक इतर स्पेसिफिकेशन्स वेबसाइटने शेयर केले आहेत ज्यांच्यावरून फोनच्या ताकदीचा अंदाज लावला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : 8GB रॅम आणि 64MP कॅमेरा असलेल्या Xiaomi Mi 10T ची किंमत 3000 रुपयांनी झाली कमी, लवकरच घ्या या संधीचा फायदा

गीकबेंच लिस्टिंगमध्ये ASUS ROG Phone 5 लेटेस्ट अँड्रॉइड 11 ओएससह दाखवण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 1.80गीगाहर्ट्ज बेस स्पीड असलेला आक्टा-कोर प्रोसेसर असल्याचे सांगण्यात आले आहे तसेच मदरबोर्ड सेक्शनमध्ये क्चॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेटचे कोडनेम लिहिण्यात आले आहे. आरओजी फोन 5 ला सिंगल-कोर मध्ये 1113 आणि मल्टी-कोर मध्ये 3468 बेंचमार्क स्कोर मिळाला आहे.

लीक्स नुसार फोनचे डायमेंशन 172.834 x 77.252 x 10.29एमएम असेल आणि हा 6.78 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेवर लॉन्च केला जाईल. फोटोग्राफीसाठी या फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असल्याचे सांगण्यात आले आहे ज्यात 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर मिळू शकतो. पावर बॅकअपसाठी आगामी आरओजी फोन 5 मध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते जी 65वाॅट रॅपिड चार्ज टेक्नॉलॉजीसह येईल. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी 10 मार्चची वाट बघावी लागेल.

The post 18 जीबी रॅम असलेला जगातील पहिला स्मार्टफोन 10 मार्चला होईल लॉन्च, सोबत असेल 6,000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-5-with-18-gb-ram-launch-on-10-march/feed/ 0
बदलेल भारतातील ‘गेमिंग स्मार्टफोन’ ची दुनिया, 16GB रॅम आणि 6000mAh बॅटरीसह येत आहे Asus ROG Phone 5 https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-5-india-launch-march-come-with-16gb-ram-and-6000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-5-india-launch-march-come-with-16gb-ram-and-6000mah-battery/#respond Thu, 18 Feb 2021 13:41:21 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10089 टिप्सटर मुकुल शर्माने ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे कि Asus ROG Phone 5 भारतात मार्च मध्ये लॉन्च होईल. त्याने लॉन्चची अचूक तारखे सार्वजनिक केली नाही.

The post बदलेल भारतातील ‘गेमिंग स्मार्टफोन’ ची दुनिया, 16GB रॅम आणि 6000mAh बॅटरीसह येत आहे Asus ROG Phone 5 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आपल्या पावरफुल गेमिंग स्मार्टफोन्ससाठी प्रसिद्ध ASUS चे ROG फोन म्हणजे Republic of Gamers चा नवीन हँडसेट भारतात लॉन्च होण्यासाठी तयार दिसत आहे. हा फोन खासकरून त्या मोबाईल युजर्ससाठी डिजाइन केला जाईल जे फोन मध्ये हेवी ग्राफिक्सअसलेले गेम खेळतात. भारतातील लॉन्चची माहिती टिप्सटर मुकुल शर्माने दिली आहे, त्यानुसार Asus ROG Phone 5 भारतात मार्चमध्ये लॉन्च होऊ शकतो. हा फोन तैवानी कंपनीचा नवीन गेमिंग फोन गेल्या वर्षी जुलैमध्ये लॉन्च झालेल्या Asus ROG Phone 3 चा सक्सेसर असू शकतो. काही दिवसांपूर्वी फोन काही सर्टिफिकेशन साइट आणि बेंचमार्किंग साइटवर दिसला आहे.

टिप्सटर मुकुल शर्माने ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे कि Asus ROG Phone 5 भारतात मार्च मध्ये लॉन्च होईल. त्याने लॉन्चची अचूक तारखे सार्वजनिक केली नाही. अजूनतरी कंपनीने याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही. पण, आशा आहे कि फोन बद्दल कंपनी लवकरच घोषणा करेल.

हे देखील वाचा : अश्याप्रकारे करा मोफत YouTube व्हिडीओ डाउनलोड

याआधी ASUS ROG Phone 5 चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर ASUS_I005DA मॉडेल नंबरसह लिस्ट केला गेला आहे. हि लिस्टिंग कालची म्हणजे 8 फेब्रुवारीची आहे जिथे फोनच्या स्पेसिफिकेशन्ससंबंधित महत्वाचे डिटेल्स मिळाले आहेत. लिस्टिंग मध्ये फोनच्या मदरबोर्ड सेक्शन मध्ये ‘lahaina’ लिहिण्यात आले आहे. हे कोडनेम क्वाॅलकाॅम स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेटचे आहे. स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेट क्वाॅलकाॅमने आतापर्यंत सादर केलेल्या सर्व चिपसेट मध्ये सर्वात जास्त ताकदवान आहे आणि हा चिपसेट 5G ला पण सपोर्ट करतो.

ASUS ROG Phone 5 संबंधित इतर लीक्स आणि सर्टिफिकेशन्स पाहता फोन बद्दल सांगण्यात आले आहे कि हा हाई रिफ्रेश रेट असलेल्या ओएलईडी पॅनलसह लाॅन्च होईल ज्यात 6.78 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळू शकतो. फोनचे डायमेंशन 172.834 x 77.252 x 10.29एमएम असल्याचे सांगण्यात आले आहे. जुन्या लीक मध्ये असूस आरओजी फोन 5 चा 8 जीबी रॅम वेरिएंट पण समोर आला आहे.

हे देखील वाचा : लॉन्चच्याआधीच समोर आले 8GB रॅम असलेल्या OPPO Find X3 चे स्पेसिफिकेशन्स, जाणून घ्या वैशिष्ट्ये

स्पेसिफिकेशन्स

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार फोनमध्ये 6.78 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळू शकतो. फोनचे डायमेंशन 172.834 x 77.252 x 10.29एमएम असेल. जुन्या लीक मध्ये असूस आरओजी फोन 5 चा 8 जीबी रॅम वेरिएंट पण समोर आला आहे. असूस आरओजी फोन 5 बद्दल रिपोर्ट समोर आला आहे कि हा फोन फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर मिळेल. पावर बॅकअपसाठी आगामी आरओजी फोन 5 मध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते जी 65वाॅट रॅपिड चार्ज टेक्नॉलॉजीसह येईल. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी कंपनीच्या घोषणेची वाट बघावी लागेल.

The post बदलेल भारतातील ‘गेमिंग स्मार्टफोन’ ची दुनिया, 16GB रॅम आणि 6000mAh बॅटरीसह येत आहे Asus ROG Phone 5 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-5-india-launch-march-come-with-16gb-ram-and-6000mah-battery/feed/ 0