BSNL 4G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 07 Mar 2023 14:44:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 BSNL 4G: 1 लाख ठिकाणी सुरु होणार 4जी नेटवर्क; 24500 कोटी रुपयांचे इक्विपमेंट्स मंजूर https://www.91mobiles.com/marathi/bsnl-4g-in-india-on-1-lakh-sites-with-tcs-equipment/ https://www.91mobiles.com/marathi/bsnl-4g-in-india-on-1-lakh-sites-with-tcs-equipment/#respond Wed, 15 Feb 2023 05:30:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17817 BSNL 4G च्या प्रतीक्षेत असणाऱ्या भारतीयांसाठी चांगली बातमी आली आहे. कंपनी देशात जवळपास 1 लाख साइट्सवर आपलं 4जी नेटवर्क सुरु करणार आहे. Bharat Sanchar Nigam Limited म्हणजे बीएसएनएलला बोर्डाकडून मंजुरी मिळाली आहे आणि आता Tata Consultancy Services (TCS) सरकारी दूरसंचार कंपनीला जवळपास 24,500 कोटी रुपयांचे इक्विपमेंट्स पुरवेल. महत्वाची बाब म्हणजे BSNL 4G network पूर्णपणे भारतीय […]

The post BSNL 4G: 1 लाख ठिकाणी सुरु होणार 4जी नेटवर्क; 24500 कोटी रुपयांचे इक्विपमेंट्स मंजूर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • बीएसएनएल एक लाखांपेक्षा जास्त साइट्सवर 4G आणणार
  • BSNL 4G भारतात TCS सह डिप्लॉय केला जाईल.
  • बीएसएनएलला 24,500 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे इक्विपमेंट्स मिळणार.
  • BSNL 4G Network पूर्णपणे मेड इन इंडिया असेल.

BSNL 4G च्या प्रतीक्षेत असणाऱ्या भारतीयांसाठी चांगली बातमी आली आहे. कंपनी देशात जवळपास 1 लाख साइट्सवर आपलं 4जी नेटवर्क सुरु करणार आहे. Bharat Sanchar Nigam Limited म्हणजे बीएसएनएलला बोर्डाकडून मंजुरी मिळाली आहे आणि आता Tata Consultancy Services (TCS) सरकारी दूरसंचार कंपनीला जवळपास 24,500 कोटी रुपयांचे इक्विपमेंट्स पुरवेल. महत्वाची बाब म्हणजे BSNL 4G network पूर्णपणे भारतीय असेल.

1 लाख साइट्सवर सुरु होणार BSNL 4G network

टीसीएस कंपनी बीएसएनएलला 1 लाख साइट्सवर 4जी नेटवर्क उपलब्ध करण्यासाठी 4जी इक्विपमेंट्स उपलब्ध करून देईल. या डीलसाठी आता बीएसएनएलच्या बोर्डाकडून परवानगी मिळाली आहे. या मंजुरीनंतर TCS कडून BSNL ला 24,556.37 कोटी रुपयांच्या उपकरणांचा पुरवठा केला जाईल. हे देखील वाचा: दिवस सुरु होताच डेटा संपतो? Jio चे हे प्लॅन्स देत आहेत 3GB डेली डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

BSNL आणि TCS की डील अंतगर्त टाटा कंसल्टंसी सर्व्हिसेज कंपनी भारत संचार निगम लिमिटेडला पुढील 10 वर्षांसाठी आपली टेक्नॉलॉजी व उपकरणं देईल. यात TCS कडून येणाऱ्या systems integrator (SI) चे काम सर्वात महत्वाचे असेल. डीलनुसार या नेटवर्क इक्विपमेंट्सचा एकूण खर्च 13,000 कोटी रुपयांच्या आसपास असेल. तसेच टीसीएस सोबतच Tejas Networks बीएसएनएलसाठी 4जी इक्विपमेंट्स मॅन्युफॅक्चर करेल.

BSNL 4G Launch होण्यास उशीर का

बोर्डाकडून जरी परवानगी मिळाली असली तरी अजून बीएसएनएल 4जी नेटवर्क लाइव्ह होण्यास थोडा वेळ लागेल. ईटीच्या रिपोर्टनुसार बोर्डचा हा घेऊन बीएसएनएल आता Department of Telecommunications (DoT) कडे जाईल. आणि त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशन आपला मसुदा तयार करून तो Group of Ministers (GoM) कडे पाठवेल. हे देखील वाचा: येत आहे कमी किंमत असलेला स्वस्त Tecno Pop 7 Pro स्मार्टफोन; या तारखेला होईल भारतात लाँच

डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशन आणि मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर बीएसएनएल कंपनी टीसीएस म्हणजे Tata Consultancy Services ला पैसे देऊन त्यांच्याकडून 4जी इक्विपमेंट्सची खरेदी करेल. ही प्रोसेस Reliance Jio आणि Airtel सारख्या टेलीकॉम कंपन्यांच्या तुलनेत थोडी जास्त मोठी आहे आणि त्यामुळे भारतात BSNL 4G Launch होण्यास उशीर होत आहे.

The post BSNL 4G: 1 लाख ठिकाणी सुरु होणार 4जी नेटवर्क; 24500 कोटी रुपयांचे इक्विपमेंट्स मंजूर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bsnl-4g-in-india-on-1-lakh-sites-with-tcs-equipment/feed/ 0
2023 च्या उत्तरार्धात येऊ शकतं BSNL 4G; कंपनीनं दिलं ट्विटर युजरला उत्तर https://www.91mobiles.com/marathi/bsnl-to-launch-4g-services-in-next-six-months/ https://www.91mobiles.com/marathi/bsnl-to-launch-4g-services-in-next-six-months/#comments Wed, 11 Jan 2023 06:32:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16759 भारतातील दोन प्रमुख खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी 5जी सर्व्हिस सुरु केली आहे. परंतु सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL अजूनही 3जी सर्व्हिस देत आहे. त्यामुळे फक्त बीएसएनएलचे युजर्स नव्हे तर सर्वच भारतीय सरकारी कंपनीच्या 4G Launch ची आतुरतेने वाट पाहत आहेत. तुम्ही जर बीएसएनएल युजर्स असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे की कंपनी लवकरच आपली 4जी […]

The post 2023 च्या उत्तरार्धात येऊ शकतं BSNL 4G; कंपनीनं दिलं ट्विटर युजरला उत्तर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतातील दोन प्रमुख खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी 5जी सर्व्हिस सुरु केली आहे. परंतु सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL अजूनही 3जी सर्व्हिस देत आहे. त्यामुळे फक्त बीएसएनएलचे युजर्स नव्हे तर सर्वच भारतीय सरकारी कंपनीच्या 4G Launch ची आतुरतेने वाट पाहत आहेत. तुम्ही जर बीएसएनएल युजर्स असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे की कंपनी लवकरच आपली 4जी सर्व्हिस सुरु करणार आहे. यावेळी BSNL नं सांगितलं आहे की 2023 च्या उत्तरार्धात कंपनीचं 4G Network लाइव्ह केलं जाईल.

यंदा येत आहे BSNL 4G

BSNL नं एका युजरच्या ट्वीटला उत्तर देत सांगितलं आहे की BSNL 4G सर्व्हिसची सुरुवात यावर्षीच्या दुसऱ्या सहामाहीत केली जाईल. अचूक तारीख आणि वेळेची माहिती अद्याप समोर आली नाही. एका युजरनं ट्विट केलं होतं की, “BSNL 4G अद्याप सुरु झालं नाही.” त्याला उत्तर देताना BSNL India नं लिहलं की, “4G सर्व्हिस 2023 च्या दुसऱ्या सहामाहीत सुरु होईल.”

यावरून स्पष्ट झालं आहे की महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जियो-एयरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलचं 4जी येत आहे. BSNL लोकल 4जी उपकरणांचा वापर करणार आहे, तसेच कंपनी तेजस नेटवर्कची मदत घेत आहे. सिस्टम इंटीग्रेटरच्या भूमिकेत TCS कंपनी दिसेल. तसेच सी-डॉट देखील बीएसएनएलला स्वदेशी 4जी सुरु करण्यास मदत करेल.

बीएसएनएल 5G देखील दूर नाही

BSNL 5G Service च्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो युजर्ससाठी एक चांगली बातमी आली आहे. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) 5जी सर्विस (5G Service) 2024 मध्ये सुरु केली जाईल. ही माहिती खुद्द केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव (Union Telecom Minister Ashwini Vaishnaw) यांनी दिली आहे. एका कार्यक्रमात 5G सुरु करण्याची माहिती देण्यासह त्यांनी सांगितलं की BSNL 4G Network सुरु करण्यासाठी टीसीएस (TCS) आणि सी-डॉट (C-DOT) यांच्या संघाची निवड करण्यात आली आहे, यातील करारानुसार आदेश दिल्यानंतर वर्षभरात सरकारी टेल्कोचा नेटवर्क 5जीवर अपग्रेड करण्यात येईल.

ओडिसामधील जियो आणि एयरटेल 5G सेवा सुरु करण्यासाठी एका कर्यक्रमात आलेल्या केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी पत्रकारांशी सवांद साधताना सांगितलं की, “बीएसएनएल 2024 मध्ये 5जी सेवा सुरु करेल’. तसेच त्यांनी सांगितलं की यावर्षीच्या अखेरपर्यंत BSNL 4G नेटवर्क उभारलं जाईल.

The post 2023 च्या उत्तरार्धात येऊ शकतं BSNL 4G; कंपनीनं दिलं ट्विटर युजरला उत्तर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bsnl-to-launch-4g-services-in-next-six-months/feed/ 1
BSNL 4G च्या लाँच डेटबद्दल टेलीकॉम मंत्र्यांनी दिली माहिती https://www.91mobiles.com/marathi/bsnl-4g-launch-date-january-2023-telecom-minister-ashwini-vaishnaw-confirms/ https://www.91mobiles.com/marathi/bsnl-4g-launch-date-january-2023-telecom-minister-ashwini-vaishnaw-confirms/#respond Sat, 22 Oct 2022 03:55:22 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14242 भारतातील सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL ना भारतात लवकरच आपली 4G सर्व्हिस लाँच करण्याची तयारी केली आहे. कंपनी 4G सह 5G सेवा भारतीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करत आहे. याबाबत एप्रिलमध्ये सरकारकडून मंजूरी मिळाल्यानंतर BSNL नं देशातील अनेक भागांमध्ये आपल्या 4जी नेटवर्कची टेस्टिंग देखील केली आहे. एकीकडे खाजगी टेलीकॉम कंपन्या 5G सादर करणार आहेत. बीएसएनएल आपली 4जी सेवा […]

The post BSNL 4G च्या लाँच डेटबद्दल टेलीकॉम मंत्र्यांनी दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतातील सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL ना भारतात लवकरच आपली 4G सर्व्हिस लाँच करण्याची तयारी केली आहे. कंपनी 4G सह 5G सेवा भारतीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करत आहे. याबाबत एप्रिलमध्ये सरकारकडून मंजूरी मिळाल्यानंतर BSNL नं देशातील अनेक भागांमध्ये आपल्या 4जी नेटवर्कची टेस्टिंग देखील केली आहे. एकीकडे खाजगी टेलीकॉम कंपन्या 5G सादर करणार आहेत. बीएसएनएल आपली 4जी सेवा जानेवारी 2023 मध्ये लाँच करेल. स्वतः टेलीकॉम मंत्री Ashwini Vaishnaw यांनी याचा खुलासा केला आहे.

द इकोनॉमिक टाइम्स (ईटी) शी बोलताना टेलीकॉम मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खुलासा केला की बीएसएनएल 4जी लवकरच लाँच केलं जाईल. जे पुढील वर्षी ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात येईल. तसेच वैष्णव यांनी असं देखील म्हटलं आहे की BSNL 5G देखील 2023 च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत भारतात येईल. हे देखील वाचा: How to port SIM: नंबर तोच ठेवून मोफत मिळवा 5G सिम, जाणून घ्या सिम पोर्ट करण्याची सोपी पद्धत

बीएसएनएल 4जी बद्दल काय बोलले अश्विनी वैष्णव

बीएसएनएलची 4जी सेवा येत्या जानेवारी 2023 पासून सुरु केली जाईल. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं आहे की बीएसएनएल 4जी जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यात सुरु केलं जाईल. तसेच 5G बद्दल सांगण्यात आलं आहे की 5G सेवा ऑगस्ट 2023 पर्यंत सादर होईल. टेलीकॉम मंत्री अश्विनी वैष्णव यांनी असं देखील म्हटलं आहे की, येत्या कालावधीत बीएसएनएल काही भागांमध्ये Jio आणि Airtel सारख्या खाजगी टेलीकॉम कंपन्यांची बरोबरी करेल.

20 कोटी युजर्स करतील बीएसएनएलचा स्वीकार

अश्विनी वैष्णव यांनी याआधी म्हटलं होतं की बीएसएनएल देशात 4जी आणि 5जी सेवा सुरु करण्यासाठी स्वदेशी टेक्नॉलॉजीचा वापर करेल. त्यांनी बीएसएनएल 4G आणि 5G सेवेसह कमीत कमी 20 कोटी युजर्स पर्यंत पोहचेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

या दिवशी येऊ शकतं बीएसएनएल 5जी

भारतात 5G लाँचच्या बाबतीत वैष्णव यांनी म्हटलं आहे की BSNL 5G भारतात 15 ऑगस्ट, 2023 रोजी लाँच केलं जाईल. कंपनी सुरुवातिला ही सर्व्हिस काही शहरांमध्ये सुरु करेल. त्यानंतर हळूहळू संपूर्ण भारतात हिचा विस्तार केला जाईल. हे देखील वाचा: टेलिकॉम क्षेत्रानंतर आता लॅपटॉप सेगमेंटची बारी; Reliance च्या स्वस्त लॅपटॉप JioBook ची विक्री सुरु

बीएसएनएलच्या ढिल्या कारभारावर केलं भाष्य

वैष्णव यांनी म्हटलं की बीएसएनएल अशी कंपनी आहे जी बाजारात मोठी भूमिका बजावत राहील. बीएसएनएलला सरकारकडून आधीच 1.64 लाख कोटी रुपयांचं पॅकेज मिळालं आहे, जे कोट्यवधी रुपयांचं कर्ज आहे. बीएसएनएलची उपलब्धता भारतातील छोट्या आणि मोठ्या शहरांमध्ये आहे. त्यामुळे कधीही या कंपनीला कमी समजता येणार नाही. बीएसएनएलचं नेटवर्क लेह आणि लदाखच्या पर्वतीय भागांमध्ये देखील मिळतं, जिथे खाजगी कंपन्या मागे आहेत.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post BSNL 4G च्या लाँच डेटबद्दल टेलीकॉम मंत्र्यांनी दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bsnl-4g-launch-date-january-2023-telecom-minister-ashwini-vaishnaw-confirms/feed/ 0
जियोकडे देखील नाही असा भन्नाट प्लॅन! रोज 5GB 4G Data देऊन या कंपनीनं दिला सर्व कंपन्यांना झटका https://www.91mobiles.com/marathi/5gb-data-daily-599-bsnl-plan-details-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/5gb-data-daily-599-bsnl-plan-details-in-marathi/#respond Wed, 21 Sep 2022 10:14:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13322 Jio, Airtel आणि Vi सारख्या कंपन्या एकीकडे ग्राहकांकडून भरमसाठ पैसे घेत आहेत, दुसरीकडे सरकारी BSNL म्हणजे Bharat Sanchar Nigam Limited ग्राहकांना कमी किंमतीत बेस्ट बेनिफिट्स देणारे प्लॅन्स सादर करत आह . भले सरकारी टेलीकॉम कंपनी आज 4G आणि 5G च्या रेसमध्ये खाजगी कंपनीपेक्षा खूप मागे आहे. परंतु स्वस्त रिचार्ज प्लॅन्सच्या शर्यतीत बीएसएनएलला नेहमी पुढे असते. […]

The post जियोकडे देखील नाही असा भन्नाट प्लॅन! रोज 5GB 4G Data देऊन या कंपनीनं दिला सर्व कंपन्यांना झटका first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Jio, Airtel आणि Vi सारख्या कंपन्या एकीकडे ग्राहकांकडून भरमसाठ पैसे घेत आहेत, दुसरीकडे सरकारी BSNL म्हणजे Bharat Sanchar Nigam Limited ग्राहकांना कमी किंमतीत बेस्ट बेनिफिट्स देणारे प्लॅन्स सादर करत आह . भले सरकारी टेलीकॉम कंपनी आज 4G आणि 5G च्या रेसमध्ये खाजगी कंपनीपेक्षा खूप मागे आहे. परंतु स्वस्त रिचार्ज प्लॅन्सच्या शर्यतीत बीएसएनएलला नेहमी पुढे असते. याचं उदाहरण म्हणजे प्रायव्हेट ऑपरेटर जास्तीत जास्त 3जीबी डेली डेटा देते आहेत तर दुसरीकडे 5जीबी डेटा प्रतिदिन असलेला प्लॅन सादर करून बीएसएनएलनं पुन्हा एकदा स्वतःला सर्वात स्वस्त कंपनी सिद्ध केलं आहे.

5GB Data Daily देऊन बीएसएनएलनं रिलायन्स जियो, एयरटेल आणि विआयला जोरदार उत्तर दिलं आहे. सध्या कोणतीही खाजगी टेलीकॉम कंपनी आपल्या कोणत्याही प्रीपेड प्लॅनमध्ये 5जीबी डेली डेटा देत नाही. BSNL फक्त भरमसाठ डेटा देत नाही तर सोबत 84 Days Validity देखील मिळते. विशेष म्हणजे बीएसएनएलच्या या जबरदस्त प्लॅनची किंमत फक्त 599 रुपये आहे. हे देखील वाचा: उरले फक्त दोन दिवस! BSNL च्या ‘या’ रिचार्ज प्लॅन्सवर मिळतोय 75 GB डेटा अगदी मोफत

BSNL 599 Plan Details In Marathi

  • 5GB Data Daily
  • 84 Days Validity
  • Free Data
  • Unlimited Calling

5GB Data Daily

बीएसएनएलच्या 599 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची सर्वात मोठी खासियत यात मिळणारा इंटरनेट डेटा आहे. कंपनी आपल्या युजर्सना या रिचार्जमध्ये रोज 5जीबी डेटा देत आहे. डेली 5जीबी डेटाचा वापर पूर्णपणे फ्री 4जी स्पीडवर करता येईल. रोजचा 5जीबी डेटा संपल्यावर युजर्सना 25 पैसे प्रति एमबी दराने शुल्क द्यावे लागेल.

5GB Data Daily 599 BSNL Plan Details In Marathi

84 Days Validity

599 रुपयांचा बीएसएनएलचा प्रीपेड प्लॅन 84 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये फक्त इंटरनेट बेनिफिट्स नव्हे तर ग्राहकांना मोठी वैधता देखील मिळत आहे. रोज 5जीबी या हिशोबाने 84 दिवसांत बीएसएनएल ग्राहक एकूण 420 जीबी 4जी डेटा वापरता येईल. हे देखील वाचा: 200 रुपयांत 3 महिन्यांच्या रिचार्ज; BSNL चे 90 दिवसांचे बेस्ट रिचार्ज पॅक, कॉलिंगसह डेटा फ्री

Free Data

5जीबी डेटा ऐकून मोबाइल युजर्स खुश होतात आणि प्रायव्हेट कंपन्यांच्या भुवया उंचावतात, त्यात एक्स्ट्रा फ्री डेटा देऊन बीएसएनएलनं तक्रारीसाठी जागाच सोडली नाही. या प्लॅनमध्ये रात्री 12 ते सकाळी 5 च्या दरम्यान फ्री इंटरनेट मिळतं. म्हणजे जर तुम्ही रात्री उशीरपर्यंत जगात असाल तर कंपनी तुम्हाला मोफत 4जी डेटा देईल. महत्वाचे म्हणजे या 5 तासांमध्ये वापरण्यात येणार डेटा तुमच्या 5जीबी डेटा मधून कट केला जाणार नाही.

Unlimited Calling

बीएसएनएल 599 रुपयांचा प्लॅन दीर्घ वॅलिडिटी आणि भरपूर डेटा सोबतच कॉलिंग बेनिफिट देखील देतो. या प्लॅनमध्ये कंपनीकडून अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा दिली जात आहे जी सर्व नेटवर्कवर पूर्णपणे फ्री असेल. तसेच युजर्सना रोज 100एसएमएस देखील मिळतात.

The post जियोकडे देखील नाही असा भन्नाट प्लॅन! रोज 5GB 4G Data देऊन या कंपनीनं दिला सर्व कंपन्यांना झटका first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5gb-data-daily-599-bsnl-plan-details-in-marathi/feed/ 0
बीएसएनएल 3जी सिम ला करत आहे 4जी सिम मध्ये अपग्रेड, लवकरच संपूर्ण देशात लागू होईल 4जी सर्विस, जियो-एयरटेल ला मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/bsnl-4g-usim-available-across-india-at-rs20-for-upgrade-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/bsnl-4g-usim-available-across-india-at-rs20-for-upgrade-in-marathi/#respond Fri, 11 May 2018 15:08:10 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=426 भारतीय संचार निगम लिमिटेड ने 4जी सिम ची विक्री सुरू केली आहे.

The post बीएसएनएल 3जी सिम ला करत आहे 4जी सिम मध्ये अपग्रेड, लवकरच संपूर्ण देशात लागू होईल 4जी सर्विस, जियो-एयरटेल ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशाचा टेलीकॉम बाजार वेगाने प्रगती करत आहे. रिलायंस जियो सह एयरटेल, वोडाफोन आणि आइडिया सारख्या टेलीकॉम कंपन्या पण जास्तीत जास्त कस्टमर्स आकर्षित करण्यासाठी खुप स्वस्ता प्लान्स सादर करत आहेत आणि चांगली 4जी सर्विस देत आहेत. या रेस मध्ये देशातील सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल पण मागे राहू इच्छित नाही आणि त्यामुळे कंपनी ने पण देशभरात आपली 4जी सर्विस आणण्याची तयारी केली आहे. या सर्विस ची सुरवात बीएसएनएल ने देशात आपल्या 4जी सिम च्या विक्रीने केली आहे.

भारतीय संचार निगम लिमिटेड ने 4जी सिम ची विक्री सुरू केली आहे. कंपनी ने बीएसएनएल चा 4जी सिम फक्त 20 रुपयांमध्ये देत आहे. हे सिम प्रीपेड तसेच पोस्ट पेड दोन्ही ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आले आहे. लक्षात असू दे हे सिम आता फक्त सिम अपग्रेडेशन साठी लॉन्च करण्यात आला आहे, म्हणजे फक्त बीएसएनएल ग्राहक आपल्या जुन्या 3जी सिम ला 20 रुपये देऊन 4जी सिम मध्ये अपग्रेड करू शकतात.

बीएसएनएल च्या 4जी सिम विक्री वरून हे स्पष्ट झाले आहे की कंपनी देशात आपली 4जी सर्विस आणण्यासाठी पूर्णपणे तयार आहे आणि येणार्‍या दिवसांमध्ये बीएसएनएल पण 4जी नेटवर्क असलेली कंपनी बनेल. पण बीएसएनएल सध्यातरी केरळ मध्येच 4जी सर्विस देत होती तसेच इतर राज्यांमध्ये सध्या फक्त 3जी नेटवर्क उपलब्ध होते.

बीएसएनएल ग्राहक जवळच्या कोणत्याही मोबाइल स्टोर वर जाऊन आपल्या बीएसएनएल सिम ला 4जी सिम मध्ये अपग्रेड करू शकतात. विशेष म्हणजे जेव्हा बीएसएनएल ने 2जी सिम 3जी मध्ये अपग्रेड केले होते तेव्हा कंपनी 200 रुपये घेतले होते. पण आता 3जी वरून 4जी सिम घेण्यासाठी बीएसएनएल ने फक्त 20 रुपये शुल्क ठेवले आहे. यावरुन हे स्पष्ट होत आहे की जियो व अन्य खाजगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी बीएसएनएल पण देशात आपल्या 4जी कस्टमर्स ची संख्या वाढवू इच्छित आहे.

The post बीएसएनएल 3जी सिम ला करत आहे 4जी सिम मध्ये अपग्रेड, लवकरच संपूर्ण देशात लागू होईल 4जी सर्विस, जियो-एयरटेल ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bsnl-4g-usim-available-across-india-at-rs20-for-upgrade-in-marathi/feed/ 0