IPL - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 31 Mar 2023 05:12:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 आजपासून मोफत बघा Jio Cinema वर IPL! Jio चं सिम असण्याची आवश्यकता नाही https://www.91mobiles.com/marathi/watch-ipl-free-jio-special-offer-for-airtel-vi-and-bsnl-users/ https://www.91mobiles.com/marathi/watch-ipl-free-jio-special-offer-for-airtel-vi-and-bsnl-users/#respond Fri, 31 Mar 2023 04:40:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19797 यंदा इंडियन प्रीमियर लीगची मजा द्विगुणित होणार आहे कारण रिलायन्स जियोच्या ओटीटी अ‍ॅप जियोसिनेमावर प्रेक्षकांना मोफत आयपीएल 2023 चे सर्व सामने बघता येतील. परंतु जर तुम्ही विचार करत असाल की फक्त जियो युजर्स मोफत ऑनलाइन मॅच बघू शकतील तर तसं नाही. तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण एयरटेल, वोडाफोन-आयडिया (वी) आणि बीएसएनएल युजर्स देखील मोफत सर्व […]

The post आजपासून मोफत बघा Jio Cinema वर IPL! Jio चं सिम असण्याची आवश्यकता नाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
यंदा इंडियन प्रीमियर लीगची मजा द्विगुणित होणार आहे कारण रिलायन्स जियोच्या ओटीटी अ‍ॅप जियोसिनेमावर प्रेक्षकांना मोफत आयपीएल 2023 चे सर्व सामने बघता येतील. परंतु जर तुम्ही विचार करत असाल की फक्त जियो युजर्स मोफत ऑनलाइन मॅच बघू शकतील तर तसं नाही. तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण एयरटेल, वोडाफोन-आयडिया (वी) आणि बीएसएनएल युजर्स देखील मोफत सर्व सामने आपल्या मोबाइल, लॅपटॉप व टीव्हीवर ऑनलाइन स्ट्रीम करू शकतील.

Vi, Airtel आणि BSNL युजर्स देखील मोफत बघू शकतील आयपीएल

Jio Cinema भारतात होणाऱ्या IPL 2023 चा अधिकृत लाइव्ह-स्ट्रीमिंग पार्टनर आहे. त्यामुळे एयरटेल, जियो, विआय आणि बीएसएनएलच्या सर्व युजर्सना आयपीएलमधील सर्व सामने मोफत ऑनलाइन स्ट्रीम करता येतील. म्हणजे तुम्ही कोणत्याची टेलीकॉम कंपनीचे युजर असले तरी JioCinema अ‍ॅपच्या माध्यमातून TATA IPL 2023 मोफत मध्ये ऑनलाइन स्ट्रीम करता येईल. हे देखील वाचा: Nothing Phone (2) लवकरच येऊ शकतो भारतात; BIS वेबसाइटवर लिस्ट झाला फोन

या भाषांमध्ये घेता येईल आयपीएलची मजा

जियो सिनेमावर 12 वेगवेगळ्या भाषा जसे की मराठी, तामिळ, इंग्लिश, हिंदी, तेलुगू, गुजराती, बंगाली आणि भोजपुरीमध्ये मॅचचा आनंद घेता येईल. तसेच अ‍ॅपवर फक्त समालोचनाची भाषा बदलणार नाही तर मोबाइलवरील आकडेवारी आणि ग्राफिक्स देखील तुम्ही निवडलेल्या भाषेत दिसू लागतील.

आयपीएल 2023 मध्ये होणार 74 सामने

31 मार्चपासून इंडियन प्रीमियर लीग 2023 ची सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी पहिला सामाना गुजरात टायटंस आणि चेन्नई सुपर किंग दरम्यान असेल. यंदा एकूण 74 सामने खेळवले जातील. तसेच जियो सिनेमा अ‍ॅपवर तुम्ही आयपीएलचे सर्व सामने बघू शकाल. तसेच वेगवेगळ्या अँगलमधून सामना पाहू शकाल. म्हणजे तुम्ही कॅमेरा अँगल फोनवर बदलू शकाल. हे देखील वाचा: 240वॉट चार्जिंग असलेला Realme GT 3 लवकरच होऊ भारतात लाँच; सर्टिफिकेशन साइटवर झाला लिस्ट

यावेळी 52 दिवस चालणाऱ्या क्रिकेटच्या महामेळाव्यात एकूण 10 संघ सहभागी होत आहेत. सीजनमध्ये एकूण 70 लीग सामने खेळवले जातील. त्यानंतर प्लेऑफचे चार सामने खेळवले जातील. अशाप्रकारे टूर्नामेंटमध्ये एकूण 74 सामने होतील. तसेच तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की 18 डबल हेडर (एका दिवसात दोन सामने) होतील.

The post आजपासून मोफत बघा Jio Cinema वर IPL! Jio चं सिम असण्याची आवश्यकता नाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/watch-ipl-free-jio-special-offer-for-airtel-vi-and-bsnl-users/feed/ 0
Free मध्ये IPL 2023 दाखवून देखील Ambani करणार कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या कसं https://www.91mobiles.com/marathi/ipl-free-on-jio-cinema-but-ambani-makes-money-from-mobile-data-cost/ https://www.91mobiles.com/marathi/ipl-free-on-jio-cinema-but-ambani-makes-money-from-mobile-data-cost/#respond Thu, 23 Feb 2023 03:39:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18069 यंदा IPL 2023 च्या सर्व सामान्यांची ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जियो सिनेमाच्या माध्यमातून केली जाईल. त्यामुळे क्रिकेट प्रेमी आनंदले आहेत कारण यंदा आयपीएलसाठी कोणतंही सब्सक्रिप्शन घ्यावं लागणार नाही आणि सर्व सामने मोफत बघता येतील. परंतु तुम्हाला माहित आहे का जरी प्रेक्षकांनी वेगळं सब्सक्रिप्शन घेतलं नाही आणि फ्री आयपीएल मॅच पहिल्या तरी यातून देखील Ambani कोट्यवधी कमवणार […]

The post Free मध्ये IPL 2023 दाखवून देखील Ambani करणार कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या कसं first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • इंडियन प्रीमियर लीग 2023 चं प्रसारण जियो सिनेमावरून केलं जाईल.
  • आयपीएलचा पहिला सामना 31 मार्चला होईल.
  • फोनवर 4K क्वॉलिटीमध्ये आयपीएल मॅच पाहता येईल.

यंदा IPL 2023 च्या सर्व सामान्यांची ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जियो सिनेमाच्या माध्यमातून केली जाईल. त्यामुळे क्रिकेट प्रेमी आनंदले आहेत कारण यंदा आयपीएलसाठी कोणतंही सब्सक्रिप्शन घ्यावं लागणार नाही आणि सर्व सामने मोफत बघता येतील. परंतु तुम्हाला माहित आहे का जरी प्रेक्षकांनी वेगळं सब्सक्रिप्शन घेतलं नाही आणि फ्री आयपीएल मॅच पहिल्या तरी यातून देखील Ambani कोट्यवधी कमवणार आहेत. पुढे आम्ही तुम्हाला हे कसं शक्य आहे याची माहिती दिली आहे.

एक मॅच बघण्यासाठी खर्च करावे लागतील 28 रुपये

इंडस्ट्री एक्सपर्ट्सनुसार 3 तासांचा सामना मोबाइलवर बघण्यासाठी प्रेक्षकांना कमीत कमी 2 जीबी डेटा खर्च करावा लागेल. भारतात जरी जगातील सर्वात स्वस्त डेटा प्लॅन्स असले तरी एक जीबी डेटाची किंमत जवळपास 14 रुपये आहे. याचा अर्थ असा की जियो सिनेमा अ‍ॅपवर एक लाइव्ह मॅच बघण्यासाठी युजर्सना 28 रुपये खर्च करावे लागतील. हे देखील वाचा: हे 10 अंकी मोबाइल नंबर 30 दिवसांत होणार बंद; TRAI नं घेतला कडक निर्णय

एकूण 70 लीग सामने आणि चार प्लेऑफ सामने 52 दिवसांत खेळवले जातील. याचा अर्थ असा की मोबाइल किंवा कनेक्टेड टीव्हीवर सर्व 74 सामने बघण्यासाठी 2,072 रुपयांचा डेटा युजर्सना लागेल. तसेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणच्या ताज्या ग्राहक आकडेवारीनुसार, रिलायन्स जियोकडे सक्रिय ग्राहकांची संख्या जवळपास 425 मिलियन आहे. यावरून तुम्ही देखील हिशोब करू शकता की या सर्व ग्राहकांनी एक सामना जरी पहिला तरी डेटावर 11,900 मिलियन रुपये खर्च केले जातील. वायकॉम18 मीडिया नेटवर्क आपल्या मोफत आयपीएलच्या माध्यमातून 500 मिलियन ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

मीडिया रिपोर्टनुसार Jio च्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, “आम्हाला सर्व युजर मोबाइल फोनवर आयपीएलचा संपूर्ण सामना बघतील असं अपेक्षित नाही. सरासरी लोक एक तासापेक्षा कमी काळ सामना बघतात, ज्यासाठी वरवर 0.5 जीबी डेटा आवश्यक असतो. एवढा डेटा सर्वच टेलिकॉम ऑपरेटर्सच्या बहुतांश डेटा प्लॅनमध्ये असतो.”

jio 5g works on 4g sim

वायकॉम18 च्या दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “टेलीकॉम कंपन्या विशेष प्रचार करून आयपीएलच्या काळात स्वस्त डेटा प्लॅन सादर करतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे.” परंतु अद्याप जियो किंवा एयरटेलनं याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. हे देखील वाचा: आमच्या हाती लागली Samsung Galaxy A34 आणि Galaxy A54 ची माहिती; पाहा फोटो, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

The post Free मध्ये IPL 2023 दाखवून देखील Ambani करणार कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या कसं first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ipl-free-on-jio-cinema-but-ambani-makes-money-from-mobile-data-cost/feed/ 0
IPL 2023 live streaming: 31 मार्चपासून सुरु होणार क्रिकेटचा महासंग्राम; ‘इथे’ बघता येणार मोफत https://www.91mobiles.com/marathi/ipl-2023-live-streaming-on-jio-cinema-for-free/ https://www.91mobiles.com/marathi/ipl-2023-live-streaming-on-jio-cinema-for-free/#respond Tue, 21 Feb 2023 06:36:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17989 इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 16व्या सीजनचं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. या शेड्यूलनुसार IPL 2023 चा पहिला सामना 31 मार्चला खेळाला जाईल. तर 28 मेला अंतिम सामन्याचे आयोजन केलं जाईल. यावेळी आयपीएलचे स्ट्रीमिंग राइट्स जियो टीव्हीला देण्यात आले आहेत. म्हणजे यावेळी आयपीएलचे सर्व सामने जियो युजर्ससाठी Jio Cinema वर मोफत दिसतील. याआधी आयपीएलच्या लाइव्ह […]

The post IPL 2023 live streaming: 31 मार्चपासून सुरु होणार क्रिकेटचा महासंग्राम; ‘इथे’ बघता येणार मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • IPL 2023 यावर्षी 31 मार्च 2023 ते 28 मे 2023 पर्यंत आयोजित केली जाईल.
  • Jio Cinema वर IPL च्या 16व्या सीजनचे सर्व सामने मोफत दाखवले जातील.
  • यावेळी 52 दिवसांत 10 संघांमध्ये 70 लीग सामने खेळले जातील.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 16व्या सीजनचं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. या शेड्यूलनुसार IPL 2023 चा पहिला सामना 31 मार्चला खेळाला जाईल. तर 28 मेला अंतिम सामन्याचे आयोजन केलं जाईल. यावेळी आयपीएलचे स्ट्रीमिंग राइट्स जियो टीव्हीला देण्यात आले आहेत. म्हणजे यावेळी आयपीएलचे सर्व सामने जियो युजर्ससाठी Jio Cinema वर मोफत दिसतील. याआधी आयपीएलच्या लाइव्ह टेलिकास्टचे राइट हॉट स्टारकडे होते. पुढे तुम्हाला IPL 2023 Schedule ची माहिती दिली आहे.

Jio Cinema वर बघता येईल IPL 2023

Jio Cinema वर यावेळी IPL 2023 चे सामने मोफत स्ट्रीम केले जातील. विशेष म्हणजे जियो युजर्स फक्त आपल्या नंबरच्या माध्यमातून जियो सिनेमामध्ये लॉग इन करून आयपीएलचे सर्व सामने मोफत बघता येतील. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत. हे देखील वाचा: Oppo Reno8 T सारखा आणखी नवीन 5G स्मार्टफोन; कंपनीनं सुरु केली भारतात टेस्टिंग

IPL 2023 Schedule

यावेळी 52 दिवस चालणाऱ्या या महासंग्रामात एकूण 10 संघ सहभागी होतील. सीजनमध्ये एकूण 70 लीग सामने खेळवले जातील. त्यानंतर प्लेऑफचे चार सामने आयोजित केले जातील. अशाप्रकटे टूर्नामेंटमध्ये एकूण 74 सामने होतील. तसेच यातील 18 दिवस डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) असतील.

संपूर्ण देशात होतील IPL 2023 चे सामने

देशातील एकूण 12 मैदानांवर सर्व सामने खेळवले जातील. एक टीम लीग दरम्यान सात सामने आपल्या घरच्या मैदानावर आणि सात सामने प्रतिस्पर्धी संघांच्या मैदानावर खेळतील. धर्मशालामध्ये पंजाब किंग्स आणि गुवाहाटी मध्ये राजस्थान रॉयल्सची टीम आपले दोन-दोन घरचे सामने खेळतील. याआधी 2022 मध्ये टूर्नामेंट पूर्णपणे भारतात खेळवण्यात आले होते. मुंबई-पुणेमध्ये लीग आणि अहमदाबाद-कोलकात्यामध्ये प्लेऑफ सामने होते. हे देखील वाचा: रेडमी-पोकोच्या अडचणीत वाढ; स्वस्त आणि मस्त Realme C55 झाला वेबसाइटवर लिस्ट

IPL 2023 team list

  1. Gujarat Titans
  2. Mumbai Indians
  3. Punjab Kings
  4. Delhi Capitals
  5. Rajasthan Royal
  6. Royal Challengers Bangalore
  7. Sunrisers Hyderabad
  8. Chennai Super Kings
  9. Lucknow Supergiants
  10. Kolkata Knight Riders

The post IPL 2023 live streaming: 31 मार्चपासून सुरु होणार क्रिकेटचा महासंग्राम; ‘इथे’ बघता येणार मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ipl-2023-live-streaming-on-jio-cinema-for-free/feed/ 0
IPL 2023: यंदा मोफत बघता येणार आयपीएलचे सर्व सामने; आत्ताच डाउनलोड करा ‘हे’ अ‍ॅप https://www.91mobiles.com/marathi/ipl-2023-live-match-watch-free-at-jio-cinema-app/ https://www.91mobiles.com/marathi/ipl-2023-live-match-watch-free-at-jio-cinema-app/#respond Sat, 04 Feb 2023 12:41:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17486 इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या शुभारंभाला आता काहीच दिवस उरले आहेत. लवकरच या सीजनच्या शेड्यूलची ऑफिशियल घोषणा केली जाईल. तुम्हाला माहित असेल की यावेळी आयपीएलचे स्ट्रीमिंग राइट्स जियो टीव्हीला देण्यात आले आहेत. म्हणजे यावेळी आयपीएलचे सर्व सामने जियो युजर्ससाठी मोफत असतील. रिपोर्ट्सनुसार भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डनं जियोला आयपीएल लाइव्ह स्ट्रीमिंग करण्याची परवानगी दिली आहे. याआधी […]

The post IPL 2023: यंदा मोफत बघता येणार आयपीएलचे सर्व सामने; आत्ताच डाउनलोड करा ‘हे’ अ‍ॅप first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • IPL 2023 यावर्षी 20 मार्च ते 28 मे 2023 दरम्यान आयोजित केली जाईल.
  • Jio Cinema अ‍ॅप वर IPL च्या 16 व्या हंगामातील सर्व सामने दाखवले जातील.
  • Jio TV अ‍ॅप वर IPL 2023 स्ट्रीम केली जाणार नाही.

इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या शुभारंभाला आता काहीच दिवस उरले आहेत. लवकरच या सीजनच्या शेड्यूलची ऑफिशियल घोषणा केली जाईल. तुम्हाला माहित असेल की यावेळी आयपीएलचे स्ट्रीमिंग राइट्स जियो टीव्हीला देण्यात आले आहेत. म्हणजे यावेळी आयपीएलचे सर्व सामने जियो युजर्ससाठी मोफत असतील. रिपोर्ट्सनुसार भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डनं जियोला आयपीएल लाइव्ह स्ट्रीमिंग करण्याची परवानगी दिली आहे. याआधी आयपीएलच्या लाइव्ह टेलिकास्टचे अधिकार हॉट स्टारकडे होते.

IPL 2023

रिपोर्ट्स नुसार Jiocinema अ‍ॅपवर कथितरित्या IPL 2023 चे सर्व सामने 11 वेगवेगळ्या स्थानिक भाषांमध्ये स्ट्रीम केले जातील. एक्सचेंज4मीडियाच्या एक रिपोर्टनुसार, Sports18 नं देखील Jio TV अ‍ॅप वर IPL 2023 मोफत प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु Sports18 च्या अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. हे देखील वाचा: 108MP प्रायमरी कॅमेऱ्यासह Oppo चा 5G Phone लाँच; रेडमी-रियलमीची वाट लावणार का Oppo Reno 8T 5G?

सध्या वायकॉम18 कडे 2027 पर्यंत आयपीएलचे डिजिटल स्ट्रीमिंग अधिकार आहेत, ज्यासाठी 23,578 कोटी रुपये देण्यात आले होते. रिपोर्ट्सनुसार Viacom18 आयपीएल 2023 मोफत स्ट्रीम करण्याचा पर्याय क्रिकेट प्रेमींना देऊ शकतं. त्यामुळे Jio Cinema अ‍ॅपवर IPL 2023 मोफत स्ट्रीम करता येऊ शकते. अलीकडेच या अ‍ॅपवर फुटबॉल विश्व चषक अर्थात फीफा 2022 चे सामने मोफत स्ट्रीम करण्यात आले होते.

आयपीएल गेली अनेक वर्ष डिज्नी+ हॉटस्टारच्या माध्यमातून लाइव्ह टेलीकास्ट केली जात आहे. ज्यासाठी 2018 मध्ये स्टार इंडियानं 16,347 कोटी रुपये दिले होते आणि डिजिटल आणि टीव्ही अधिकार मिळवले होते. परंतु यंदा टीव्ही आणि डिजिटलचे अधिकार वेगवेगळे करण्यात आले आहेत, ज्यामुळे स्टार इंडियाला डिजिटल अधिकार मिळाले नाहीत. परंतु टीव्ही अधिकार अजूनही स्टार इंडियाकडे आहेत, त्यामुळे केबल किंवा सॅटेलाइट टीव्हीवर तुम्हाला आयपीएल 2023 बघायची असेल तर स्टार स्पोर्ट्स चॅनलची मदत घ्यावी लागेल. हे देखील वाचा: Okaya Faast F3 Electric Scooter च्या लाँच डेटची घोषणा; पुढील आठवड्यात येणार वेगवान EV

IPL 2023 मुळे वाढतील Jio Cinema subscribers

भारतीय ओटीटी सेगमेंटमध्ये, डिज्नी+ हॉटस्टारनं अलीकडेच एक महत्वाचं स्थान निर्माण केलं आहे आणि आयपीएलच्या प्रेक्षकांमुळे हॉटस्टारकडे बाजारातील 50 टक्के हिस्सा आहे. परंतु Jio Cinema अ‍ॅप कथितरित्या IPL 2023 च्या सामान्यांचे मोफत स्ट्रीमिंग करता आल्यास Hotstar ला जवळपास 15-25 मिलियन ग्राहक गमवायला लागू शकतात.

The post IPL 2023: यंदा मोफत बघता येणार आयपीएलचे सर्व सामने; आत्ताच डाउनलोड करा ‘हे’ अ‍ॅप first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ipl-2023-live-match-watch-free-at-jio-cinema-app/feed/ 0
IPL 2021: असे केल्यास Jio युजर बघू शकतील प्रत्येक मॅच मोफत https://www.91mobiles.com/marathi/ipl-2021-watch-live-online-india-timings-disney-plus-hotstar-star-sports-cricket/ https://www.91mobiles.com/marathi/ipl-2021-watch-live-online-india-timings-disney-plus-hotstar-star-sports-cricket/#respond Tue, 06 Apr 2021 11:11:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10519 रिलायंस जियोकडे अनेक प्लान्स आहेत, ज्यात Disney+ Hotstar VIP चे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. कंपनीच्या 401 रुपये, 499 रुपये, 598 रुपये, 777 रुपये आणि 2599 रुपयांच्या प्लानमध्ये युजर्स डेटा आणि फ्री कॉलिंग सोबतच आईपीएलच्या सर्व मॅच बघू शकतील.

The post IPL 2021: असे केल्यास Jio युजर बघू शकतील प्रत्येक मॅच मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
IPL चा 14वा सीजन यावेळी भारतात 9 एप्रिलपासून सुरु होत आहे. गेल्यावर्षी कोरोना वायरस महामारीमुळे आईपीएलचे आयोजन भारताऐवजी संयुक्त अरब अमीरात (UAE) मध्ये करण्यात आले होते. पण, यावेळी कोविड-19 चा परिणाम इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल) वर होत असल्याचे दिसत नाही. 9 एप्रिलला उदघाटन सोहळ्याने Vivo IPL 2021 ची सुरुवात होईल. त्यात जर तुम्हाला कोरोनामुळे स्टेडियममध्ये जाऊन मॅच न बघता येण्याचे दुःख झाले असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक असा जुगाड घेऊन आलो आहोत, ज्याने तुम्ही घरबसल्या मोठ्या टीव्ही स्क्रीन सोबतच मोबाईलवर IPL ची मॅच लाइव बघू शकता. आधी सांगितल्याप्रमाणे ‘इंडियन प्रीमियर लीग 2020’ चे डिजिटल राइट स्टारकडे आहेत आणि कंपनीने आपल्या चॅनेल्स सोबतच मोबाईल अ‍ॅप Disney+ Hotstar VIP वर पण मॅच लाइव दाखवत आहे. (IPL 2021 watch live online India timings Disney Plus Hotstar Star Sports cricket)

IPL 2021

परंतु संपूर्ण मॅच बघण्यासाठी Disney+ Hotstar VIP चे सब्सक्रिशन घ्यावे लागेल. पण, निराश होऊ नका. Disney+ Hotstar VIP साठी शुल्क दयावे लागत असले तरी, जियोकडे असे अनेक शानदार प्लान्स आहेत, ज्यात Disney+ Hotstar VIP चे सब्सक्रिप्शन मोफत मिळत आहे.

1. Jio plans with free IPL season

रिलायंस जियोकडे अनेक प्लान्स आहेत, ज्यात Disney+ Hotstar VIP चे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. कंपनीच्या 401 रुपये, 499 रुपये, 598 रुपये, 777 रुपये आणि 2599 रुपयांच्या प्लानमध्ये युजर्स डेटा आणि फ्री कॉलिंग सोबतच आईपीएलच्या सर्व मॅच बघू शकतील. तसेच, 612 रुपये, 1004 रुपये, 1206 रुपये आणि 1208 रुपयांच्या जियो क्रिकेट डेटा अ‍ॅड-ऑन पॅकमध्ये पण युजर्सना एका वर्षासाठी डिज्नी हॉटस्टॉर विआयपीचे सब्सक्रिप्शन मिळेल. पुढे जाऊन घेऊया सर्व प्लान्स बाबत सर्वकाही.

401 रुपयांचा प्लान

401 रुपयांच्या प्लानमध्ये वॅलिडिटी 28 दिवसांची आहे, त्याचबरोबर ग्राहकांना 90 जीबी डेटा मिळेल. प्लानमध्ये जियो नेटवर्कवर अनलिमिटेड तर नॉन-जियो नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 मिनिटे मिळतील. त्याचबरोबर युजर्सना या प्लानमध्ये 100 मोफत एसएमएसची सुविधा मिळेल.

598 रुपयांचा प्लान

तर, 598 रुपयांच्या प्लानमध्ये डेली 2GB डेटा मिळेल. या प्लानची वैधता 56 दिवस आहे. यात जियो-टू-जियो वॉयस कॉलिंग फ्री आणि नॉन-जियो नेटवर्कवर कॉलिंगसाठी 2000 मिनिटे मिळतील.

499 रुपयांचा प्लान

499 रुपयांच्या प्रीपेड प्लानबद्दल बोलायचे तर हा प्लान प्रतिदिन 1.5 जीबी डेटा बेनेफिटसह येतो आणि यात तुम्हाला 56 दिवसांची वैधता मिळते. हा फक्त डेटा पॅक आहे, ज्यात तुम्हाला वॉयस व एसएमएस बेनेफिट्स मिळणार नाहीत.

777 रुपयांचा प्लान

777 रुपयांचा प्लान पाहता, या प्लानमध्ये पण तुम्हाला प्रतिदिन 1.5 जीबी हाई स्पीड डेटा मिळेल. तसेच या प्लानमध्ये तुम्हाला अतिरिक्त 5 जीबी डेटा 84 दिवसांच्या वैधतेसह मिळेल. या पॅकमध्ये तुम्हाला जियो टू जियो अनलिमिटेड कॉल्स, जियो टू नॉन जियोवर 3,000 मिनिट्स आणि प्रतिदिन 100 एमएमएस बेनेफिट मिळतो.

2599 रुपयांचा प्लान

जियोचा 2,599 रुपयांचा प्लान पाहता कंपनीच्या दीर्घ वैधता असलेल्या प्लानच्या यादीत याचा समावेश झाला आहे. या प्लानमध्ये युजर्सना एकूण 740 जीबी डेटा दिला जात आहे म्हणजे ग्राहक रोज 2 जीबी डेटा वापरू शकतात. तसेच युजर्सना 10 जीबी अतिरिक्त डेटा पण मिळत आहे. या पॅकची वॅलिडिटी 365 दिवस आहे. या पॅकमध्ये पण अनलिमिटेड वॉइस कॉलची सुविधा आहे, जियो नेटवर्कवर अनलिमिटेड तर नॉन-जियो नेटवर्कवर कॉलसाठी 12 हजार मिनिटे वर्षभरात मिळतील. ग्राहक रोज 100 मोफत एसएमएस पाठवू शकतील. युजर्सना जियो अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस मिळेल. तसेच या पॅकमध्ये पण 399 रुपयांची डिज्नी+ हॉटस्टार मेंबरशिप 1 वर्षासाठी मिळेल.

612 रुपयांचा डेटा अ‍ॅड-ऑन पॅक

या यादीत सर्वप्रथम 612 रूपाच्या अ‍ॅड-ऑन प्लान पाहता, यात नॉन-जियो नेटवर्क्सवर कॉलिंगसाठी यात 6000 FUP मिनिटे मिळत आहेत. तसेच 72 जीबी अनलिमिटेड डेटा मिळत आहे. या प्लानची वॅलिडिटी युजरच्या चालू प्लान इतकी असेल. या पॅकमध्ये पण 399 रुपयांची डिज्नी+ हॉटस्टार मेंबरशिप 1 वर्षासाठी मोफत मिळेल.

1,004 रुपयांचा डेटा अ‍ॅड-ऑन पॅक

या प्लानमध्ये 200 जीबी डेटा बेनिफिट पण युजर्सना मिळेल आणि यासाठी आधी सक्रिय प्लान नंबरवर असणे आवश्यक नाही. या प्लानने कधीही रिचार्ज करता येईल आणि याची वॅलिडिटी 120 दिवस आहे. या पॅकमध्ये पण 399 रुपयांची डिज्नी+ हॉटस्टार मेंबरशिप 1 वर्षासाठी मोफत मिळेल.

1,206 रुपये आणि 1,208 रुपयांचा डेटा अ‍ॅड-ऑन पॅक

1,206 रुपयांच्या डेटा अ‍ॅड-ऑन पॅकमध्ये कंपनीद्वारे 180 दिवसांची वॅलिडिटी दिली जात आहे. यासाठी पण कोणत्याही बेस प्लानची गरज नाही. 1,208 रुपयांच्या या प्लानमध्ये 240 जीबी डेटासह 240 दिवसांची वॅलिडिटी दिली जात आहे. या डेटा अ‍ॅड-ऑन पॅकसाठी पण कोणत्याही बेस प्लानची गरज नाही. या पॅकमध्ये पण 399 रुपयांची डिज्नी+ हॉटस्टार मेंबरशिप 1 वर्षासाठी मोफत मिळेल.

JioFiber च्या या प्लानमध्ये मोफत बघा IPL

Jio Fiber वापरकर्त्यांना 999 रुपयांपासून सुरु होणाऱ्या आपल्या ब्रॉडबॅंड प्लानसह आईपीएल मोफत बघण्याची संधी मिळेल. चला एक नजर टाकूया Jio Fiber ब्रॉडबॅंड प्लान्सवर जे डिज्नी + हॉटस्टार विआयपीचे मोफत सब्सक्रिप्शन देते आहेत.

JIOFIBER RECHARGE PLAN PRICE BENEFITS OF JIOFIBER PLAN
JioFiber Rs 999 Plan
  • Disney Plus Hotstar VIP + 10 other OTT apps
  • 150Mbps speed
  • Unlimited voice calling
JioFiber Rs 1,499 Plan
  • Disney Plus Hotstar VIP and 11 other OTT apps
  • 300Mbps speed
  • Unlimited voice calling
JioFiber Rs 2,499 Plan
  • Disney Plus Hotstar VIP and 11 other OTT apps
  • 500Mbps speed
  • Unlimited voice calling
JioFiber Rs 3,999 Plan
  • Disney Plus Hotstar VIP and 11 other OTT apps
  • 1Gbps speed
  • Unlimited voice calling
JioFiber Rs 8,499 Plan
  • Disney Plus Hotstar VIP and 11 other OTT apps
  • 1Gbps speed
  • Unlimited voice calling

Jio Postpaid Plus

Jio पोस्टपेड प्लस प्लान Disney Plus Hotstar VIP च्या मोफत सदस्यत्वासह बंडल केले गेले आहेत, जे IPL 2021 ची लाइव स्ट्रीमिंग देतात. या प्लानची किंमत 399 रुपयांपासून सुरु होत आहे आणि हे डिज्नी प्लस Hotstar VIP, Netflix आणि Prime चे सदस्यत्व मोफत देत आहेत.

JIO POSTPAID PLUS PLANS BENEFITS
Rs 399
  • 75GB data
  • Unlimited voice calls and SMSes
  • 200GB data rollover
  • Disney+ Hotstar VIP, Netflix, Prime Videos subscription, Jio apps
Rs 599
  • 100GB data
  • Unlimited voice calls and SMSes
  • 200GB data rollover
  • 1 additional SIM card with Family Plan
  • Disney+ Hotstar VIP, Netflix, Prime Videos subscription, Jio apps
Rs 799
  • 150GB data
  • Unlimited voice calls and SMSes
  • 200GB data rollover
  • 2 additional SIM card with Family Plan
  • Disney+ Hotstar VIP, Netflix, Prime Videos subscription, Jio apps
Rs 899
  • 200GB data
  • Unlimited voice calls and SMSes
  • 500GB data rollover
  • 3 additional SIM card with Family Plan
  • Disney+ Hotstar VIP, Netflix, Prime Videos subscription, Jio apps
Rs 1,499
  • 300GB data
  • Unlimited voice calls and SMSes
  • 500GB data rollover
  • Unlimited voice calls and data benefits in UAE and USA
  • Disney+ Hotstar VIP, Netflix, Prime Videos subscription, Jio apps

The post IPL 2021: असे केल्यास Jio युजर बघू शकतील प्रत्येक मॅच मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ipl-2021-watch-live-online-india-timings-disney-plus-hotstar-star-sports-cricket/feed/ 0